गेली जिन्दगी
झामलझामल करण्यात गेली जिन्दगी
तर्रीपोहा खाण्यात गेली जिन्दगी
फिटयाली केली त्या फुटाळ्यावर कधी
बाकी बर्डी फिरण्यात गेली जिन्दगी
नाईटा मारत पास झालो तर सही
क्यूबिकलच्या सपन्यात गेली जिन्दगी
दिपवाळी आली वेगळ्या चिंतेसकट
अन् तिकटा बुक करण्यात गेली जिन्दगी
कोठे फासे लावून बसला पारधी?
एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी
- संकेत