वधस्तंभ!

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in मिपा कलादालन
14 Jul 2016 - 9:47 pm

निळा ग्रह!
निळ्या ग्रहावर होता एक निळा राजा.
निळ्या राजाची प्रजाही निळी.
निळ्या प्रजेची होती निळी निळी घरे.
निळ्या निळ्या घरात निळे निळे पडदे.
पाणीही निळे. झाडेही निळी.
आकाशही निळे. तळीच तळी.
Blue...

बाटेला शहर
बाटेला शहरात एक अवाढव्य मंदीर.
अवाढव्य मंदीराचा झेंडाही निळाच.
उत्तुंग!
आभाळाला थडकलेला
तुफान वेगाने वाहणाऱ्या जेट वाऱ्यामध्येच तो फडकायचा
आणि तो आजपर्यंत कधीच विसावला नव्हता

वधस्तंभ!
प्राचीन अर्वाचीन वधस्तंभ उभा होता बाटेला शहराच्या मधोमध
झेंड्यापेक्षाही उंचच उंच
दगडी वधस्तंभात होत्या खुंट्याच खुंट्या
आणि त्यात अडकले होते मानवी सांगाडे
शुभ्र पांढरे आणि खिळखीळी हाडे
रिपब्लिकन ऑफ ब्लू नेशनचे राष्ट्रीय स्मारक
जागतिक वारसाहक्क!
बाटेला शहर

एक्झिमो!
उरल पर्वतरांगाच्या खाचखळग्यांतून चालत गेलेला एक भटका प्रवाशी
जो होता बंदुकांचा व्यापारी
ज्याने पाहिले होते निळ्या पाण्याचे विशाल डोह
ज्यात होते मासे, जलपऱ्या, आणि निळे दगड
ज्यावर होती कलाकुसर
कोरीव शिल्पे
निळ्या ग्रहाची साधनसंप्पती
निळ्या डोळ्यांचा एक्झिमो तुडवत गेला निळा चिखल
निळी दलदल
निळ्या फुलांचा सुपीक प्रदेश
निळ्या सुगंधाची निळी वाट
आणि कळ्याच कळ्या
Blue...

निळा चोर!
एक्झिमो भटकत जेव्हा बाटेला शहरात आला
तेव्हा
वधस्तंभावर लटकला होता एक निळा चोर
जो होता जिवंत
ज्याने केला होता गुन्हा
अज्ञात
ज्याला मिळाला होता मृत्यूदंड
आणि तो मेला
पूर्वजांच्या सांगाड्यात अजून एक मिसळला
एक्झिमोने वधस्तंभाकडे पाहिले
त्याला दिसले
सांगाड्यातून ओघळणारे रक्त
जे होते लाल
त्या लाल रक्तात त्याला दिसला एक पेटलेला वणवा
आगडोंब!

चिरपरीचीत झोळी!
चिरपरीचीत झोळी सांभाळत एक्झिमो चौथऱ्यावर चढला
बिडी शिलगवायला मात्र तो विसरला नाही
विशाल जनसमुदायाकडे बघत एकच वाक्य पोटतिडकीने बोलला
"निळ्या ग्रहावरच्या निळ्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे"
टाळ्यांचे आवाज आलेच नाहीत
एक निळी शांतता
एक निळा आक्रोश
काही जणांनी त्याला भेटून धोक्याची जाणीव करून दिली
तर काहींनी सल्लेही दिले
एक्झिमो विचारचक्रात बुडाला

नंतर तो जंगलातच राहायला गेला
चिरपरीचीत झोळीतून त्याने ना ना प्रकारच्या बंदुका बाहेर काढल्या
भुमिगत चळवळ नावारुपाला येण्याचा हाच तो काळ
असंतुष्टांचा फौजफाटा तयार झाला.
बेसावध सैनिकांवर हल्ले करून त्यांनी राजाला आव्हान दिले
या आव्हानाची किनार लाल होती
शेकडो बंडखोर वधस्तंभावर लटकले
बंदुकांचा खप वाढला
लपूनछपून
उरल पर्वतांतून बंदूकांचा मोठा साठा बाटेला शहराकडे वळाला
Guerrilla War started...

