स्वतःला ओळखायचं असत!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
21 Jan 2017 - 12:25 am

एकट असण्याचा संबंध दु:खाशी का लावतात?
त्यातही काहींना सुख मिळत हे का न मानतात?

एखादी कविता, छानशी गाणी,
एखाद्या कादंबरीतली मोहक कहाणी...
हे सगळ एकट्यानेही अनुभवायच असत
सारख गर्दीतच का हरवायच असत?

एकटेपणात स्वत:ला शोधता येत..
झालेल्या चुकांना समजुन घेता येत..
अपल्याशिच खुपस बोलता येत..
भविष्यातल्या चुकांना टाळता येत..

एकटेपणात कोणतही बंधन नसत!
'हव ते कर' कोणी बघतही नसत!
मात्र... धमाल एन्जॉय करून परतायच असत!
सगळ्यांच्या बरोबरीने हसायच असत!

कविता माझीकविता

कोल्लम सहली विषयी मार्गदर्शन हव आहे

झंप्या सावंत's picture
झंप्या सावंत in भटकंती
20 Jan 2017 - 6:02 pm

2 दिवसांचा कालावधी आहे. सर्व मित्र जाणार आहोत रहाण्यास स्वस्त आणि उत्तम पर्याय मिळेल का ?
घरगुती निवास असेल तर फार उत्तम. किंवा डॉर्मिटरी पण चालेल.
कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज.
जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा.
धन्यवाद .

जखमात यौवनाच्या

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
19 Jan 2017 - 6:30 pm

जखमात यौवनाच्या झाले किती दिवाणे
असती कुणी विलासी कोणी उदासवाणे

असतात काळजाचे गुंते जुने-पुराणे
शून्यात जाई कोणी घेतो कुणी धीराने

लाखो तऱ्हा तयांच्या नि शेकडो ठिकाणे
बाजार काळजाचा लाखो इथे दुकाने

मदिरा कुणा सुखावी कोणास आर्त गाणे
भासे आयुष्य कोणा ती पेटली स्मशाने

ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे
ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे

ती आग अंतरीची जाळी कणाकणाने
ना सांगता कुणा ये हे मोकळेपणाने

होती अबोल का हो? ना बोलती कशाने
हळुवार त्या स्मृतींना कि त्यागती अशाने?

कविता माझीकविता

लॉलीपॉप - 3

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
19 Jan 2017 - 10:03 am

लॉलीपॉप - १

लॉलीपॉप - 2

आदूने तिच्या बाहुलीला हातात घेतलं. हळू हळू अगदी सावकाश तिनं तिचा ड्रेस काढला. त्या बाहुलीला अगदी प्रेमानं गोंजारलं आणि माझ्यासमोर धरलं.

कथा

रंगमंच - ए थिएटर विथ कॉझ..

मनमौजी's picture
मनमौजी in लेखमाला
19 Jan 2017 - 7:55 am

*/

आपल्या आजूबाजूला तीन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारची म्हणजे आमटे कुटुंबीयांसारखी, लोकसेवेला आयुष्य अर्पण केलेली. दुसरी म्हणजे कलाकार मंडळी, शिक्षण कशातही असलं तरी शेवटी आपल्या छंदासाठी आयुष्य ओवाळून टाकणारी आणि तिसरे म्हणजे आपण स्वतः.. साधीसुधी नोकरदार माणसं.. पोटापाण्यासाठी इमानदारीत नोकरी-धंदा करणारी..

आश्चर्य वाटेल, पण माधव आणि स्मिता कर्‍हाडे तिन्ही प्रकारात फिट्ट बसतात!

पृथ्वी थिएटर: गोष्ट एका स्वप्नपूर्तीची

विशाखा राऊत's picture
विशाखा राऊत in लेखमाला
19 Jan 2017 - 7:50 am

*/

स्वप्नपूर्ती : पृथ्वी थिएटर

राम राम मंडळी! काय, सर्व मजेत ना :). आपल्या लाडक्या मिपाचा दशकपूर्ती सोहळा सुरू आहे. सगळे जण त्यासाठी गोष्टींचा खजिना घेऊन येत आहेत. तर मग चला, आजच्या गोष्टीला सुरुवात करू.