भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग 1

पी. के.'s picture
पी. के. in भटकंती
30 Aug 2016 - 10:57 pm
या वर्षीचा निम्मा पावसाळा सरला तरी एकही मोठी भटकंती झाली नव्हती त्यात नवीन बाईक घेऊन चार महिने झाले तरी घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर या पेक्षा जास्त चालवायला चान्स भेटला नसल्यामुळे आतुन चरफडत होतो. आणि अशाच एका दिवशी नशीब माझ्यावर फिदा झालं. बायको:- माहेरी आईनं बोलावलंय दोन वीक साठी... (पाच सेकंद शांतता) बायको:- काय, कुठं हरवला.... आता तिला काय सांगू कि या पाच सेकंदात मी रायगडच्या बाजार पेठेतून फिरून, दिवेआगरच्या समुद्रात अंघोळ करून मुरुड च्या पाटील खानावळीत सुरमई खात होतो. (कधी कधी मलाच माझ्या मानाचं कौतुक करावंसं वाटत बायको शेजारी असून ते कसलाही विचार करू शकत. थँक गॉड मन हे बुद्दीचा असा कप्पा आहे ज्यावर बायकोच अतिक्रमण नसत.) मी:-(मनात फुटलेल्या लाडवाला मनातल्या मनात खाऊन, फुलपाखरांना शांत करून आणि आतुन होणाऱ्या गुद्गुल्यानं रिस्पॉन्स न देता) दोन आठवडे?? बायको:-हो. लवकर ट्रेन बुक करा. दुसऱ्याच दिवशी बायको तिचा भाऊ आणि लहान मुलाचं बुकिंग केलं आणि भटकंती साठी गूगल करायला सुरवात केली. प्लॅन 1. भंडारदरा आणि परिसर, प्लॅन 2. भीमाशंकर आणि परिसर.प्लॅन 3. प्लॅन 1 + प्लॅन 2 फायनली प्लॅन 3 फायनल केला. आता सर्वात मोठा प्रश्न बरोबर कोण येणार? मला गर्व आहे कि अचानक टांग मारणारे माझे दोस्त नाहीत. सुरवातीलाच जमणार नाही.... असं स्पष्ट आणि सरळ सरळ सांगतात.नेहमीचा साथीदार विशालला विचारल तर तो बिचारा त्याचं दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाणार होता. ऑफिस मधल्या दोन तीन दोस्ताना विचारल पण घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर असा चार किमीचा प्रवास करणारे माझा साडेपाचशे किमीचा अघोरी प्लॅन ऐकून त्यांनीपण स्पष्ट नकार दिला. त्यातल्या त्यात नितेश विचारून सांगतो म्हणाला. मी पण मग इमोशन अपील, फियर अपील ची अस्त्र सोडली पण त्याच्या बायकोने टाकलेल्या चक्रविव्हा पुढे माझी अस्त्र बेकार गेली आणि त्याचपण नकार आला. मग वाट पाहीन नाहीतर एकटा जाईन अशी धमकी देऊन कामाला लागलो. प्लॅन ठरवला. दिवस 1 भंडारदरा- भंडारदरा बॅकवॉटर - कोकणकडा - संधान दरी - अमृतेश्वर मंदिर - रंधा फॉल - ओझर मुक्काम दिवस 2:- ओझर दर्शन - लेण्याद्री- शिवनेरी किल्ला - भीमाशंकर- बॅक टू पॅव्हिलिओन. एव्हाना मी एकटा 550 ते 600 किमी च्या राईड वर निगालोय हे दोस्ताना समजल्यावर त्यांनी मला प्रोसाहन(??) द्यायला सुरवात केली, जणू काई मी अशांत बलुचिस्तान मध्ये शांतता प्रस्तापित करायला निगालोय अशा नजरेन मंडळी माझ्याकडे पाहू लागली. काय वेड लागलाय का...डोक्यावर पडलाय का... गाडी बंद पडली तर...पंचर झाली तर.... वाघ आडवा आला तर...आशा संभव आणि असंभव गोष्टींचा मारा माझ्यावर चालू झाला. पण आता माघार नाही... ठरलं आणि बॅग भरायला घेतली. मिपाकर प्रचेतस, संदीप डांगे यांचा सल्ला आणि थोडं गुगल करून प्लॅन केला. एकटा आसल्यामुळे कुठेही भटकायचं कुठंही राहायचे ठरवलं. अंघोळीची कपडे आणि रेनकोट बॅगेमध्ये खुपसला. एकचं गोष्ठ सत्तावीत होती ती म्हणजे दोन दिवस भरपूर देवं दर्शन होणार त्यामुळे शनिवार रविवार असून नॉनव्हेज नाय खाऊ शकणार. मग जास्त विचार न करता लगेच फेमस दम बिर्याणीला गेलो आणि तंदूर चिकन आणि चिकन बिर्याणी गळ्यापर्यंत येईस्तोवर खाल्ली. गळ्यात थोडी जागा होती ती पण रेशमी कबाब नी भरून घेतली. येताना लागलीच माझ्या D.S.(वाळवंट वादळाची) टाकी पण फुल्ल करून घेतली. पहाटे लवकर बाहेर पडायचा विचार करून पाचचा गझर लावून झोपी जायचा प्रयत्न करू लागलो. एरवी खुर्ची, सोफा, पायरी, बस, लोकल या मध्ये डुलकी घेणाऱ्या( लिफ्ट मध्ये सुद्धा डुलकी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या) मला का कोणास ठाऊक झोपचं येईना. तसाच तास दोन तास पडून राहिलो आणि नंतर झोपी गेलो...

