केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण
वाचने
39043
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या भावना पोहोचल्या.. .
काहीही नाही.
In reply to तुमच्या भावना पोहोचल्या.. . by मुक्त विहारि
जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल ट
In reply to काहीही नाही. by स्वधर्म
दुसरा भाग असा की....
In reply to जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल ट by मुक्त विहारि
RSS आणि त्याचे जाती आधारित लोकसंख्या मोजण्याच्या बाबतीत विचार..
In reply to काहीही नाही. by स्वधर्म
संघाचा जातनिहाय जनगणणेस पाठींबा असेल तर
In reply to RSS आणि त्याचे जाती आधारित लोकसंख्या मोजण्याच्या बाबतीत विचार.. by मुक्त विहारि
लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम
बाळा.... युद्धाचे परिणाम काय असतात?
In reply to लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम by अमरेंद्र बाहुबली
महानगर पालिकेतील उंदीर सध्या
तुम्ही तर... एका वाक्यात सुपडा साफ केला...
In reply to महानगर पालिकेतील उंदीर सध्या by सुबोध खरे
बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार?
In reply to तुम्ही तर... एका वाक्यात सुपडा साफ केला... by मुक्त विहारि
लिंक दिल्याशिवाय, माहितीचा स्त्रोत कसा समजणार?
In reply to बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? by स्वधर्म
दादा...
In reply to बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? by स्वधर्म
आलात इथे?
In reply to महानगर पालिकेतील उंदीर सध्या by सुबोध खरे
त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद
In reply to आलात इथे? by स्वधर्म
अशा लिंकपिसाटांच्या प्रत्येक
In reply to त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे
In reply to त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
खरे हे कायमच व्यक्तिगत
In reply to सहमत आहे by स्वधर्म
खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या
In reply to सहमत आहे by स्वधर्म
टिप्पण्या व्यक्तीगतच
In reply to खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या by सुबोध खरे
उंदीर मारण्याच्या विभागातील
In reply to टिप्पण्या व्यक्तीगतच by स्वधर्म
अपेक्षाभंग समजू शकतो
In reply to उंदीर मारण्याच्या विभागातील by सुबोध खरे
आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय
In reply to अपेक्षाभंग समजू शकतो by स्वधर्म
काही असो, स्वत सुशिक्षित
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
मोदी शाह यांचे अनेक निर्णय
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
अशा स्थितीत मी उगाच त्यात
In reply to मोदी शाह यांचे अनेक निर्णय by आग्या१९९०
डॉ. लवकर बरे व्हा!
In reply to आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय by सुबोध खरे
तुम्ही लेखावर, तुमच्या मते योग्य टिपणी दिली आहे...
In reply to खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या by सुबोध खरे
काही प्रश्न.
भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी
In reply to काही प्रश्न. by सुक्या
उत्तर द्यायला जमत नसेल तर
In reply to भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी by आग्या१९९०
धन्यवाद - काही उत्तरे
In reply to काही प्रश्न. by सुक्या
१ ,२, व २अ , २ब उत्तम.मार्मिक महत्त्वाचे प्रश्न आहेत
In reply to काही प्रश्न. by सुक्या
माझा मुद्दा तो नाहीच.
In reply to १ ,२, व २अ , २ब उत्तम.मार्मिक महत्त्वाचे प्रश्न आहेत by मारवा
पुन्हा काही उत्तरे
In reply to माझा मुद्दा तो नाहीच. by सुक्या
आंबेडकर हे १० वर्ष साठीच आरक्षण असावे असे मानत नवते.
In reply to पुन्हा काही उत्तरे by स्वधर्म
राहुल गांधी सतत 50 टक्केची भिंत तोडण्याची मागणी करत आहेत
जातिगत जनगणना ... फायदे आणि
लेखनाचा विषय चांगला आहे पण
प्रतिसाद आवडला नाही,
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
बाकी पहलगाम हल्ल्याच्या जातीगणनेशी दुरान्वयानेही संबंध नाही.ह्याला काही आधार? भाजपचे घाणेरडे राजकारण तुम्हाला माहीत नाही का? बाकी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीगणना नकोच! जिंलू जातीपाती, चातुर्वर्ण्यव्यवस्था, मनुवाद ह्यांविरुद्ध लढली त्या लोकांच्या महाराष्ट्रात पुन्हा जातीजातीचे राजकारण करण्याचा डाव उधळायला हवा. - अमरेंद्र बाहुबलीआपण 2029 नंतर बोलू.
In reply to प्रतिसाद आवडला नाही, by अमरेंद्र बाहुबली
मग तो पर्यंत लिहू नका.
In reply to आपण 2029 नंतर बोलू. by प्रसाद गोडबोले
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to आपण 2029 नंतर बोलू. by प्रसाद गोडबोले
बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा
In reply to प्रतिसाद आवडला नाही, by अमरेंद्र बाहुबली
कोणी सिरीयसली घेत नाही.
