Skip to main content

व्हॉटसअॅप समुह

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 14/07/2016 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फेसबुकपेक्षा व्हॉटसअॅप समुहांची चलती जास्त आहे.वेगवान संपर्क हे व्हॉटसअॅपचे वैशिष्ट्य.शिवाय सदस्यांची संख्या माफक राहते, त्यामुळे मैत्री लवकर होते. बिनकामाच्या,टाळता न येणार्या जाहिराती,असा फेबु सारखा त्रास नाही.इतरही काही फायदे असतील. तर फेबुवर गेल्यावर जसे वेगवेगळया फेसबुक समुहांबद्दल फेबुकडून सुचविले जाते तसे मराठीतून विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी,संवाद साधण्यासाठी,काही व्हॉटसअॅप समुहसुध्दा असतील. त्यांची खात्रीशीर माहिती कुठेच उपलब्ध नाही. जर कोणी मिपाकर मंडळी अशा कोणत्याही विशिष्ट विषयाला वाहिलेल्या व्हॉटसअॅप समुहाशी जोडलेले असतील,किंवा असा/असे समुह माहित असतील तर त्यांची माहिती इथे द्यावी. किंवा एखाद्या विशिष्ट विषयावर कोणी व्हॉटसअॅप समुह सुरू करणार असेल/केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी.शिवाय समुहात सामील होण्यासाठी काही विशिष्ट पात्रतेची आवश्यकता असेल (त्या विषयातील शिकाऊ/तज्ञ इ.) तर त्याचाही क्रुपया उल्लेख करावा. जेणेकरून अशा समुहात सामील होऊन ज्ञानात भर पडेल. समविचारी लोकांना एकत्र येण्यास आणखी एक व्यासपीठ मिळेल.मैत्री होईल. अशा समुहात सामील होण्यासाठी आवश्यक फोन नं अॅडमिनची परवानगी घेऊन इथे मिपावर देण्यात यावा.; किंवा ते नको असेल तर माहिती देणार्या संबंधित मिपाकराला व्यनि करुन अधिक माहिती जसे अॅडमिन,त्यांचा फोन नं.किंवा मेल अॅड्रेस घेता येईल. बर्यापैकी गंभीरपणे चालणार्या समुहांबद्दल इथे माहिती मिळावी.

वाचने 13592
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

रोजच्या खादाड्यांचे फोटो चिटकवित असतील. हायेतच किती? डॉ.खरे, सुडक्या वगैरे धरून 4 नायतर 5.

In reply to by स्पा

हेल्थ फ्रिक नावाचा एक ग्रुप काही मिपाकर गुप्त पद्धतीने चालवतात असे एकून आहे
असाच एक "अं** स**ता NO FRWD" नावाचाही एक ग्रुप काही मिपाकर गुप्त पद्धतीने चालवतात असे एकून आहे

अशा समुहात सामील होण्यासाठी आवश्यक फोन नं अॅडमिनची परवानगी घेऊन इथे मिपावर देण्यात यावा.; किंवा ते नको असेल तर माहिती देणार्या संबंधित मिपाकराला व्यनि करुन अधिक माहिती जसे अॅडमिन,त्यांचा फोन नं.किंवा मेल अॅड्रेस घेता येईल. बर्यापैकी गंभीरपणे चालणार्या समुहांबद्दल इथे माहिती मिळावी.
त्याने काय होईल?

तुमचे मिपावर स्वागत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! भिक नको पण कुत्रा आवर अशी गत झालीये आताशा व्हॉटसअप समुहांची. पण कोणाला त्यात आवड असेल तर विरोधाचे कारण देखील नाही. कळावे, लोभ असावा ! आपलाच फेसबुकीय, ट्वीटरी, व्हाटसपीय आणि चित्रवाहिन्यांवरील चर्चांतून मिळणार्‍या ज्ञानापासून पहिल्यापासून चार हात लांब असलेला - अज्ञानी धर्मराज

In reply to by धर्मराजमुटके

कंटाळा आलाय त्या वाट्सप समूहांचा. दिवस रात्र ट्याव ट्याव वाजत असतं. पाहा तरी त्रास, न पाहा तरी त्रास. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्हाट्सअॅप न वापरणारा - एस.

In reply to by एस

पुर्वीच्या इमेल ढकलपत्रांची जागा सध्या या कायप्पाने मिळाली माहीती की ढकल पुढे अतिषय वैताग प्रकार आहे. शाळू सोबतींच्या समूहावर याच अटीवर आहे, आणि मिपा वाचनकट्टावर

माझ्या मते फेसबुक पेक्षा सोय म्हणून वॉटस अ‍ॅप चांगले आहे. पण त्यातला अ‍ॅडमिन खुळा असता कामा नये. संबंधित विषयावर नसलेला मजकूर देणारा माणूस निर्दयपणे ग्रूप बाहेर हाकलण्याची धमक हवी. नातेवाईकांच्या एक ग्रूप मधे स्वतः चे काहीच न टाकणारे सर्व जण असल्याने बाहेर पडलो. नातेवाईक असा विषय असताना तिथे मोदी, केजरीवाल, वारी, काकडीची कोशिंबीर असले विषयाचे फॉर्रवर्ड कशासाठी ? एका विषयाला वाहिलेले वाटसअ‍ॅप ही कल्पना मस्त आहे. राजकारण, शेअर मार्केट, क्रिकेट, सिनेमा, मुलांच्या समस्या, निर्निराळे कर, सहकारी सोसायटी, खरेदीतील फसवणूक अशा " वाहिलेल्या" विषयांवर असे ग्रूप झाले तर बहार येईल.

In reply to by चौकटराजा

माणूस निर्दयपणे ग्रूप बाहेर हाकलण्याची धमक हवी "याडमिनचा निर्दयपणे खून" वगैरे पेप्रात वाचून कशाला कोण अ‍ॅडमिन होतंय? तेही मिपाकरांच्या गृपचा!! :))

मला तरी व्हाॅट्स अॅप टाकाऊ कंटाळवाणे वगैरे झालेले नाही.चांगले ग्रुप असतील तर व्हाॅट्स अॅपसारखी इंस्टंट मजा नाही.पटकन कनेक्ट राहण्यासाठी पण व्हाॅट्स अॅप बरे पडते.फालतु ढकलणार्यां ग्रुप्सना मी थाराच देत नाही.मला विचारल्याशिवाय अॅड केले तर ग्रुप डिलिट करुन टाकते. व्हाॅट्स अॅपला नावं ठेवणारी एक मैत्रीण वाटेल त्या ग्रुपवर अँड होत असतेच शिवाय सगळीकडे काय सुरु आहे बघायला सतत फोन हातात बाळगते!! असा दुतोंडीपणा करण्यापेक्षा आपल्याला आवडतं त्या लोकांशी, विषयाशी ,व्यवसाय संबंधित असोसिएशन इ शी कनेक्टेड राहायला हे उत्तम साधन आहे असं मला वाटतं.

In reply to by अजया

+१ . आमच्या शाळेतील दहावीतील सर्व वर्गमित्र एकत्र आणण्याचे काम व्हाॅट्स अॅपमुळे मी करु शकलो.

सहमत आहे.आधी मी व्हॉटस app वापरायचे नाही. पण आता मात्र सवय झाली आहे. इनफॅक्ट आता त्याने आलेली instant कनेक्टिविटी खूप आवडते.

बाई, वाड्यावर या नावाचा एक गट आहे. त्यात फक्त मांसाहारी विनोद आणि इतर संबंधित गोष्टी (!!) टाकाव्यात अशी अट आहे. शाकाहारी विनोद टाकल्यास तंबी देण्यात येते. तरीही परत तसा विनोद टाकल्यास सदस्यत्व रद्द होतं. ;)

In reply to by हेमन्त वाघे

त्यामुळे नाही घेता येणार:( नाहीतर वाघाला entry द्यायला बोका नाही का म्हणेल? ;)

वॉट्स अ‍ॅप ग्रुप म्हणजे आपला बहुमुल्य वेळ विनाकारण वाया घालवण्याचे स्थान अस वाटत मला कधी कधी. त्यात आपले अगदी जवळचे काही ठराविक ग्रुप असतात तिथे ठिक आहे पण काही ग्रुप नुसते जोक्स, गुड मॉर्निंग, गुड नाईट ह्या पोस्ट नी भरलेले असतात. मोठ व्यसन आहे हे. माहीत असत काही नाही तरी उगाच उघडून बघायचे काही मेसेज आहे का मिनीटा मिनीटाने.

भारतीय शास्त्रीय संगीताचा एक 'whatsApp group' गेल्या ६ महिन्यापासून कार्यरत आहे. सभासद ९० % वेळा विषायाला धरून लिहितात. कोणाला इच्छा असेल तर ग्रुप मध्ये स्वागत आहे , ९८९२३८८४६० ह्या नंबरवर 'whatsAapp' मेसेज करावा.

In reply to by मनोज श्रीनिवास जोशी

आपल्या ग्रूप मधे ९० टक्के विषयाला धरून लिहित असल्याचे वाचून बरे वाटले. अशा वेळी फॉरवर्डेड मटीरियल ही चालेल पण उगीच बटवडा विभाग नसावा.

मनोज जोशी,चौकटराजा,अजया व इतर सर्वांचे आभार. व्हॉटसअप असो की इतर कोणतीही गोष्ट.तारतम्य हवंच. उत्सुकता असलेल्या पण विशेष ज्ञान नसलेल्या विषयाची अावड निर्माण करण्यासाठी,मैत्रीसाठी,मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी,एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी,भावनिक आधारासाठी,कितीतरी उपयोग आहेत व्हॉटसअॅपचे! घालून दिलेली नियमावली,शिस्त कठोरपणे राबवली जात नसेल,फालतूपणा चालू असेल तिथे अॅडमिनने हस्तक्षेप करावाच. समुहाचा अॅडमिन समुहाच्या विषयाला,उद्देशाला गंभीरपणे घेत नसेल,विषयाला धरून रहात नसेल तर बिनउपयोगाच्या,विषयाला धरून नसणार्या पोस्टसची संततधार लागणारंच.यात व्हॉटसअॅपचा दोष कसा? म्हणूनंच विशिष्ट विषयाला वाहिलेल्या व गंभीरपणे चालवल्या जाणार्या व्हॉटसअॅप समुहांची माहिती मिळावी म्हणून धागा काढला आहे. व्हॉटसअॅप एवढंच फालतु असतं तर झुकेरबर्गनं कोट्यावधी रुपये खर्चून ते कशाला विकत घेतलं असतं!

In reply to by उपयोजक

व्हॉटसअॅप एवढंच फालतु असतं तर झुकेरबर्गनं कोट्यावधी रुपये खर्चून ते कशाला विकत घेतलं असतं!
बाकी सगळं ठिकेय दादा. पण झुकेरबर्गने कोट्यावधी रुपये खर्चून व्हॉट्साप विकत घेणे आणि सर्वसामान्य वापरकर्त्याला ते फाल्तु वाटणे ह्या दोन्ही गोष्टींचा काही एक संबंध नाही बरंका! कोणतंही अ‍ॅप वापरणारे किती आहेत ह्या गोष्टीवर अ‍ॅपची व्हॅल्यू ठरते, ते फाल्तु वा उत्कृष्ट आहे की नाही ह्यावर नाही. जेवढे जास्त वापरकर्ते, तेवढी जास्त संभाषणे, भाष्य, मतप्रचार. जाहिरातींसाठी लागणारा डेटा ह्याप्रकारच्या सर्व सोशलमिडियातून मिळत असतो. उपभोक्त्यांचा कल जाणून घेणे, तो कल प्रभावित करणे इत्यादी कामे करण्यासाठी सोशल मिडियाची उठाठेव त्याचे निर्माते-संचालक करत आहेत. हे जे ते करत आहेत ते काही मौजमजेसाठी नाही. बख्खळ पैसा मिळतो त्यातून. अगदी फाल्तू वाटणारे फॉरवर्ड्सही बरीच उपयुक्त असतात, सामान्य युजरसाठी नाही - जाहिरातदारांसाठी!

whatsapp चा योग्य उपयोग अापल्या फायद्याचा ठरु शकतो. ज्यांना त्याचा उबग आलाय त्यांना बिनउपयोगाच्या पोस्ट पाठवणार्यांचा उबग यायला हवा.त्यांना समज द्यायला हवी. व्हॉटसॅप हा झुकेरबर्गचा उद्योग आहे.कोणताही उद्योग आर्थिक फायद्यासाठीच निर्माण होतो. whatsapp वापरुनच्या वापरुन परत whatsapp ला दुषणे का द्यावीत?

whatsapp चा योग्य उपयोग अापल्या फायद्याचा ठरु शकतो. ज्यांना त्याचा उबग आलाय त्यांना बिनउपयोगाच्या पोस्ट पाठवणार्यांचा उबग यायला हवा.त्यांना समज द्यायला हवी. व्हॉटसॅप हा झुकेरबर्गचा उद्योग आहे.कोणताही उद्योग आर्थिक फायद्यासाठीच निर्माण होतो. whatsapp वापरुनच्या वापरुन परत whatsapp ला दुषणे का द्यावीत?

ज्यांच्या व्हाट्सप समुहांवर ढकलपत्र, बिभत्स विनोद येत नाही ते एकविसाव्या शतकातील भाग्यवान म्हणायला हवेत.

In reply to by सतिश गावडे

गावडेसर अशा भाग्यवानांपैकी आपण एक आहात म्हणे?

In reply to by अभ्या..

गावडेसरांकडुन कायप्पावर मेसेज यायलाही भाग्य लाग्ते म्हणे

In reply to by टवाळ कार्टा

आम्ही चक्क गप्पा मारल्या आहेत! मी आता माझा शर्ट ' भाग्यवान माणसाचा शर्ट ' म्हणून लिलाव करणार आहे. :)

कनेक्टेड राहणे ही माझी गरज नाही म्हणून त्यावर नाही. ज्यांना गरज असेल ते राहतीलच! एक हेही कारण असू शकेल की माझा नवरा व मुलगा त्यात आहेत. नवरा दिवसातून एकदाच ते निरोप पाहतो त्यामुळे त्यास त्याचा त्रास होत नसावा. मुलगा सतत त्यावरच असतो म्हणून त्याची सवय मोडण्यासाठी मला लक्ष ठेवून असणे भाग आहे. या ना त्या कारणाने अशाप्रकारे माझा व्हॉटस अपशी संबंध येतो पण आवडते का? तर नाही. उपयोगी आहे का? तर (चांगला उपयोग केल्यास) आहे.

एखादा ग्रूप हे अ‍ॅडमिनचे स्वप्न असते . त्याचा विचका होणार नाही अशी त्याला खात्री घ्यायची असेल तर अगदी एक समज म्हणून व्यक्ति न हाकलता मजकूर हाकलण्याचे हक्क अ‍ॅडमिनकडे असावयास हवेत.

सर्व व्हॉटस अ‍ॅप वापरणार्‍या जमातीला 'डि लीट' ही पदवी दिली पाहिजे.

काय अप्पावर माहिती पहिल्यांदा मिळते असा अत्ता पर्यंतचा अनुभव आहे, टवाळपणा करण्यात सुद्धा यात बरीच मजा आहे. सध्या बरेच ग्रुप आहेत त्यात विवध प्रकारची माहिती सातत्याने मिळत आहे. बाकी,गरज वाटल्यास मी सरळ डिजिटल ब्रेक घेतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dhol Tasha- Sivamani's Jugalbandi with the Percussionists