मराठी भाषा दिन २०१७: ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण (वर्‍हाडी)

मित्रहो's picture
मित्रहो in लेखमाला
27 Feb 2017 - 6:51 am

1
.
ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण

मराठी भाषा दिन २०१७: सौदा (कोल्हापुरी)

सस्नेह's picture
सस्नेह in लेखमाला
27 Feb 2017 - 6:49 am

1
वडगाव (बुद्रुक), कारखानावालं, आसलं जंक्शन नाव वडगावला कुणी दिलं, कुणाला ठावं. यष्टीच्या बोर्डावर काय ते मावत नव्हतं. तालुक्याला जाणाऱ्या शेवटच्या यष्टीनं गावकुसाबाहेर पडताना झाम्मदिशी यू टरन घेतल्याबरुबर यष्टीच्या लायटीचा उजेड नदीकडच्या उतारावरच्या देशी बारच्या दरवाजातून आत शिरला आन भिताडापशी वळीनं मांडल्याल्या बाटल्या हिरकणीसारक्या झागमाग करून गेल्या. यष्टीनं जणु धक्का दिल्यागत लगोलग मावळतीकडनं साकर कारकान्याचा भोंगा भ्यां करून आरडाय लागला.

मराठी भाषा दिन २०१७: मगेल्या मोगाचो गांव (कारवारी कोंकणी)

यशोधरा's picture
यशोधरा in लेखमाला
27 Feb 2017 - 6:44 am

1
.

मगेल्या मोगाचो गांव

डान्सबार !!!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 6:13 pm

बीप बीप ..पाटील आज फुल्ल करते
बीप बीप ..आज आनेवाले हो ना ?
"आकाश अपडेट देना में निकाल राहा हू "
गाडी नंतर काढू च्यायला तो पर्यंत नेहमीच्या ठिकाणी बसू.
रोजचं झालंय ह्या ऑफिस च्या ड्रायवर ला काही कळत नाही ."ठीक है चलो. पार्क करो और निकलो. "दोस्त आ राहा मै उसकी गाडी से जाऊंगा पता है ना आपको ."
आप" ऋषी के गाडी से आओगे मै थोडी रुक पाऊंगा. "
"हाहाहा "
नेहमीसारखी लेट कारणं मंत्रालयाची ..आम्ही काय पागल बसलोय का ऋषी .
१ व्हॅट ६९ और ४ माईल्ड बोलना.

मांडणीप्रकटन

(मराठी) चलतचित्रांची चलती!!?

मधुका's picture
मधुका in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 4:59 pm
संभाषण क्र. १ "अरे, मराठी सिनेमा आलाय "हरिश्चंद्राची फॅक्टरी", येणार का?" "मराठी ... चांगला आहे ना? तिकीट किती आहे? कुठे जायचेय?" "आले असते रे, पण मला एक अमुक तमुक काम आहे .... " "मागच्या वेळी तू चांगला आहे म्हणालीस आणि अगदी रडका/आर्ट फिल्म निघाला सिनेमा!!" "अरे १२० रुपयेच आहे रे तिकीट...मराठीच तिकीट महाराष्ट्रात तरी कमीच असतं !" संभाषण क्र. २ "अरे काल २७० रुपयांचा खुर्दा रे !!! आणि साला ३ तास गेले ते अजूनच!!!" "का काय झाल?"
संस्कृतीभाषाचित्रपटलेखअनुभव

पुणे भटकंती..............दि.21.01.2017

मॅक's picture
मॅक in भटकंती
26 Feb 2017 - 3:36 pm

खर तर ही भटकंती करून बरेच दिवस झाले पण वेळ मिळत नसल्यामुळे लिहायला जमल नाही.
ऑफीस मधूले आमचे एक साहेब आहेत त्यांचे नाव आहे श्री.मोरे, खर पाहीले तर ते साहेबांच्यापेक्षा मित्रच जास्त वाटतात, एकदम मनमिळावू , शांत व्यक्तिमहत्व त्यांनी त्यांच्या स्व:खर्चाने आम्हाला सर्व कर्मचारी वर्गाला ही भटकंती घडवली. त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार!!!!!!
खर पाहीलं तर मी या भटकंतीमध्ये सहभागी होणे, अपेक्षित नव्हते कारण मी सध्या मोरे साहेबांच्या विभागामध्ये काम करत नाही, माझा विभाग वेगळा आहे. परंतू मी पुर्वी त्या विभागात काम करत होतो, त्यामुळे मला सर्वांनी खूप आग्रह केल्यामुळे मी पण गेलो.

...त्या वेळी कळले नाही

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
26 Feb 2017 - 1:08 pm

त्या एक स्वराची बिजली
स्पर्शून निसटती गेली.....
ती मैफल मग जमलेली
ती बंदिश मज सुचलेली
....मग माझी उरली नाही

उघडता दार अज्ञात
होऊन अनावर आत
कोसळतो कुठुन प्रपात
हे काय भिने रक्तात
...त्या वेळी कळले नाही

ओथ॑बुन चिद्घन आला
निष्पर्ण वृक्ष सळसळला
डवरून फुलांनी गेला
अवचित मग कळले मजला
..... मी देही असुन विदेही!!!

कविता माझीमुक्तक

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
26 Feb 2017 - 12:13 pm

तुझ्या ऊन्हाचं कौतुक
किती करावं करावं
माप पदरी सुखाचं
किती भरावं भरावं

बघ तुळशीला आल्या
मखमालीच्या मंजिर्या
चिऊताईच्या दातांनी
किती खुडावं खुडावं

खिडकीच्या गजावर
झुले डांगराचा वेल
बोटभर आधारानं
वर चढावं चढावं

नंदी बसलेला दारी
गळी लेणं घुंगराचं
येताजाता भक्तीभावे
तिथं नमावं नमावं

झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं

पुण्य कुठल्या जन्माचं
आज फळुनिया आलं
भरलेल्या गोकुळात
दिस सरावं सरावं

गाणेकविता

मराठी; समस्येची पाळंमुळं

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 9:43 am

जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून.


सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार.


लोकमत मधील लेख

समाजविचारमत

वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 9:27 am

१ मार्च २००३
सुपर स्पोर्ट्स पार्क्स, सेंचुरीयन

क्रीडालेख