एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
वाचने
26829
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
केविलवाणा चेहरा ठेवायचा
अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
अगदी हेच
In reply to अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ? by मुक्त विहारि
पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म?
In reply to अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ? by मुक्त विहारि
जननि जन्मभुमिश्च स्वर्गादपि
In reply to पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म? by कपिलमुनी
ह्य देशांत जन्म घेणे, म्हणजे पाप....माझे मत....
In reply to पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म? by कपिलमुनी
गतजन्म पाप वगैरे संकल्पनाबाबत
In reply to ह्य देशांत जन्म घेणे, म्हणजे पाप....माझे मत.... by मुक्त विहारि
"ऑल्वेज थिंक पॉझिटीव्ह"च आहे....
In reply to गतजन्म पाप वगैरे संकल्पनाबाबत by अभ्या..
...
In reply to ह्य देशांत जन्म घेणे, म्हणजे पाप....माझे मत.... by मुक्त विहारि
आम्ही शांताबाई
In reply to ... by चंपाबाई
ख्विक...
In reply to आम्ही शांताबाई by सुबोध खरे
आमीरची बायकू असेच बोलली तर ती देशद्रोही ?
In reply to ... by चंपाबाई
वाईट वाटले याला हजारवेळा सहमत
In reply to ह्य देशांत जन्म घेणे, म्हणजे पाप....माझे मत.... by मुक्त विहारि
तुम्ही कुणा बरोबर तुलना करता? ह्यावर खूप काही अवलंबून असते...
In reply to वाईट वाटले याला हजारवेळा सहमत by मोदक
तुलनाच करायची तर ती, आपण
In reply to तुम्ही कुणा बरोबर तुलना करता? ह्यावर खूप काही अवलंबून असते... by मुक्त विहारि
तुलनाच करायची तर ती, आपण राहतो तो प्रदेश दिवसेंदिवस उत्तम होत चालला आहे की अधिकाधिक बकाल, ह्याची केली तर उत्तम.मान्य. पण एखाद्या प्रदेशाची एकाच दिशेने वाटचाल होत नाही. ज्या चांगल्या गोष्टी येतात त्याबरोबर कांही वाईट गोष्टीही येतातच.पुर्वीचे पुणेच नाही तर पुर्वीची कुठलीच शहरे, आज तरी आधीच्या १०-१२ वर्षांपेक्षा उत्तम म्हणता येतील अशी झालेली नाहीत.सरसकटीकरण वाटत असल्याने पास.पण एखाद्या देशा बाबत असे म्हणणे योग्य नाही.किंबहूना अशी विचारसरणी एखाद्या देशाबाबतीत योग्य पण नाही.नाही हो मुवि, फक्त दु:खाची तुलना करून थांबायचे नाही. सुखाची तुलना करताना आपल्यापेक्षा वरच्या लोकांशी तुलना करून कुठे प्रगती करायची आहे त्याचे मूल्यमापन करायचे. खूपच भाबडे विचार वाटत आहेत का?ज्या चांगल्या गोष्टी येतात त्याबरोबर कांही वाईट गोष्टीही येतातच.
In reply to तुलनाच करायची तर ती, आपण by मोदक
माझा वैयक्तिक अनुभवः
In reply to वाईट वाटले याला हजारवेळा सहमत by मोदक
आज जे येमेनच्या बाबतीत आहे....
In reply to माझा वैयक्तिक अनुभवः by आदूबाळ
बघा मुवि,
In reply to आज जे येमेनच्या बाबतीत आहे.... by मुक्त विहारि
वेडी-वाकडी स्वप्ने पडणे वेगळे आणि
In reply to बघा मुवि, by अभ्या..
जर तुम्ही झुंडीत सामील झालेले
In reply to वेडी-वाकडी स्वप्ने पडणे वेगळे आणि by मुक्त विहारि
नॉर्मल आहे हो मी. ;)
In reply to बघा मुवि, by अभ्या..
मोदकसेठ प्रतिसाद
In reply to वाईट वाटले याला हजारवेळा सहमत by मोदक
असाय ना देश आमचा.
In reply to ह्य देशांत जन्म घेणे, म्हणजे पाप....माझे मत.... by मुक्त विहारि
आजकाल असे लिहीणे ही एक फॅशनच झाली आहे....
In reply to अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ? by मुक्त विहारि
+१
In reply to आजकाल असे लिहीणे ही एक फॅशनच झाली आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
डोंबोलीत असून असे?
In reply to +१ by यशोधरा
आपल्या आजूबाजूची जी व्यवस्था
In reply to डोंबोलीत असून असे? by मुक्त विहारि
फार पुर्वी २००९ आणि २०१० मध्ये
In reply to आपल्या आजूबाजूची जी व्यवस्था by यशोधरा
पण हे सतत करावे लागते मुवि.
In reply to फार पुर्वी २००९ आणि २०१० मध्ये by मुक्त विहारि
अथक प्रयत्न सुरु ठेवावेच लागतात. त्याला उपाय नाही.
In reply to पण हे सतत करावे लागते मुवि. by यशोधरा
हे वाचून अतिशय वाईट वाटले...
In reply to आजकाल असे लिहीणे ही एक फॅशनच झाली आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
उद्विग्नतेतून आलेले वाक्य?
In reply to हे वाचून अतिशय वाईट वाटले... by मुक्त विहारि
+१
In reply to उद्विग्नतेतून आलेले वाक्य? by गॅरी ट्रुमन
हे तुमचे वाक्य केवळ उद्विग्नतेतून आलेले असावे
In reply to उद्विग्नतेतून आलेले वाक्य? by गॅरी ट्रुमन
+१
In reply to उद्विग्नतेतून आलेले वाक्य? by गॅरी ट्रुमन
कुठलाही विषय शेवटी मोदी
In reply to +१ by आजानुकर्ण
?
In reply to कुठलाही विषय शेवटी मोदी by सुबोध खरे
चंपाबाई बद्दल बोलू नका
In reply to ? by आजानुकर्ण
संपूर्ण युक्तिवाद प्रिजुडिस्ड
In reply to चंपाबाई बद्दल बोलू नका by सुबोध खरे
+१
In reply to संपूर्ण युक्तिवाद प्रिजुडिस्ड by आनंदी गोपाळ
मुवि आणि तिमा यांनीही
In reply to +१ by आजानुकर्ण
मुवि आणि तिमा यांनीही रस्त्यांची स्थिती, बेभान चालक यामुळे असुरक्षितता वाटते असेच म्हटले आहे. आमीरच्या बायकोने मुलांसाठी देश सोडावा असे वाटते असे म्हटले होते...१. अ) मुवि आणि तिमा यांनी त्यांचा प्रामाणिक उद्वेग व्यक्त केला आहे असे वाटते. आ) शिवाय, त्या दोघांनी कधी दोन पैसे घेऊन अथवा न घेऊन देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन केले असे माहितीत नाही. २. अ) आमीरच्या देश सोडण्याच्या विधानासंबंधी त्याने त्याच्या बायकोच्या खांद्याचा आधार घेत दुसरीकडे शरसंधान केले असा सर्वसाधारण समज आहे (खखो आमीर आणि त्याची पत्नी जाणो). आ) कमीत कमी, समतोल विचार करणार्याला, "इन्क्रेडिबल इंडिया" ची जाहिरात करत असलेल्या व्यक्तीने केलेले "इन्टॉलरंट इंडिया" हे विधान विरोधाभासी व अगम्य वाटायला हरकत नसावी ! शिवाय, पैसे घेऊन (अथवा न घेऊनही) देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन करणार्याने असे विधान सार्वजनिक व्यासपिठावर केले तर त्याचे काय परिणाम असू शकतात याचा विचार आमीरने केला नसेल असे म्हणणे म्हणजे बहुश्रुत असलेल्या