एस्टी विश्व प्रदर्शन -२०१७
नमस्कार मिपाकर मंडळी
एक अनोखै प्रदर्शन सध्या उपवन आर्ट फैस्टिवलमध्ये चालु आहे. ते म्हणजे एस्टी विश्व प्रदर्शन.
एसटीची विविध मोडेल्स, संग्रहित तिकिटे, तक्रार वह्या , वाहकाच्या नोंदवह्या आदि सामान्य प्रवाशाला कधी न बघायला मिळणाऱ्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तसेच एसटीची कागदी मोडेल्स १:१०० ह्या प्रमाणात बनवून ठेवली होती. त्यामध्ये आपला लाल डब्बा पासून शिवनेरी पर्यंत आणि बेडफोर्ड च्या पहिला बस पासून नवीन वोल्वो बस पर्यंत मोडेल्स बघायला आणि विकायला ठेवली आहेत. सदर प्रदर्शन १५ जानेवारी पर्यंत चालू आहे. त्याचा अवश्य लाभ घ्यावा,
लॉलीपॉप - २
दुसऱ्याच दिवशी माझ्या डेस्कवर एक जार स्थानापन्न झाला. रंगीबेरंगी लॉलीपॉपने भरलेला.
त्यानंतरचा पूर्ण आठवडा मी अद्विकाची फाईल पुन्हा पुन्हा वाचली. न जाणो एखादा दुवा निसटला असेल तर तो लक्षात येईल या आशेने.
दक्षिण घळ भाग ४
सात खून माफ
रेल्वे आपला भोंगा वाजवत फलाट २ वर आली.रात्रीची १० वाजायला आलते.
फलाटावर उतरलो तसा फुलारी समोर आला,सलाम ठोकुन माझ्या हातातील बॅगला हात घातला.
"राहु दे आतली सुटकेस घे."
किडमीडा फुलारी सुटकेस उचलत माझ्या मागे ओढत येत राहीला.
मला त्याची पर्वा नव्हती,मरु दे साला.!
**
१० वर्ष नंतर पुन्हा स्वत:च्या गावात आलतो. १० वर्षापुर्वी सोडल त्या पेक्षा फार बदलत नव्हत.
गाडीत बसताना ताईच्या घरचा पत्ता दिला. फुलारी मागे बसला आणी लोचट हसत म्हणला "साहेब ओळखला".
**
घरातुन बाहेत पडताना ताईला सांगीतल " जेवायला नाही"
आज फुलारीच्या जागी गुडमेवार होता.
ती सध्या काय करते - मराठी चित्रपट परीक्षण
प्रत्येक प्रौढ पुरुषी मनात "ती"ची एक प्रतिमा असते. लहानपणी/तरुणपणी, कोणीतरी/कुठेतरी/कधीतरी भेटलेली. या तीची प्रतिमा धूसर किंवा स्पष्ट हे बघणार्यावर अवलंबून असते पण clarity कितीही विवादित असली तरी "ती" अस्तित्वात असते हे नक्की. प्रथितयश मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे या सदाबहार कल्पनेला घेऊन आपल्यासमोर आले आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन हि या चित्रपटाची त्याच्या विषयाप्रमाणेच एक खासियत. खरं तर हा विषयच इतका सदाबहार आहे कि कोणत्याही संवेदनशील मनाची पाकळी अलगद उलगडणारा.
ट्रेलर समिक्षा : गौतमीपुत्र सातकर्णी.
गौतमीपुत्र सातकर्णी.
चित्रपटाचा ट्रेलर समिक्षा.
दुसर्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजघराणातल्या गौतमीपुत्र सातकर्णी ह्याच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक-काल्पनिक घटनांचा समावेश असलेला चित्रपट येत आहे. गौतमीपुत्र सातकर्णी म्हटल्यावर मला सर्वात आधी प्रचेतसभौ उर्फ वल्लीदा यांची आठवण झाली. केवळ त्यांच्यासाठी म्हणून हा धागा काढत आहे.
ट्रेलरमधे दिसत असलेल्या कथानक, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, वास्तुकला, ऐतिहासिक खुणा यांचा उहापोह करुयात.
जलदुर्गराज नामे सिंधुदूर्ग
मराठ्यांच्या इतिहासात मराठा आरमाराचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. यादव साम्राज्य लयाला गेल्यावर पुढे तीनशेहून अधिक वर्षे भारतात पूर्णवेळ कार्यरत असलेले समुद्री आरमार नव्हते.
आशियातील बलाढ्य सत्ता असलेल्या मुघल साम्राज्याने देखील दक्खन आणि दक्षिण भारताचा ध्यास घेतल्यानंतरही आरमार उभारण्याचा काही फारसा विचार केलेला दिसत नाही. मुघलांच्या थोडयाफार ज्या काही आरमारी मोहिमा झाल्या त्या हंगामी होत्या. अरबांनी व्यापारी जहाजे भाडेपट्टीने घेऊन त्यावर हत्यारबंद अरब व मुघल सैनिक चढवून काठाकाठाने काही मोहीमा झाल्या, त्या खोल समुद्रपासून लांबच राहिल्या.
महाराष्ट्राची संस्कृती आणि आपण
कालच मराठ्यांची राजधानी रायगडावर एक अनुचित प्रकार घडल्याची बातमी येऊन थडकली. शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी चक्क राजदरबारात सिंहासनाच्या जागेवर स्थापित असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर असलेली तलवार उध्वस्त केली. काहींच्या मते हा चोरीचा गुन्हा असून काहींच्या मते चोरीच्या प्रयत्नात केलेली मोडतोड होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला आहे. पण हा निव्वळ चोरीचा प्रयत्न नसून एका राष्ट्रीय पुरुषाच्या प्रतिमेची विटंबना आहे. कारण काहीही असो, निव्वळ आक्रोश आणि त्रागा व्यक्त करण्यापलीकडे जाऊन याची कारणमीमांसा आपण शोधून, हे प्रकार घडण्याचे मूळ असलेली वृत्तीच नष्ट केली पाहिजे.
ब्रम्हचार्याचा संसार. भाग १
दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता?