पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमच्या भावना पोहोचल्या.. .
काहीही नाही.
जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल ट
दुसरा भाग असा की....
RSS आणि त्याचे जाती आधारित लोकसंख्या मोजण्याच्या बाबतीत विचार..
संघाचा जातनिहाय जनगणणेस पाठींबा असेल तर
लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम
बाळा.... युद्धाचे परिणाम काय असतात?
महानगर पालिकेतील उंदीर सध्या
तुम्ही तर... एका वाक्यात सुपडा साफ केला...
बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार?
लिंक दिल्याशिवाय, माहितीचा स्त्रोत कसा समजणार?
दादा...
आलात इथे?
त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद
अशा लिंकपिसाटांच्या प्रत्येक
सहमत आहे
खरे हे कायमच व्यक्तिगत
खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या
टिप्पण्या व्यक्तीगतच
उंदीर मारण्याच्या विभागातील
अपेक्षाभंग समजू शकतो
आमच्या लेखी एखादा डॉक्टर काय
काही असो, स्वत सुशिक्षित
मोदी शाह यांचे अनेक निर्णय
अशा स्थितीत मी उगाच त्यात
डॉ. लवकर बरे व्हा!
तुम्ही लेखावर, तुमच्या मते योग्य टिपणी दिली आहे...
काही प्रश्न.
भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी
उत्तर द्यायला जमत नसेल तर
धन्यवाद - काही उत्तरे
१ ,२, व २अ , २ब उत्तम.मार्मिक महत्त्वाचे प्रश्न आहेत
माझा मुद्दा तो नाहीच.
पुन्हा काही उत्तरे
आंबेडकर हे १० वर्ष साठीच आरक्षण असावे असे मानत नवते.
राहुल गांधी सतत 50 टक्केची भिंत तोडण्याची मागणी करत आहेत
जातिगत जनगणना ... फायदे आणि
लेखनाचा विषय चांगला आहे पण
प्रतिसाद आवडला नाही,
बाकी पहलगाम हल्ल्याच्या जातीगणनेशी दुरान्वयानेही संबंध नाही.ह्याला काही आधार? भाजपचे घाणेरडे राजकारण तुम्हाला माहीत नाही का? बाकी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीगणना नकोच! जिंलू जातीपाती, चातुर्वर्ण्यव्यवस्था, मनुवाद ह्यांविरुद्ध लढली त्या लोकांच्या महाराष्ट्रात पुन्हा जातीजातीचे राजकारण करण्याचा डाव उधळायला हवा. - अमरेंद्र बाहुबलीआपण 2029 नंतर बोलू.
मग तो पर्यंत लिहू नका.
कुठे त्या भुजबळांच्या नादी
बाहुबली जरा अभावनिक तार्किक मांडणी करा
कोणी सिरीयसली घेत नाही.
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी
पहलगाम हल्ल्याचा जातीगणनेशी संबंध आहे याला काय आधार आहे ?पहलगाम हल्ल्यात अतिरेकी आले नी गेलेही! हे कसे झाले असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत, पाकिस्तानवर हल्ला कधी? हा प्रश्नदेखील! ह्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा जातीआधारित जनगणनेचा मुद्दा सर्व सुज्ञ नी अंधभक्त नसलेल्या मिडियाच्या लक्षात आला आहे.अमरेंद्र तुम्ही याला आधार म्हणतात
गोखलेजी हे मला समजले नाही
मी स्वतः मी स्वतः
विषय काय, बोलताय काय..