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 11:27 pm | संदीप डांगे

गुड..!! येउद्या पुढचे भाग लगोलग...

समांतरः तुम्हाला मी खरड केली होती, तुम्ही उत्तर दिले नाही, शनिवारी आलो असतो तुमच्याबरोबर. राहायचीही सोय झाली असती. असो. प्रवास उत्तम झाला असेलच. अभिनंदन.

नंतर खूप बिझी झालो. गडबडीत उत्तर देण्याचे राहून गेलं पण एक दिवस तुमच्याबरोबर जरूर भटकंती करू.

खटपट्या's picture

31 Aug 2016 - 4:02 am | खटपट्या

ओ पीके काका, फोटो नसेल तर प्रवास काल्पनिक समजला जातो मिपावर...

खटपट्या दादा पुढच्या भागात टाकतो फोटू.

रांगेत उभा आहे तिरुपतिच्या असं वाटतंय.

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 8:42 am | प्रचेतस

येऊ द्या पुढचा भाग.

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 8:55 am | अभ्या..

हायला 500 किमीला अघोरी म्हणतात व्हय तुमच्यात? आणि त्याची एवढी चर्चा न काळजी?
एवढे अंतर तर मी कट्टयात भेटायला येताना पार पाडतो. तेही बिनधास्त. प्लानिंग नाही कि कुणी काही म्हणत नाही.

सलाम तुम्हाला.. तुमचे लेख खूप छान असतात. एक भटकंती वर पण येऊ दे कि मग.

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 12:08 pm | अभ्या..

इश्श लाजलो मी लाजलो,
एक प्रतिज्ञा हाय आपली, मोदकासारखे लडाख करिन तवाच भटकंतीचा लेख पाडीन.

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 10:17 am | महासंग्राम

रूट सांगाल का ? जमलंच नकाशा आणि मुक्कामाची ठिकाणं पण सांगा

सविस्तर येईलचं पुढच्या भागात. तरी पण तुमी जाणार असाल तर तुम्हाला मदत म्हणून...
मी नवी मुंबईत राहत असल्यामुळे माझा प्लॅन असा होता. नवी मुंबई- ठाणे -इगतपुरी- घोटी- भंडारदरा-भंडारदरा बॅकवॉटर - कोकणकडा - संधान दरी - अमृतेश्वर मंदिर - रंधा फॉल -राजूर-कोतुळ-ब्राम्हणवाडा -ओतूर - ओझर-लेण्याद्री- शिवनेरी किल्ला - भीमाशंकर.
तुमी भंडारदरा (हॉटेल काका) किंव्हा ओझर भक्त निवास ला मुक्काम करू शकता.

रातराणी's picture

31 Aug 2016 - 10:48 am | रातराणी

मस्त सुरुवात. पुभाप्र.

वेल्लाभट's picture

31 Aug 2016 - 12:26 pm | वेल्लाभट

पाचशे असेना का पाच हजार. प्रवासाची मजा कमी होते होय!
येऊदे पुढचा भाग.
पण फोटॉ पायजेत.

स्वच्छंदी_मनोज's picture

31 Aug 2016 - 1:04 pm | स्वच्छंदी_मनोज

जबरी सुरुवात..
पटापट पुढचा भाग टाका आणी आम्हाला पण फिरवून आणा.

जगप्रवासी's picture

31 Aug 2016 - 2:09 pm | जगप्रवासी

जोरदार सुरुवात, पुढचा भाग येऊ द्या लवकर

दिपस्वराज's picture

31 Aug 2016 - 2:29 pm | दिपस्वराज

प्लॅन 1 नंबर ....

जबरी सुरुवात..
पटापट पुढचा भाग टाका आणी आम्हाला पण फिरवून आणा.

+1

संधान दरी -

हे कुठेशीक आलं?

वपाडाव's picture

1 Sep 2016 - 6:16 am | वपाडाव

त्या दरीत ते साधतात...

झेन's picture

1 Sep 2016 - 7:29 am | झेन

पुढच्या भन्नाट भागाची वाट बघतोय

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Sep 2016 - 8:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

काय हो? सांधण दरी आणि कोकण कडा म्हणजे आपले ते घोटी आणि माळशेज घाटातलेच म्हणताय ना?

नाही म्हणजे एकासारखी दोन तीन नावे असु शकतात म्हणुन विचारले.

आणि फोटो पाहिजेतच...त्याशिवाय मज्जा नाही राव!!