निळ्या ग्रहावरची म्हटली तर ही एक निळी घटना होती
एक्झिमोची प्रमुख मागणी होती वधस्तंभाचा सर्वनाश
जी राजाला कधीच मान्य नव्हती.
जागतिक वारसाहक्क सांभाळने हे तर त्याचे कर्तव्य.
चिंताक्रांत राजाने निळा विचार केला
त्याला आपला हुकूमी एक्का काढावा लागला.

निळ्या सैनिकांची निळी व्यूहरचना
सशस्त्र फौजफाटा जंगलात गेला.
बेसावध क्षणी एक्झिमो पकडला गेला
बरेच बंडखोर चकमकीत मारले गेले
जे होते होते निळे
ज्यांनी पुकारला होता बंड
जो होता निळा
जो निळ्या राजाने चिरडून टाकला
अगदी सहज
निळे बंडखोर काळे-निळे झाले
आणि पुन्हा पडले शुभ्र पांढरे
जंगलभर उरले केवळ सांगाडेच सांगाडे
हे एवढ्या लवकर घडेल याची एक्झिमोला जाणीवही नव्हती.

वधस्तंभाजवळ अलोट गर्दी उसळली.
खुंटीवर एक देह टांगला गेला.
एक्झिमोचा.
ज्याने केला होता एक गुन्हा
बंडखोरीचा
ज्याला मिळाला होता मृत्यूदंड
आणि तो मेला
प्रचंड जनसमुदाय
निळ्या ग्रहावरच्या निळ्या लोकांना आता दिसत होतं सांगाड्यातून ओघळणारं लाल रक्त
आणि त्यांच्या हातातल्या बंदुका आता सरसावल्या होत्या
ज्या त्यांनी आजपर्यंत लपवल्या होत्या

बाटेला शहराच्या अवाढव्य मंदीराचा झेंडा आता लाल झाला आहे.
आणि हा ग्रहसुध्दा आता लाल ग्रह नावाने ओळखला जातो
-रिपब्लिकन ऑफ रेड नेशन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

14 Jul 2016 - 10:01 pm | अभ्या..

प्रयोग जबरदस्त आहे.
आहे तेवढ्या साधनसामग्रीत केलेला प्रयोग नेहमीच भावतो.
कलादालनात केलेल्या ह्या प्रयोगाला स्टँडिंग ओव्हेशन.

प्रचेतस's picture

14 Jul 2016 - 10:03 pm | प्रचेतस

अगदी.

फ़्याण्टास्टिक आणि abstract.

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2016 - 10:58 pm | टवाळ कार्टा

कायच नाय कल्लांव

धनंजय माने's picture

14 Jul 2016 - 11:11 pm | धनंजय माने

मिपावर एक किलबिल विभाग सुरु करुया.

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2016 - 10:34 am | टवाळ कार्टा

आज परत वाचल्यावर समजली

धनंजय माने's picture

14 Jul 2016 - 11:10 pm | धनंजय माने

ख़ास च!
तुम्हाला एकदातरी भेटायला पाहिजेच.

लालगरूड's picture

14 Jul 2016 - 11:37 pm | लालगरूड

+1

बाबा योगिराज's picture

15 Jul 2016 - 12:43 am | बाबा योगिराज

जबरा

काही ढोबळ चुका वगळता छान जमलेय रूपक.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 7:12 am | कैलासवासी सोन्याबापु

तुफान आहे हे!!! मला तर ऑक्टोबर रेवोल्युशन आठवले रशियन!

चांदणे संदीप's picture

15 Jul 2016 - 7:22 am | चांदणे संदीप

एकदम हॉलिवूड श्टाईल!

