स्वतःला ओळखायचं असत!
एकट असण्याचा संबंध दु:खाशी का लावतात?
त्यातही काहींना सुख मिळत हे का न मानतात?
एखादी कविता, छानशी गाणी,
एखाद्या कादंबरीतली मोहक कहाणी...
हे सगळ एकट्यानेही अनुभवायच असत
सारख गर्दीतच का हरवायच असत?
एकटेपणात स्वत:ला शोधता येत..
झालेल्या चुकांना समजुन घेता येत..
अपल्याशिच खुपस बोलता येत..
भविष्यातल्या चुकांना टाळता येत..
एकटेपणात कोणतही बंधन नसत!
'हव ते कर' कोणी बघतही नसत!
मात्र... धमाल एन्जॉय करून परतायच असत!
सगळ्यांच्या बरोबरीने हसायच असत!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
855
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच...पटलं !