"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
5 Mar 2008 - 2:37 pm

काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?
एकतर अगदी "आस्मान छू लिया" ची भावना झाली असेल किंवा चांगलाच "पोपट" झाला असेल....
तर मी काही आत्ता मी केलेला प्रपोज आणि मला मिळालेला नकार याची सुरस कथा [ तुमच्यासाठी हो , आमच्यासाठी कसली सुरस ?] सांगणार नाही .
तर "प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
[ मला आलेल्या एका विरोपाचे स्वैर भाषांतर ..... ]

१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा
ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही

२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?
२७. मी कितवी आहे? हा हा हा ....
२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
\२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे..."
३४. कित्तीSSSS छान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६. क्काय SSSSS
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...
३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे ...
४२. खरेतर माझ्या 'चुलत बहिणीला' तू खूप आवडतोस म्हणून मग .....
४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही .........
४४. "काय पाहिलसं असं माझ्यात ?????"
४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्षा कृती अधिक बोलकी ...]
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चलू निघशीलं .....
४७. नाईस जोक ....
४८. तुम्ही मुल दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ? कुठली चांगली मुलगी दिसली की लगेच लागले मागे ....
४९. अछ्छा तु पन का ? मला वटले की फक्त राहूल, दिनेश , रवि ... माझ्या मागे आहेत ... असे म्हणून चालायला लागते ........
५०. गाढवा, तुला तर व्यवस्थि प्रपोज पण करता येत नाही... पहिल्यांदाच करतो आहेस कस ? ठिक आहे, चल मी तुल शिकवते कसे करायचे ते ....

आपल्या पैकी मधिल कुणाला जर "यापेक्षा वेगळे उत्तर भेटले" असल्यास "शेअर करायला" हरकत नाही ....

छोटा डॉन
आम्हाला इथे भेट द्या "http://www.chhota-don.blogspot.com/"

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

20 Mar 2013 - 9:22 am | अप्पा जोगळेकर

मास्तरांनी पोरांना सांगितलं ते असं -->
शेतातून मधोमध एकच वाट जाते. या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि सुरुवातीला सगळीकडे उंचच उंच कणसाची रोपे. ती वाट तुडवत एकदाच जायचं आणि एकच कणीस तोडायचं. परत फिरायची परवानगी नाही. शेतातलं सगळ्यात उंच कणीस आणून द्या.
पोरं गेली धावत धावत. सुरुवातीची पुरुषभर उंचीची रोपं सोडून देत. पुढे असतील अजून उंच या आशेने. पण नंतर मिळाली कंबरभर, गुडघाभर उंचीची रोपे.

हे विद्वत्ताप्रचुर तर्कशास्त्र नाही. इसापनीतीने शिकवलेले व्यावहारिक शहाणपण आहे..

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2013 - 11:49 am | अत्रुप्त आत्मा

@ इसापनीतीने शिकवलेले व्यावहारिक शहाणपण आहे.. >>> http://mimarathi.net/smile/congrats.gif

पिशी अबोली's picture

9 Mar 2013 - 12:26 am | पिशी अबोली

'लाईन देणे'= शब्द घुमवण्याचा प्रकार.. मुलांच्या प्रपोजल स्टाईलची पण लिस्ट केली पाहिजे एक आता..

प्रसाद गोडबोले's picture

9 Mar 2013 - 12:37 am | प्रसाद गोडबोले

अनुभव १)
मी : एकदाच काय ते सांग .सोक्षमोक्ष लाव . नकार ऐकायचीही माझी तयारी आहे .
ती : ( एक घट्ट मिठी :) )

अनुभव २)
मी : सो ?
ती : (रडत रडत ) तु मला आधी का भेटला नाहीस .

अनुभव ३)
मी : आय लव्ह यु .
ती : आयेम सर्प्राइझड . तुझी आधीच एक गीएफ आहे . ती माझी बेस्ट फ्रेन्ड आहे . मीच तुम्हा दोघांचं जुळवुन देण्यात मदत केली . आनि तु "हे" बोलत आहेस ???
मी : आयेम वेटींग फॉर द आन्सर...
ती :.........................
मी : ओके . आय इन्टर्प्रेट द सायलेन्स इन माय फेव्हर ;) =))

नंतर मग जॉब लागला .... लग्न करायला लागलं .... त्यानंतर काही अनुभवच नाही राव . छ्या : थ्रिल गेलं कॉलेजलाईफ मधलं !! :(

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2013 - 10:53 pm | टवाळ कार्टा

अनुभव ३)

अशा मठ्ठ मुलीच जास्त असतात

चावटमेला's picture

17 Mar 2013 - 5:10 pm | चावटमेला

जाऊदे, नकोच त्या आठवणी :(

(हिरवा पिवळा पोपट झालेला) चावटमेला

अप्पा जोगळेकर's picture

17 Mar 2013 - 5:35 pm | अप्पा जोगळेकर

मित्राची बहीण, कॉलेजातली मैत्रीण आणि फ्लोअरला बसणारी एक चष्मिष्ट मुलगी असे तीन नकार गेल्या चार महिन्यात पचवले. नेमका आत्ताच हा धागा वर आला. चालायचंच.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2013 - 6:43 pm | श्री गावसेना प्रमुख

मित्राची बहीण्?मित्राची बहीण ही मी स्वताची बहीण मानतो,बाकी तुम्ही चालु द्या

अप्पा जोगळेकर's picture

20 Mar 2013 - 9:03 am | अप्पा जोगळेकर

मित्राची बहीण ही मी स्वताची बहीण मानतो
?? नक्की काय म्हणायचे आहे?

पाषाणभेद's picture

18 Mar 2013 - 1:11 am | पाषाणभेद

माझ्या होणार्‍या मुलाची आई बनशील का?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2013 - 11:52 am | अत्रुप्त आत्मा

माझ्या होणार्‍या मुलाची आई बनशील का?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-053.gif भेदक पाषाण http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

स्पंदना's picture

18 Mar 2013 - 11:58 am | स्पंदना

साधारण ३० वर्षापुर्वीच या प्रश्नाच उत्तर दिलय इथे अन तरीही.

स्त्रीपुरुष समानता म्हणून ओरड चालू असते सदानकदा, मुली का नाही प्रपोज करत मग!! इथेही दाखवा म्हणाव तुमचं टॅलेंट. हे बरंय पुरषानं प्रपोज केलं तर तो आचरट आणि नाही केलं तर त्याला तिच्या मनातलं समजलं नाही म्हणून तो बावळट. काय अर्थ आहे याला.

अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले तर एक व्यवच्छेदक लक्षण हरवून जाईल की हो त्यांचं =)) ;):P असं काय करता राव :D

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2013 - 10:57 pm | टवाळ कार्टा

=)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2013 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

=)) __/\__/\__/\__ =)) मारणार आहेस १ दिवस =))

पैसा's picture

18 Mar 2013 - 11:45 pm | पैसा

भेटच तू!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Mar 2013 - 2:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

तू पाशवी धाग्यावर चक्क लॉजिक च्या गोष्टी करतोस... कुणी येऊ दिले रे तुला मिपावर ???

त्यापेक्षा नीट बघ आणि शिक. २-३ आयडींनीच एकमेकांना प्रतिसाद द्यायचे आणि मग जितं मया च्या आरोळ्या ठोकायच्या... बघून घे नीट पाशवी मोडस ऑपरेंडी ;-)

बॅटमॅन's picture

19 Mar 2013 - 12:52 pm | बॅटमॅन

नेहमीप्रमाणेच बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद विमेगारु :D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Mar 2013 - 12:28 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे खरे तर चोख उत्तर सहज देत आले असते "जितं मया" ला. पण छोड दिया, उगाच विनयभंगाची केस लागायची माझ्यावर ;-) फट म्हणता पाशवीहत्या व्हायची. एकतर आधीच नाव खराब आहे इथे.

बॅटमॅन's picture

20 Mar 2013 - 3:02 am | बॅटमॅन

हा हा हा...होतं असं कधीकधी. ;)

बाबा पाटील's picture

19 Mar 2013 - 11:44 am | बाबा पाटील

कोन म्हणत पोरी प्रपोज करत नाही ? च्यायला एका वर्षात तीघींनी प्रपोज केल ?कुना कुनाला नाय म्हणु हो ? आणी शेवटी सगळ्यात मोठा गाढवपणा केला स्वतःहुन एकीला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली आणी हे राम!!! मागचे दहा वर्ष ......गेले हो ते दिवस,राहिल्या त्या आठवणी....

बांवरे's picture

19 Mar 2013 - 1:43 am | बांवरे

झबर्‍या कलेक्शनाय !

Lay Bharee

डान्याच्या लग्नाच्या आधी त्या 'अबोली' (कित्ती बोल्ते नै? ;) ) लगीन व्हनार (झाले नसल्यास) :)

सूड's picture

19 Mar 2013 - 5:05 pm | सूड

अबोली असली तरी ती 'पिशी' आहे, हात दाखवून अवलक्षण कोण करुन घील. ;)

प्रीत-मोहर's picture

19 Mar 2013 - 7:13 pm | प्रीत-मोहर

पिशी अबोली म्हणजे काय हे निदान तुला तरी समजवायला लागु नये सूड.

छोटा डॉन's picture

19 Mar 2013 - 5:54 pm | छोटा डॉन

जुन्यापुराण्या लेखावर एवढ्या भरगच्च संख्येने आलेले प्रतिसाद पाहुन आश्चर्यचकित झालो होतो, नेहमीप्रमाणे आम्हाला हा आमच्या आंतरजालिय हितचिंतकांचा कावा वाटला होता.
असो, बाकी चालु द्यात.

- छोटा डॉन

वामन देशमुख's picture

19 Mar 2013 - 6:14 pm | वामन देशमुख

अश्यात लग्न-कार्यांमध्ये येणारा अनुभव:

आवर्जून पहावी अशी कुणीही दिसत नाही आजकाल,
आवर्जून पहावी अशी कुणीही दिसत नाही आजकाल,
जी दिसते… तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते!

प्रसाद गोडबोले's picture

19 Mar 2013 - 6:16 pm | प्रसाद गोडबोले

म्हणुनच मी आजकाल लग्न वगैरे अटेन्ड करत नाही ....

दादा कोंडके's picture

19 Mar 2013 - 7:05 pm | दादा कोंडके

म्हणुनच मी आजकाल लग्न वगैरे अटेन्ड करत नाही ....

मग काय, केळवण आणि बारशीच काय डायरेक? ;)

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 7:12 pm | प्यारे१

टचवुड!

एका मित्राच्या लग्नात आमचे 'पक्षीनिरीक्षण' सुरु असताना एक मुलगी(बाई नाही म्हणवत!) तिच्या अपत्याला घेऊन आली.

माझ्या नि मित्राच्या तोंडून 'बायको असावी तर अशी' असे शब्द नि पलिकडून मित्राचा मित्र 'ही माझी बायको' म्हणायला एकच वेळ....! थोडक्यात वाचलो.

सूड's picture

19 Mar 2013 - 7:14 pm | सूड

का म्हणे ??

अभ्या..'s picture

19 Mar 2013 - 7:26 pm | अभ्या..

जुनं 'फर्निचर' नवे न चकचकीत दिसते म्हणे टचवुड लावून.
त्याला फ्रेंच पॉलिश पण म्हणायचे म्हणे आधी.
हातभट्टीत/नशेसाठी पण वापरायचे म्हणे.
हितंलं प्रयोजन मला बी न्हाय कळ्लं. :(

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 7:38 pm | प्यारे१

गलती से मिष्टेक हो गया!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2013 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

@पलिकडून मित्राचा मित्र 'ही माझी बायको' म्हणायला एकच वेळ...!थोडक्यात वाचलो.>>> =)) प्या..रे काकांना मनात काय बोलावं ? आणी जनात काय बोलावं? हे अंजुन कलत नाय! http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 7:42 pm | प्यारे१

अरे गुर्जी तेव्हा आम्ही लग्नाळू (सोडलेले वळू च्या चालीवर) होतो.
आज तुम्ही आहात ना लग्नाळू तसे! ;)

भटक्य आणि उनाड's picture

19 Mar 2013 - 9:44 pm | भटक्य आणि उनाड

मजा आलि वाचुन !!! आनि प्रतिक्रिया त्याहुन धमाल !!!

भाते's picture

25 Nov 2013 - 10:57 am | भाते

सोमवारी सकाळी हापिसातला कंटाळा घालवण्यासाठी एक अप्रतिम धागा!
धाग्यावरचा मजकुर आणि त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचुन नेहेमीच चांगले मनोरंजन होते.

खटपट्या's picture

26 Nov 2013 - 6:20 am | खटपट्या

+१

दिग्विजय खवरे's picture

26 Nov 2013 - 7:35 pm | दिग्विजय खवरे

मला काहीच प्रोब्लेम नाही
पण मामाच्या मुलाशी ठरलय ना