Sandy

वाचायला त्रास झाला, बाकी ठिक

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2016 - 12:10 pm | अत्रुप्त आत्मा

मलाही!
.
.
.
.
.
.
ह्ही ह्ही ही!
=))

कविता१९७८'s picture

15 Jul 2016 - 7:36 am | कविता१९७८

वाचायला त्रास झाला पण छान आहे.

सुंदर प्रयोग जव्हेर भाऊ!
नेहेमीप्रमाणेच आवडला..!

जव्हेरगंज's picture

15 Jul 2016 - 9:39 am | जव्हेरगंज

धन्यवाद मंडळी,

वाचायला त्रास झाला

कोणता पॅरॅग्राफ वाचायला कठीण गेला हो. की सगळंच?

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 10:17 am | कैलासवासी सोन्याबापु

त्यांना बहुदा रंगीत अक्षर वाचायला त्रास झाला असे वाटते

अजया's picture

15 Jul 2016 - 10:14 am | अजया

जबरदस्त.

बोका-ए-आझम's picture

15 Jul 2016 - 10:56 am | बोका-ए-आझम

हा प्रयोग भारी आहे. याला ग्राफिक कविता म्हणता येईल का?

अभ्या..'s picture

15 Jul 2016 - 11:13 am | अभ्या..

टायपोग्राफीक कविता

तुषार काळभोर's picture

15 Jul 2016 - 11:43 am | तुषार काळभोर

पण डोक्यात नाय गेलं.

हे नक्षलवादाशी संबंधित आहे काय..? का चीन? का रशिया??

संजय पाटिल's picture

15 Jul 2016 - 5:47 pm | संजय पाटिल

मला पण..

रांचो's picture

15 Jul 2016 - 1:09 pm | रांचो

निळा रंग...१४ जुलै...बास्तील डे?
असे असेल तर रुपक खुपच छान जुळुन आलीयेत. अभ्या सोबत मी पण उभा!

नक्की समजलं नाही..पण अर्नॉल्ड शिवाजीनगरचा "टोटल रीकॉल" आठवला .

चाणक्य's picture

15 Jul 2016 - 5:24 pm | चाणक्य

क्रांतीवर आहे का ? नीटसं कळलं नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 5:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझ्यामते क्रुसेड्स अन जिहाद संबंधी असावेत! दर लेखांत जव्हेरगंज भाऊ (किमान आमचा वैयक्तिक तरी) बेंबट्या करून सोडतात मग अशी अंदाजाची आचमने घ्यायला लागतात

म्या अस्ले काही बघतच बसलो नाही.

पहिल आकाशी म्हणजे १०० टक्के स्यान प्लस १०० टक्के मजेन्टा. नंतर मॅजेन्टा कमी होत गेला. प्योर स्यान झाला. परत मॅजेन्टा वाढत गेला. आणि स्यान कमी होत गेला. मग १०० टक्के मॅजन्टा. मग त्यात यलो वाढत गेला. १०० मॅजेन्टा प्लस १०० यलो बरोबर रेड झाला.

परफेक्ट प्रायमरी स्पेक्ट्रम आहे. बॅलन्ससाठी रेड मध्ये लाल ही अक्षरे आणि ब्ल्यु मध्ये निळा ही अक्षरे कॉन्ट्रास्ट केलीत.

रेड पुढे एक्स्टेंड झाला की रेड टू ऑरेज टू यलो टू ग्रीन अ‍ॅन्ड देन अगेन ग्रीन टू ब्ल्यू.

साधे कलर व्हील तर आहे. इथले अर्धचक्र आहे एवढेच. ;)

गामा पैलवान's picture

16 Jul 2016 - 11:23 am | गामा पैलवान

जव्हेरगंज, ही कथा जुनीच आहे, पण नव्याने सादर केलीये. शेवट भाकीतेय आहे. पण खास तुमच्या शैलीत वाचायला आवडली. काय घडणारे ते माहितीये, पण कसं घडतं याची उत्सुकता टिकून राहते.
आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

16 Jul 2016 - 9:10 pm | माहितगार

!

संदीप डांगे's picture

16 Jul 2016 - 9:13 pm | संदीप डांगे

कडक
!@!

वरुण मोहिते's picture

16 Jul 2016 - 11:23 pm | वरुण मोहिते

मस्त लिहिलिय !!!!

मितभाषी's picture

16 Jul 2016 - 11:28 pm | मितभाषी

हेच बोलतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jul 2016 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार

निळाच रंग का निवडला बरे?

पैजारबुवा,

पद्मावति's picture

17 Jul 2016 - 7:48 pm | पद्मावति

जबरदस्त!!

रातराणी's picture

19 Jul 2016 - 6:42 am | रातराणी

नाही झेपलं काहीच :(

जव्हेरगंज's picture

19 Jul 2016 - 9:00 am | जव्हेरगंज

तर कथेचा नेमका अर्थ कसा सांगावा हे मलाही तेवढं जमत नाही.

निळा ग्रह म्हणजे पृथ्वी. निळा देश म्हणजे आपली भारतमाता.
सगळी काही सुरळीत चालू असतं. निळ्या कलरचा अर्थच होतो की पूर्ण शांतता.
शांतीचा कलर निळा.
कुठूनतरी एक इंग्रज येतो. ज्याचा उद्देश फक्त आणि फक्त व्यापार आहे. आणि आपलं प्रोडक्ट खपवण्यासाठी तो उगी उगी बंड पुकारतो. असं बंड जे कायम धुसमुसत राहील. आणि त्यात तो यशस्वी होतो. हे यश त्याचं नाही, तर निळ्या फितूरांनी त्याला दिलेल्या साथीचं आहे.
पण एकदा पकडला जाऊन त्याला फाशीची शिक्षा होते. खरंतर मॅटर इथेच संपायला हवा होता. पण त्याच्यासारखे अनेक व्यापारी तिथे येऊन पोहोचले होते. आणि त्यांची व्यापारासाठी काहीही करण्याची तयारी होती. ज्याची परीणीती सत्ता हस्तगत करण्यात झाली.
लाल रंग हा भारतमातेचं पारतंत्र्य दाखवतो. लाल रंग हा उग्रपणाचं, हिंसेचं प्रतिक आहे. आणि जसं की आपण जाणतोच, इंग्रजांच्या साम्राज्याचा सुर्य कधीच मावळत नव्हता. त्यामुळे पुर्ण पृथ्वी पारतंत्र्यांत ढकलली गेली. असं काहिसं दाखवायचं होतं.
पूर्ण काल्पनिक आहे. ढोबळ इतिहासाचा केवळ आधार घेतलाय.
अनेक धन्यवाद!!!!

भक्त प्रल्हाद's picture

19 Jul 2016 - 9:13 am | भक्त प्रल्हाद

Mala tar he kashmir la fit hotana disla.
Atishay uttam kalakruti. Roopak apratim jamalay.

अर्थ सांगितल्यावर शाब्दिक रंगपंचमी कळाली ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not

जेम्स वांड's picture

30 Oct 2019 - 4:16 pm | जेम्स वांड

कहर लिहिलं आहे जव्हेरगंज भाऊ! एकदमच आवडेश! कसे काय राव तुमच्या कल्पनांचे पक्षी इतक्या उंच भराऱ्या मारतात देवजाणे. और लिखो.

लेख (कि कविता ?) वाचली. तुमचं स्पष्टीकरण पण वाचलं, तरीही वरचा लेख नाही कळला नीट  :(. जाऊदे मी कला दालनात तशीपण औरंगजेब आहे, आणि तुमचे आधीचे काही लेख खरंच आवडले पण काही डोक्यावरून पण गेलेत.
तुम्हाला शुभ दीपावली. भरपूर लिहा :)