नकळत

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 4:14 pm

प्रीतीत तुझ्या मज, तू बरेच शिकवून गेलीस
निरक्षर होतो मी, मला पुस्तक करून गेलीस

लावले होते वृक्ष मी आपल्या अंगणी
बहरले ते अन सावली तू घेऊन गेलीस

विश्वास करत गेलो, तू जे सांगत गेलीस
फसत राहिलो मी, अन तू फसवत गेलीस

निजलो मी, वचन पहाटेचे तू देत गेलीस
नकळत मला, पहाट तू माझी घेऊन गेलीस

-निनाव
२१.०३.२०१७

gajhalकवितागझल

विहार... भाग १

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 3:23 pm

निळ्याशार समुद्रात रोजच्याप्रमाणेच अहमद होडी घेऊन निघाला. सोबतीला त्याचा वीस-एकवीस वर्षांचा कोवळा मुलगा इरफान होताच.खरं म्हणजे, आज मुलाला सोबत घेण्याची त्याची इच्छा नव्हती. भर समुद्रात मुलाला काही त्रास झाला तर काय हा प्रश्न आज पहिल्यांदा त्याला पडला होता. पण इरफान घरातही स्वस्थ बसला नसताच. इरफान क्रिकेट खेळायचा.सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे एकतर वडिलांसोबत समुद्रात जाणे किंवा क्रिकेट खेळणे एवढाच त्याचा उद्योग असायचा.

कथाअनुभव

तो मी नव्हेच

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 3:02 pm

गज़लेत सूर्य होतो, तो पिऊन अंध:कार
मी कुडकुडून जातो, डेंजर किती हे वारं

ब्रह्मांड भेदुनिया, गर्जेल काव्य त्याचे
टपरीकडे विडीच्या, वळतात पाय माझे

मृत्यूस डिवचणारे, तो अमरगीत रचतो
लाईफ इन्शुरन्सचा, मी पूर्ण हप्ता भरतो

तारे, फुले नि शब्द, वश त्यास जन्मसिद्ध
मी सापळ्यात - माझे, पाठीस पोट बद्ध

हास्यकविता

सुरवंट

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 2:14 pm

मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.

इतिहासकथाkathaaप्रकटनअनुभव

व्हेज कुर्मा

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
21 Mar 2017 - 1:16 pm

बरेच दिवस हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज कुर्मा करून पहायचा असं चाललं होतं. काल लागला मुहूर्त. तुम्हीही पहा कसा वाटतोय ते.

साहित्यः

ग़ज़ल - म्हटलेच होते

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 12:20 pm

२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं.

म्हटलेच होते...

होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते

धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते

एक मिटते वाट अन खुलतेही एक
प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते

वाटली होतीच भीती या क्षणाची
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते

वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते

- अपूर्व ओक
२०-३-१७

मराठी गझलकवितागझल

या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 8:19 am

नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे  तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले.

कथाजीवनमानविरंगुळा

अंगारा - भाग २ (अंतिम भाग)

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 12:51 am

अंगारा - भाग १
http://www.misalpav.com/node/38784

अंगारा - भाग २ (अंतिम भाग)
मी त्याच्याकडे पहातच राहिलो. आधी आमची भेट होण्याचा काही संबंधच नव्हता. तरीही त्याच्या पाणीदार डोळ्यातील नजर मला आश्वासक वाटली.

रेखाटनविचार