त्याच्या बुद्धीमत्तेचा अपमान होईल... तेव्हा, प्रत्यक्षातला परिणाम आमीरला अपेक्षित असलेल्या परिणामापेक्षा वेगळा झाला हा विचार जास्त संयुक्तिक वाटतो. वरचे मुद्दे ध्यानात घेतले तर मुवि/तिमा आणि आमीर यांच्या विधानांमागचे वेगवेगळे अर्थ स्पष्ट व्हायला मदत होईल असे वाटते. जरा अजून इस्काटून... "(बर्याचदा फक्त सोयीच्या वाटणार्या का होईना, पण) अनेक सामाजिक विचारांना सार्वजनिक माध्यमांतून नैतीक विरोध करणार्या" आणि ते करताना "सामाजीक-राजकीय मते परखडपणे मांडणारी, समतोल, विचारवंत व्यक्ती अशी आपली छबी निर्माण करणार्या" व्यक्तीने आपण (कमीत कमी सार्वजनिक पटलावर तरी, आणि कांगावाखोर नसल्यास खाजगीतही) आपल्या वागण्या-बोलण्यावर ताबा ठेवणे आणि त्यांत विरोधाभास होऊ नये, ही काळजी घ्यावीच... जनांसाठी नाही तर मनासाठी तरी :) आपले म्हणणे तार्किकरित्या सुस्पष्टपणे मांडणे कठीण असले आणि/किंवा लोकप्रिय सार्वजनिक व्यासपिठावर व्यक्त होण्याची संधी मिळणे कठीण असले तरी; "दालमे कुछ काला है।" हे चटकन समजण्याइतकी बुद्धी सर्वसामान्यपणे जनतेत जरूर असते. ;)...
In reply to चंपाबाई बद्दल बोलू नका by सुबोध खरे
पिंक असे हे संबोधतात , पण
In reply to ... by चंपाबाई
आता कळलं का मी काय म्हणत होतो?
In reply to पिंक असे हे संबोधतात , पण by सुबोध खरे
चंपाबाईंच्या पालथ्या घड्यावर पाणी घालत नाहि, पण...
In reply to +१ by आजानुकर्ण
हां
In reply to हे वाचून अतिशय वाईट वाटले... by मुक्त विहारि
मागच्या जन्मी आपण काही तरी
In reply to अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ? by मुक्त विहारि
+१
In reply to मागच्या जन्मी आपण काही तरी by प्रसाद गोडबोले
" मागच्या जन्मी आपण काही तरी
In reply to अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ? by मुक्त विहारि
मागच्या जन्मी आपण काही तरी
In reply to अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ? by मुक्त विहारि
=))
In reply to मागच्या जन्मी आपण काही तरी by मृत्युन्जय
हा ना.
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
दिलेली उदाहरणे जीवनतील
लेख गंडलाय.
ज्यांना या देशात जन्म झाला
सहमत। चांगल्या भौतिक सुविधा,
In reply to ज्यांना या देशात जन्म झाला by संदीप डांगे
तिमा, आयुष्य रँडम असतं हो.
चला चारशेची निश्चिती.
माझ्या गतजन्माचं माहित नाही
लेखातल्या भावनांशी अंशतः सहमत...
अजून एक.
In reply to लेखातल्या भावनांशी अंशतः सहमत... by ज्ञानोबाचे पैजार
वाह... सुंदर...
In reply to अजून एक. by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to अजून एक. by ज्ञानोबाचे पैजार
सर्व
तुम्हाला या देशात जन्म घेणे पाप वाटते का
In reply to सर्व by नाखु
भेंडी
In reply to तुम्हाला या देशात जन्म घेणे पाप वाटते का by कपिलमुनी
मला माणसाने जन्माला येणेच पाप वाटू लागले आहे....
In reply to भेंडी by नाखु
आपणच समजून घ्यायचे !
मागला जन्म आणि पापपुण्य या