In reply to बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा by मारवा
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी
In reply to बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा by मारवा
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी संबंध आहे याला काय आधार आहे ?पहलगाम हल्ल्यात अतिरेकी आले नी गेलेही! हे कसे झाले असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत, पाकिस्तानवर हल्ला कधी? हा प्रश्नदेखील! ह्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा जातीआधारित जनगणनेचा मुद्दा सर्व सुज्ञ नी अंधभक्त नसलेल्या मिडियाच्या लक्षात आला आहे.अमरेंद्र तुम्ही याला आधार म्हणतात
In reply to पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी by अमरेंद्र बाहुबली
गोखलेजी हे मला समजले नाही
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
मी स्वतः मी स्वतः
In reply to गोखलेजी हे मला समजले नाही by मारवा
विषय काय, बोलताय काय..
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
अहो सोप्पंय,
In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म
मूळ प्रश्नालाही उत्तर द्या
In reply to अहो सोप्पंय, by प्रसाद गोडबोले
मी 1948 पासून जातीनिहाय
In reply to मूळ प्रश्नालाही उत्तर द्या by स्वधर्म
>> मी 1948 पासून जातीनिहाय
In reply to मी 1948 पासून जातीनिहाय by प्रसाद गोडबोले
कर्वे रानडे आगरकरांच्या
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो.
In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले
असं का केलं असावं भगवद्गीतेने
In reply to हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो. by मारवा
पहलगाम ते जातगणना
कायमच मुळ मुद्यापासून दुर नेण्यात हातखंडा असलेल्या भाजपाने नद्या अडवून पाकिस्तानचा घसा एवढ्यात कोरडा पडत नाही हे भारतीयांना लक्षात आले. भारतीयांचे काही समाधान होत नाही, त्यामुळे भारतीयांचे लक्ष अजून कुठे वळवता येईल त्यासाठी जे काही प्रयत्न सुरु होते, त्यात नद्या अडवल्या, नापाक युट्यूब चॅनल्स हटवले. पण भारतीयांचे काही समाधान होईना त्यामुळे जातीय जनगणनेचं दळन आणल्याची चर्चा माध्यमामधे सुरु आहे. भाजपास माहिती आहे की, धर्मावर निवडणूका जिंकता येतात आणि जातीचा मुद्दा येतो तेव्हा भाजपा बॅकफूटवर जातो तेव्हा बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्या गेल्याचे म्हटले जात असले तरी त्यासाठीचा फायदा आणि सद्य पहलगाववरुन लक्ष हटवणे किती सोपे झाले तो येता काळ ठरवेल. जातजनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी काँग्रेसपक्ष करीत होता. पण, नागपूरहुन हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे या विषयावर सरकार कायम गप्प राहिले आहे. जातीय जनगणनेची घोषणा केली पण अंमलबजावणी कधी होणार यावर सरकार काहीही बोलणार नाही. आता प.नेहरु यांनी जातगणनेला कसा विरोध होता आणि आम्ही पुन्हा कशी जातजनगणना देशहितासाठी आणली हे पुढे सुरु राहील. महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मधे जातीवर आधारित आरक्षणाची पहिली मागणी केली. विषमतेचे चटके स्वतः भोगले असल्यामुळे त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची सातत्त्याने मागणी केली. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण धोरण लागून सामाजिक न्यायाचा पाया घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात याच न्याय तत्वाला संवैधानिक दर्जा दिला. तळागाळातील लोक शिकू शिकले सामाजिक न्यायाचं श्रेय या महामानवांना जातं. सद्य सरकार जेव्हा सर्वप्रकारचे आरक्षण बंद करुन टाकेल असे जे स्वप्न पाहात होते आणि ते जे कायम अशा विचारांच्या सरकारला बिनबोभाट मतदान करीत होते त्या सर्व मानसिकतेच्या स्वप्नांचा सरकारच्या दे धक्का धोरणामुळे होतांना दिसतो. जातजनगणना झाली की, सामाजिक बदलांचा अभ्यास होईल आणि आरक्षण धोरणावर पुन्हा चर्चा झडू लागतील. आणि पुन्हा या निमित्ताने गटा-तटाचे पक्षांच्या विविध धोरणाच्या चर्चा होतील. भविष्यात जातजनगणना पुढे कशी जाईल ? भारतीयांसाठी जनगणनेवर आधारित 'धोरण आणि योजना' कशा आणल्या जातील हे पाहणे रोचक ठरणार आहे. सध्या तरी पहलगामची वाट जातजनगणनेवर पोहचली आहे. तुर्तास एवढेच. -दिलीप बिरुटे
उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला
In reply to पहलगाम ते जातगणना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर तर...
In reply to उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला by मारवा
+१
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवघड आहे.
In reply to खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले by मारवा
गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भावना पोहोचल्या.
In reply to गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर by मारवा
:) You nailed it!
In reply to भावना पोहोचल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही युद्धाची जबाबदारी झटकत आहात असे नाही म्हणालो
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे
In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सैन्याला अधिकार दिले
In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे