प्रवास ३

जॉनी's picture
जॉनी in जनातलं, मनातलं
3 Nov 2016 - 10:50 pm

प्रवास 2

"थापा धीर बोल चू*, पेहली बार आया है क्या? पक्का लोग है?"
"हा शाब, 4 तो किलीयर दिख रहे है"
"कहासे?"
"तेंदूए कि हि राह पर"

हे ठिकाण

जरा जपून

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
3 Nov 2016 - 10:08 pm

बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात
चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात
झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात
ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात
पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात
मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात
नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!

भावकवितामुक्त कविताकरुणसमाजजीवनमानरेखाटन

(शीर्षक सुचले नाही ) - extension

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
3 Nov 2016 - 7:44 pm

(मित्रांनो शेवटचे ३ कडवे आधीच्या कवितेला जोडल्या आहेत)

माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!

त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!

इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवीत होतो !!

किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!

मराठी गझलसमाज

(जवळ जवळ) पेसरेट्टु (च)..

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in पाककृती
3 Nov 2016 - 7:43 pm

यंदा काही तरी बर्‍यापैकी जमलंय म्हणुन आवर्जुन पाकृ टाकत आहे. मला जवळपास जमलंच आहे, तुमची थोडीशी मदत लागेल शेवटी शेवटी..

माझ्या एका कानडी मैत्रिणीने मला शिकवलेले हे पेसरेट्टु! म्हणजेच मुगाचे डोसे.

काही म्हणजे काहीच अवघड नाही.

साहित्य :- (माझा कारभार अंदाजपंचे दाहोदरसे असतो. घ्या आपापल्या हिशोबाने..)

चटणीसाठी:-
फोडणीचे साहित्य, कांदा, टोमॅटो, चिंच, गुळ, शेंगदाणे/काजु

पेसरेट्टुसाठी:-
दोन वाट्या हिरवे मुग
एक वाटी तांदुळ
आलं, मिरची, लसुण, कोथिंबीर
मीठ

(शीर्षक सुचले नाही )

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
3 Nov 2016 - 4:24 pm

माझ्या फाटक्या दारिद्र्याला
ठिगळ लावीत होतो,
ज्यांनी मज बहिष्क्रीत केले,
त्यांची थोरवी गाजवत होतो !!

त्यांनी माझ्या प्रेमाची
बहुत लावली बोली,
मी निस्सीम जगाचा प्रियकर,
फुकटच वाटत होतो !!

इथे प्रत्येकेचा हेतू,
प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे,
पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये,
तो रंग सोडवत सोडवीत होतो !!

किती देऊ परीक्षा खरा असण्याची,
दर वेळी पराभूत होतो,
मी या अजब दुनियेचा विद्यार्थी,
कधी ना मोठा होतो !!

बिभत्सकरुणसमाज

सुकवलेलेल्या माशाच्या पाककृती हव्या आहेत...

कैवल्यसिंह's picture
कैवल्यसिंह in पाककृती
3 Nov 2016 - 3:36 pm

मला सुकवलेल्या माशांची रेसिपी/पाककृती हव्या आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई व ईतर आनेक सुकवलेले मासे...

सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...

चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेक - माहिती हवी आहे

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in भटकंती
3 Nov 2016 - 2:49 pm

येत्या 26-27 नोव्हे ला चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेकला जाणार आहोत. आपल्या मिपाकरापैकी कोणी हा ट्रेक केला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. जसे कीती तासांचा ट्रेक आहे. गाईड घ्यावा की नाही ई.

रांगोळी नंतरची रांगोळी

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in मिपा कलादालन
2 Nov 2016 - 6:14 pm

दिवाळी म्हटली की घरोघरी रांगोळ्या ह्या हव्यातच. स्वतःचे घर, वाडा बंगला वगैरे असलेले भाग्यवान आपल्या अंगणात रांगोळ्या काढतात तर चाळ वा सहनिवासात राहणारे वरांडा वा सामायिक जागेत रांगोळी काढतात. चकचकित संगमरवरी वा आधुनिक फरसबंद जमिनीवर गेरु सारवायचा उपदव्याप करण्यापेक्षा विटकरी रंगाच्या सिरॅमिक टाईल वर रांगोळी काढणे उत्तम. याचे दोन फायदे. एकतर गेरुकाम करावे लागत नाही आणि दुसरे महत्वाचे म्हणजे ज्यांना बराच वेळ जमिनीवर बसणे शक्य नाही त्यांना मस्त टाईल टेबलावर ठेवून समोर खुर्चीत बसून आरामात रांगोळी काढता येते.