एक शून्य तीन ..... नक्की पहावे असे रहस्य....
नाटकाचा सफाईदार प्रयोग म्हणजे काय हे जर अनुभवायचे असेल तर सुदीप मोडक लिखीत " एक शून्य तीन " हे मराठी नाटक आवर्जून पहावे.
सदानंद केळकर हे आंबोली गावातील एक वयस्कर उद्योजक. त्यांच्या वाढदिवशी दर वर्षी येणारे ते एक पत्र या वर्षी का आले नाही म्हणून चिंतेत आहेत अनिता या त्यांच्या पुतणीचा अपहरणकर्ता हे पत्र पाठवत असावा आणि त्यातून पुतणी अजून जिवंत आहे हा संदेश तो देत असावा असे त्याना वाटतय . त्या पत्राचा / पत्र पाठवणाराचा आणि पर्यायाने अनिताचे नक्की काय झाले हा शोध घेण्यासाठी त्यानी पत्रकार अजित चिटणीस कडे ही केस सोपवायचे ठरवले आहे.