पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच.
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड
साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार