"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
5 Mar 2008 - 2:37 pm

काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?
एकतर अगदी "आस्मान छू लिया" ची भावना झाली असेल किंवा चांगलाच "पोपट" झाला असेल....
तर मी काही आत्ता मी केलेला प्रपोज आणि मला मिळालेला नकार याची सुरस कथा [ तुमच्यासाठी हो , आमच्यासाठी कसली सुरस ?] सांगणार नाही .
तर "प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
[ मला आलेल्या एका विरोपाचे स्वैर भाषांतर ..... ]

१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा
ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही

२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?
२७. मी कितवी आहे? हा हा हा ....
२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
\२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे..."
३४. कित्तीSSSS छान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६. क्काय SSSSS
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...
३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे ...
४२. खरेतर माझ्या 'चुलत बहिणीला' तू खूप आवडतोस म्हणून मग .....
४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही .........
४४. "काय पाहिलसं असं माझ्यात ?????"
४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्षा कृती अधिक बोलकी ...]
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चलू निघशीलं .....
४७. नाईस जोक ....
४८. तुम्ही मुल दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ? कुठली चांगली मुलगी दिसली की लगेच लागले मागे ....
४९. अछ्छा तु पन का ? मला वटले की फक्त राहूल, दिनेश , रवि ... माझ्या मागे आहेत ... असे म्हणून चालायला लागते ........
५०. गाढवा, तुला तर व्यवस्थि प्रपोज पण करता येत नाही... पहिल्यांदाच करतो आहेस कस ? ठिक आहे, चल मी तुल शिकवते कसे करायचे ते ....

आपल्या पैकी मधिल कुणाला जर "यापेक्षा वेगळे उत्तर भेटले" असल्यास "शेअर करायला" हरकत नाही ....

छोटा डॉन
आम्हाला इथे भेट द्या "http://www.chhota-don.blogspot.com/"

प्रतिक्रिया

तात्या विन्चू's picture

5 Mar 2008 - 3:31 pm | तात्या विन्चू

"आईला विचारून सान्गेन!" (वैयक्तीक अनुभव)

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

आनंदयात्री's picture

5 Mar 2008 - 4:05 pm | आनंदयात्री

अच्छा ते प्रपोज वैगेरे ठिक आहे पण एक सांगा तुम्ही मागच्या वेळी वजन कधी केले होते ?

- हे आमच्या एका ४५ किलो वस्तुमानाच्या मित्रवर्याला सदाशिव पेठेत मिळालेले उत्तर!!

स्वाती राजेश's picture

5 Mar 2008 - 3:59 pm | स्वाती राजेश

तु ब्राम्हण आहेस का? आणि ते सुद्धा देशस्थ, नाहीतर आमचे आई बाबा तुला दारात सुद्धा उभे करून घेणार नाहीत...
मग मी कशी तुला हो म्हणू?...

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Mar 2008 - 4:29 pm | ब्रिटिश टिंग्या

जाउ देत्...नकोत त्या दुख:द आठवणी :((

(जबरा हत्ती झालेला) छोटी टिंगी :)

केशवसुमार's picture

6 Mar 2008 - 9:23 am | केशवसुमार

जबरा हत्ती झालेला... खो.. खो.. खो.. हहपुवा..
छोटाडॉनशेठ.. कलेक्शन आवडले.. अनुभव दाणगा दिसतोय..
केशवसुमार

छोटा डॉन's picture

6 Mar 2008 - 11:34 am | छोटा डॉन

इकड यायच्या आधी आमच्या आम्हीच मानलेल्या प्रेयसीला वट्टात सवाल टाकला " बोल, लवशिप देशील का ?"

त्यावर तिच्या प्रतिक्रिया ....
"अय्या , खरचं तुला असं वाटतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे ? [ झाला ना लोचा...]
आत्तापर्यंत ४ वर्षे काही म्हणला नाहीस ते ?
पण 'तू' तिकडे गेल्यावर 'माझ्याबरोबर' इथे कोण ....
तू तिकडे "दुसर्‍या कोणाला प्रपोज" करणार नाही कशावरून ?
बरं ठिक आहे. ठिक आहे , मी तुला "यस एम यस" करते रात्री ...[ म्हणजे आजची संध्याकाळ व रात्रीची झोप बोंबलली ]

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Mar 2008 - 7:13 pm | डॉ.प्रसाद दाढे

तो: माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..माझ्याशी लग्न करशील का..??
ती: क्काय्..??तू कुणाशी पैज वगैरे लावली आहेस का मला प्रपोझ करण्याची? माझा नकारच आहे रे पण तरी विचारले..( तो फ्लॅट..)

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 1:24 am | पिवळा डांबिस

क्या बात है, डॉन! मझा आया!!!
आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही "टाकलं भिडवून" आणि मग "आस्मान छू लिया"!!!
आज वीस वर्षं झाली, आस्मानातच वावरतोय!!!:))
आमच्या दोघांच्याही घराण्यातले हे पहिलेच लव्हमॅरेज! आमच्या लग्नाच्या वेळी इतर नातेवाईक मंडळी "शिंचे असे असते काय ते लव्हमॅरेज!!" असे म्हणत हजर होती (असे आता अंधुकसे आठवते!)
-प्रेमडांबिस

पान्डू हवालदार's picture

6 Mar 2008 - 2:01 am | पान्डू हवालदार

प्रपोझ करियच्या अगोदर् सासुबाइनी सागित्ले ... आता पळुन जाऊन लग्न करा .. तेव्हा पासुन रोज भाडी घास्तोय ... बायको आराम कर्तेय...

सर्किट's picture

6 Mar 2008 - 2:18 am | सर्किट (not verified)

घाईघाईत "सासुबाईंना" असे वाचले. मस्त !

- सर्किट

जुना अभिजित's picture

6 Mar 2008 - 9:04 am | जुना अभिजित

३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?

४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं .....

डॉन हा तर नकारकोशच उघडलास की रे. अरे एखादी मुलगी आम्हाला हो म्हणायची ती हे वाचून एखादं कारण गळ्यात अडकवेल..

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 11:41 am | विसोबा खेचर

छोट्या डॉना,

अरे बाबा तुझे पाय कुठे आहेत? त्यांचा जरा एक फोटो काढून स्कॅन करून मला पाठव. घरी लावीन म्हण्तो! :)

अरे इतका कसा काय बाबा मनकवडा तू? तू सांगितलेलं प्रत्येक कारण मी एकेकदा अनुभवलं आहे! :))

आपला,
(अजूनही अविवाहीत असलेला एक दिलफेक आशिक!) तात्या.

पेस्तन काका's picture

26 Nov 2013 - 4:52 pm | पेस्तन काका

म्हणजे तात्यांचा अनुभव ५० * N असा आहे तर *clapping*

मग आला का "यस"एम एस?

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2008 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर

मी: *****
ती: *****

आणि लग्न केलं. (शब्दावाचून कळले सारे, मधले धोके फार उशीराच उलगडले.)

प्रसाद गोडबोले's picture

9 Mar 2013 - 12:25 am | प्रसाद गोडबोले

नशीबवान आहात !

God bless you !!

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2008 - 10:43 pm | सुधीर कांदळकर

असं बोलायला कशाला पहिजे होतं? बावळटच आहेस. मला माहित होतंच.

आपला आभि's picture

9 Mar 2008 - 12:05 pm | आपला आभि

डॉन चा अनुभव केवळ दान्डगाच नाही तर अति दान्डगा आहे ... चालु दे चालु दे.. आम्ही आहोत ... पाठिशी...

प्राजु's picture

9 Mar 2008 - 10:27 pm | प्राजु

एकदम भारी... बाय द वे आपला अनुभव पुढ्च्या प्रेमवीरांना उपयोगी नक्की पडेल.

- (सर्वव्यापी)प्राजु

अधिराज's picture

6 Mar 2013 - 9:58 pm | अधिराज

जबरदस्त! एकदम भारी!

मन१'s picture

6 Mar 2013 - 10:10 pm | मन१

:)
डान्रावांना पुन्हा कधी लिहिण्यास फुरसत होइल तो जालावरचा सुदिन.......

श्रावण मोडक's picture

6 Mar 2013 - 10:13 pm | श्रावण मोडक

धागा आत्ता कसा काय वर आला बॉ? डान्या?

नाना चेंगट's picture

6 Mar 2013 - 11:20 pm | नाना चेंगट

हा प्रश्न तुम्हाला पडला? तुम्हाला?

जौ द्या आम्हाला पण पडला ;)

श्रावण मोडक's picture

7 Mar 2013 - 12:34 am | श्रावण मोडक

असं होय... मिळालं उत्तर. काय ते विचारू नका. मी तर्क करू लागेन.

रेवती's picture

6 Mar 2013 - 10:30 pm | रेवती

हा धागा योग्य व्यक्तीला दाखवायचा का डानराव? ;)

प्रीत-मोहर's picture

6 Mar 2013 - 10:33 pm | प्रीत-मोहर

रेवती मावशी हे तु करच. तुला तुझ्या गोवाभेटीत माझ्या हातची कैरीची उडदामेथी लागु!!!!

अशी लालूच दाखवल्यावर हे काम करायला माझी ना नाही! ;)

चिंतामणी's picture

8 Mar 2013 - 5:47 pm | चिंतामणी

योग्य व्य्क्ती सापडल्यानंतरच धागा पुन्हा वर आला आहे हे लक्षात नाही का आले?

येस्स! चिंतुकाकांशी सहमत. ;) पण धागा वर काढून, लाजून पळालेले दिसतायत डानराव.

आमच अगदी वेगळे होते... त्यानी प्रपोज वैगरे काही केलेच नाही... डायरेक्ट उद्या आई-बाबा येतील तुला भेटायला ऑफिस मधे असे सांगितले आणि मी पण फक्त "हो" बोलले.. आता ५ वर्ष झाली... एकदम आनंदात चालु आहे. :)

नाना चेंगट's picture

6 Mar 2013 - 11:19 pm | नाना चेंगट

काय चालु आहे?

आहो... लग्न होउन आता ५ वर्ष झाली... म्हणुन म्हटले कि संसार एकदम छान चालु आहे. ;)

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2013 - 11:24 pm | राजेश घासकडवी

'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू.' थोडा वेळ आपल्या अवाक् झालेल्या चेहेऱ्याकडे निरखून पहाते. 'सॉरी, मेरी गलतफेहमी हो गयी.'
(हे सगळं हिंदीमध्ये लिहिण्याचं कारण म्हणजे 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू' हा ड्वायलॉक इतर कुठच्या भाषेत असूच शकणार नाही इतकी खात्री होण्याइतका हिंदी सिनेमातून ऐकला आहे.)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2013 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

जुन्या जाणत्या मिपाकरांचे धागे कित्ती छान असतात... ;-)

आणी ते जाणत्या जुन्या मिपाकरांकडून वरं(ही) आणले जातात... :-p

स्मिता.'s picture

7 Mar 2013 - 12:42 am | स्मिता.

हा धागा कसा काय वर आला बुवा... कन्फेशन्स म्हणून की काय?

जेनी...'s picture

8 Mar 2013 - 9:12 pm | जेनी...
जेनी...'s picture

8 Mar 2013 - 9:13 pm | जेनी...

मज्जा आली ....

बारावीला असताना एका सुनील नामक प्राण्याने प्रपोझ केलं होतं .. आक्च्युली क्रश आहे हे माहित होतं
पण बोलेचना :-/ ...
मग वाट पाहुन पाहुन मी सोडुनच दीला त्याचा विचार ..
मग समिर आला .. माझ्या लिस्टीत ;) ... सुन्या जाम जळाला =)) ..
एक दिवस येऊन म्हणतो कसा , " तुझं कुठे चालु नै न ? , कुणी बॉयफ्रेंड ?? "
म्हटलं , " का ? "
तं " नै म्हणजे .. मला विचाराचं होतं , कि म्म्म म्हणजे ,"
मग मीच म्हणलं , " प्रपोझ करायचय का ? " ( च्यायला केवढे ते आवंडे गिळायचे :-/ )
" हो .. हो तेच .. पण कसं बोलु तेच कळेना एवढे दिवस म्हणुन तर लागले " :(
मग मी म्हणलं " आता एवढे दिवस थांबलायेस तसा अजुन थोडं थांब ....
कालच सम्याने येवुन प्रपोझ मारलय .. आधी त्याचा काय तो निकाल लावते .. मग तुझा विचार करेन " :)

तर सांगायचं तात्पर्य हे कि पोपट होउ वा हत्ती .. मनातलं सांगायला उशिर करु नये ...

मस्तच पुजा... अशा बर्‍याच आठवणी आहेत... जाम सही लाइफ असते कॉलेजची. फुल टु धमाल!!! :D

कपिलमुनी's picture

8 Mar 2013 - 9:20 pm | कपिलमुनी

मुन्नाभाइ मधे सगळ्यात भारी ईस्टाइल सांगितली होती

पिशी अबोली's picture

9 Mar 2013 - 12:07 am | पिशी अबोली

मुलं पण काही कमी नमुने नसतात..प्रपोझ करायला लाजतात तरी केवढी ती..आणि सरळ-सरळ सांगायचं ते नाही.. नुस्तं (शब्द) घुमवून, फिरवून सांगायचं..कोण होकार देणार अशा मुलांना?
बाकी लिस्ट छान आहे..शाळांमधे मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवली पाहिजे.. :p

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Mar 2013 - 12:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

ए पिशी अबोली, आपल्याला लाईन देणार का ???

बघा, विचारले सरळ. देणार होकार ??

अप्पा जोगळेकर's picture

17 Mar 2013 - 5:39 pm | अप्पा जोगळेकर

मेहेंदळेंना नेक्स्ट असं उत्तर मिळणार असेल तर मीदेखील नंबर लावत आहे.

बॅटमॅन's picture

18 Mar 2013 - 3:06 am | बॅटमॅन

तुम्हाला नारळ मिळाल्यास तुमच्यानंतर माझापण लंबर बरंका!!!

(मय्तरि-लाइनप्रेमी) बॅटमॅन.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Mar 2013 - 11:45 am | विश्वनाथ मेहेंदळे

ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास चालू आहे ना. वाचा आणि शिका काहीतरी. उगाच आपले प्रपोज मारत फिरतात. सगळे निट शिकण्यावर भर द्या. चालले लगेच लाईन मारायला... आपलं...लावायला..

आणि तुम्ही असे "माकडाच्या हाती.." मधल्या पुस्तकासारखे नाही करायचे. एकाच वेळी एका मुलीला ३-३ चॉईस मिळाले तर मग मी पहिला लंबर लावून काय फायदा.. सगळे कसे सीरियली होऊ देत. आले लगेच तापल्या तव्यावर पोळी शेकायला...

पिशी अबोली's picture

18 Mar 2013 - 12:18 pm | पिशी अबोली

ऑ.. मी इतकी सपशेल माघार घेतल्याचं कुणीच बघितलेलं दिसत नाही..
पण विमेसाहेब, एका प्रतिक्रियेवर नुसत्या तीन तीन प्रपोजल्स येतात बघा.. त्यात मी तुमच्याशी ही प्रपोजलची पद्धत मला पटत नसल्याची इतकी खुलेआम चर्चा करूनही तेच करतात बघा सगळे..मग काय डोंबल अजून समजावायचं मुलांना?? :(
तर मुद्दा हा,की इतकी प्रचंड रेंज ऑफ चॉईस असताना उगाच तीच तीच चूक करणार्‍या लोकांना कसा चान्स मिळेल बरं?
मुलं मुलंच राहतील हे खरं..

बॅटमॅन's picture

18 Mar 2013 - 12:24 pm | बॅटमॅन

बाकी ठीक आहे पण

मुलं मुलंच राहतील हे खरं..

हे आणि काय म्हणे? :P मुलीबिली होतात का काय जणू कोणी =)) लिटरल ट्रान्सलेशन वाचून अंमळ हहपुवा झाली हे बाकी खरे.

पिशी अबोली's picture

18 Mar 2013 - 12:40 pm | पिशी अबोली

बॅटमॅन-
याला भाषाशास्त्रीय उत्तर देईन अगदी.. पण जरा इथल्या चर्चा संपूदेत..

बॅटमॅन's picture

18 Mar 2013 - 12:42 pm | बॅटमॅन

आयला!

विंट्रेष्टिंग. उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. चर्चा काय होतच राहतात ;)

पिशी अबोली's picture

19 Mar 2013 - 3:44 am | पिशी अबोली

मला नक्की संदर्भ शोधता आले नाहीत आज..त्यामुळे ढोबळ उत्तर देतेय.
लॉजिकनुसार 'टॉटॉलॉजी' म्हणून हे वाक्य घेतलं तर ते 'इन्फर्मेशनली एम्प्टी' ठरेल. त्याला अर्थ काहीच राहणार नाही. ते त्याच्या केवळ रचनेमुळे सत्य मानलं जाईल.'सिमेंटिक्स' मध्ये कदाचित या वाक्याची चिरफाड अशी केली जाईल.

पण 'प्रॅग्मॅटिक्स' मध्ये हे वाक्य बघताना संदर्भानुसार त्याचा अर्थ लावला जाईल. स्वतंत्रपणे पाहता 'मुलं ही मुलंच राहतील'या वाक्याचा अर्थ काहीच नवीन माहिती देणार नाही. पण त्याला सगळ्या मुलांमधे न चुकता आढळणार्‍या काही विशिष्ट सवयी,पद्धती यांचा संदर्भ दिला असता त्याला नक्कीच अर्थ येईल. कुणी मुलगा किंवा काही मुलं 'टिपिकल' मुलांसारखं वागला/वागली असता हताशपणे,किंवा कदाचित कौतुकाने किंवा चिडून काढलेला तो उद्गार ठरेल.
हे अत्यंत ढोबळ उत्तर आहे हे मला माहितेय..आणि मराठीत हे सगळं लिहिणं जरा जड जातंय..त्याबद्दल क्षमस्व. जमतील तेवढ्या सुधारणा केल्या जातील.
तर मुद्दा एवढाच, की सर्वसाधारण मराठी भाषिक (झोपेचं सोंग घेतलेलं नसल्यास ;) ) या वाक्याचा अर्थ नक्कीच प्रोसेस करू शकतो.. मानवी भाषेकडे तेवढं सामर्थ्य आहे. :)

सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि ट्रू असण्याबद्दल सहमत आहे.

प्रॅग्मॅटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेल्या विचाराशीही सहमत आहे.

मुद्दा इतकाच होता/आहे की ते भाषांतर पाहून हसू आलं :) ते वाक्य मराठीतून असं पहिल्यांदा वाचल्याने मजा वाटली इतकेच. अंमळ न-नाट्याची आठवण वगैरे आली ;) ह.घ्या.

पिशी अबोली's picture

19 Mar 2013 - 3:58 am | पिशी अबोली

न-नाट्य..हा हा हा ..
अर्थ ट्रान्सफर होत असेल आरामात तर करायला काय जातंय..अगदीच 'वाहतूक मुरंबा' वगैरे नाही करणार.. :p

पेस्तन काका's picture

26 Nov 2013 - 5:22 pm | पेस्तन काका

मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेहि व्हेलेंटायिन्स डे ला एकच ग्रिटीन्ग कार्ड घेउन आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मुलीना एक एक करुन द्यायचो... दोघेहि एकमेकानमागेच असायचो.. कुणी त्याला नाहि म्हणाली की लगेचच तेच कार्ड घेउन मी जायचो आणि अस अजुन २ जण करायचे... एकीने एकदा ते कार्ड फाडुन टाकल तर आम्ही तिच्याशी भांडलो (ती कोणालाच नाहि म्हणाली म्हणुन नाहि, तर त्या बयेने कार्ड फाडल म्हणुन)... पण हे सगळ ग्रुप मध्येच बर का..

पिशी अबोली's picture

9 Mar 2013 - 12:24 am | पिशी अबोली

समोर येऊन विचारा..सांगेन उत्तर..इंटरनेटवर विचारणे हेसुद्धा आडून विचारणे आहे..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Mar 2013 - 1:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

पत्ता व्यनि करा. थेट ते करायचे नसल्यास भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि ने कळवा.
सामोरासमोर विचारताना शब्द वेगळे वापरेन. खुश ??

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 7:53 pm | पिशी अबोली

मेहेंदळे साहेब आणि जोगळेकर साहेब,
चुकतं हेच हो तुम्हा मुलांचं..मुळात कसं प्रपोज करावं याचा विचारच करत नाही तुम्ही लोक..मग मुलीने नकार दिला की दुसरी स्टाईल ट्राय करता.. नाहीतर तिसरी.. आता मुलींनी तुमची टेक्निक रिफाईन होण्याची वाट बघायची का समोर येणार्‍या दुसर्‍या चांगल्या ऑप्शनचा विचार करायचा?

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2013 - 8:12 pm | टवाळ कार्टा

दुसरी स्टाइल दुसर्या मुलीवर ;) :P

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 8:36 pm | पिशी अबोली

सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. नुसती नकार देण्यातली तुमच्याच लिस्टमधली व्हेरिएशन्स बघा.. :p
वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.. :)

जेनी...'s picture

17 Mar 2013 - 9:23 pm | जेनी...

:D

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2013 - 10:16 pm | टवाळ कार्टा

"वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या स्टाईलने विचारण्यापेक्षा एकाच मुलीला नीट विचार करून विचारा.."

