प्रेम
प्रेम कस जगता आल पाहिजे...
मोकळेपणान अनुभवता आल पाहिजे...
थोड़ समजून.. थोड़ समजावता आल पाहिजे...
वेड बनून.. वेड करता आल पाहिजे..
सगळ्यांना हे जमतच अस नाही...
पौर्णिमेचा चंद्र मन जाळतोच अस नाही...
पावसातून रोमान्स घडतोच अस नाही...
'प्रेम' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही...
तरी आजही प्रेमावर जग चालत..
सगळ काही असूनही आपल् माणूस लागत..
'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत..
आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'प्यार' करत...