म्हणजे कसे त्याचे एखादे उदाहरण द्याल का? (असले तर...)

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 10:29 pm | पिशी अबोली

ती सेल्फ-स्टडी आहे.. ;)
पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?
नुसता टाईमपास म्हणून विचारलं तर हीच काय, याहून अजून रंगीबेरंगी उत्तरं मिळतील.. :)

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2013 - 10:49 pm | टवाळ कार्टा

म्हणजे शेवटी

"मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे."

याला काहीच अर्थ नाहीये
आणि

"पण तुम्हाला जी मुलगी आवडते,तिला काय आवडेल्,काय नाही,काय शक्य आहे,काय नाही याचा विचार करुन जर तुम्ही विचारलंत आणि जर तुमचं प्रेम पटण्याइतकं (acceptable या अर्थी,'मुलगी पटणे' या अर्थी नव्हे) खरं असेल, तर मुलगी का नकार देईल?"

जरी या सगळ्या गोश्टी विचारात घेतल्या तरी एखादे उदाहरण तुम्हाला देता येइल का? (मुलाचे नाव
क्ष" आणि मुलीचे नाव "य" माना)

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 11:24 pm | पिशी अबोली

सपशेल माघार लोकहो..
मुलांना या गोष्टी समजावण्याची ताकद माझ्यात नाही. असती तर पुस्तकं लिहिली असती त्यावर..
सर्व कर्तृत्ववान व सुस्वभावी मुलांनी त्यांची त्यांची लाईन क्लीअर होताच यथाशक्ती इथे उदाहरणं द्यावीत..

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2013 - 10:56 pm | टवाळ कार्टा

१ उदाहरण द्यायची तरी ताकद असली पाहीजेना :P

पिशी अबोली's picture

18 Mar 2013 - 11:05 pm | पिशी अबोली

कर्तृत्ववान आणि सुस्वभावी मुलांसाठीची उदाहरणं नाहीयेत टवाळ कार्टा दादा :p

कवितानागेश's picture

18 Mar 2013 - 12:34 pm | कवितानागेश

point to be noted:
सगळ्या मुलींना एकच स्टाईल आवडत नाही टवाळ कार्टा दादा.. =))

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2013 - 10:55 pm | टवाळ कार्टा

दादा वगरे बोलुन्/लिहुन जास्त सलगी दाखवायची काहीही गरज नाही :P

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2013 - 11:11 pm | प्रसाद गोडबोले

दादा चे पुढे दादाभाई नवरोजी ही होण्याची शक्यता असते तेव्हा असे तडकाफडकी झटकु नका ;)

पिशी अबोली's picture

18 Mar 2013 - 11:20 pm | पिशी अबोली

अहो, इथे नुसत्या एका प्रतिक्रियेवर ३ प्रपोजल्स येतात..दादांपर्यंत जायची गरजच काय आम्हा मुलींना? :p

स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये =))

अबोली काँग्रॅट्झ यार एक साथ तीन तीन प्रपोझल आलीत ..

टांगुन ठेव च्यामारी ... ह्यात जो जास्त वेळ सोताला टांगुन घेईल त्याचा विचार
" विचार करुन सांगते " ह्या कॅटेग्रीत टाकुन द्यायला काय हरकते ?? ;)

:D :P

पिशी अबोली's picture

18 Mar 2013 - 11:58 pm | पिशी अबोली

थॅक्यू पूजातै.. सजेशन्स देत रहा अशीच भारी भारी.. :D
काय बिथरलियेत बघ ना पोरं.. मज्जा.. :)

जेनी...'s picture

19 Mar 2013 - 12:10 am | जेनी...

हीहीही ...

अगं आत्तापरेंत ह्यांच्या तोंडावर नक्कारघंटा वाजल्यात म्हणुन इथं ऑन्लैन ट्राय
चालुये =))

पण तु ती माघार नक्को घ्याला पैजे होतीस बै :-/

नैतर तीनात अजुन भर पडली असतीना :) ..

मग चोइस पण वाढला असता न लटकनार्‍यांची संख्यापण ;)

कित्ती मज्जा आली असती म्हणुन सांगु =))

कवितानागेश's picture

19 Mar 2013 - 12:13 am | कवितानागेश

" तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर क?" =))

ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी :-/
त्यामुळे तु नी मी कटाप बै :-/
अबोलीची लिश्ट वाढावयास मदत करुयात =))

( ए अबोली " मी नै जा :-/ " च म्ह्नायचं हं सग्ग्ळ्ळ्यांना ! ) :P

मन१'s picture

19 Mar 2013 - 1:09 pm | मन१

नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व.
.
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी
ठीक. पण मग लगिन झालेल्यांनी "प्रोपोस" केलं कुणाला तर ? लगिन झालेली लै पोरं तयार भेटतिल पघ.

मन१'s picture

19 Mar 2013 - 1:11 pm | मन१

नाक खुपसण्याबद्दल क्ष मस्व.
.
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै प्रोपोस करत कुणी

पण लगिन झालेल्यांनी कुणाला प्रोपोस केलं तर चालतय का? ;)
लै लाइन सापडन बघा.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2013 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा

@टांगुन ठेव च्यामारी ... >>> =))

बालिका महाडँबिस http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/19.gif http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/19.gif http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/19.gif

अभ्या..'s picture

19 Mar 2013 - 12:17 am | अभ्या..

पिशीतै ह्या पूजाचे सजेशन्स ऐकत बसू नकोस. ती नुसते सल्ले देती आणि मज्जा बघत बसती. :)
थोड्या दिवसानी आयडी बदलून वेडीपिशी असा घ्यावा लागेल. ;)

जेनी...'s picture

19 Mar 2013 - 12:21 am | जेनी...

=)) =))

शी बाबा :-/

अब्या ... जा बाबा कट्टी :-/

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2013 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा

@थोड्या दिवसानी आयडी बदलून वेडीपिशी >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif

चिंतामणी's picture

19 Mar 2013 - 12:31 am | चिंतामणी

मेलो.

बॅटमॅन's picture

19 Mar 2013 - 1:00 am | बॅटमॅन

अगायायाया =)) =))

पिशी अबोली's picture

19 Mar 2013 - 3:40 pm | पिशी अबोली

सगळे दादा न तै भलतीच काळजी घेतात मिपावर.. मन भरून आलं.. वा वा..
अभ्यादादा..कुणाला मिपावर कारण नंबर १० ने नकार द्यायचा झाला तर तुझं नाव सांगू का?

अभ्या..'s picture

19 Mar 2013 - 4:20 pm | अभ्या..

अवश्य. :) ऑलवेज वेल्कम
त्यातल्या त्यात नंबर २९ ने नकार द्यायचा असेल तर मी लगेच येईन. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Mar 2013 - 9:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या स्टाईलला फालतू महत्त्व देण्यापेक्षा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे.
दिखावे पे मत जाव, अपनी अकल... ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी :-)

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 9:46 pm | पिशी अबोली

मुलांनीपण मुलींच्या नकार देण्याच्या स्टाईलची चिकित्सा व यादी करत बसण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार..ओह माफ करा, चुकीचा सल्ला. आय माय स्वारी.. :)

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2013 - 10:17 pm | टवाळ कार्टा

वर जी लिस्ट आहे त्या नकार देण्याच्या स्टाइल आहेत??

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2013 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा

@आपल्यात काय कमी आहे व नकार का मिळाला याचा विचार.. >>> मला असं विचारायला(च) भय वाटतं,,,http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-118.gif
मग काय करावं??? http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-718.gif

अभ्या..'s picture

17 Mar 2013 - 11:30 pm | अभ्या..

मग काय करावं?

मी सांगतो गुरुजी. :) एकदम अक्सीर उपाय देतो. लै एक्स्पीरिअयन्स हाय मला. :)

अभ्या..'s picture

17 Mar 2013 - 11:31 pm | अभ्या..

मग काय करावं?

मी सांगतो गुरुजी. :) एकदम अक्सीर उपाय देतो. लै एक्स्पीरिअयन्स हाय मला. :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2013 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

@एकदम अक्सीर उपाय देतो.लै एक्स्पीरिअयन्स हाय मला.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif याsssss हूsssssssssssssssss चला या १ व्य..नीत मग...!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-336.gif पुढची चर्चा थितच करू. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-269.gif