पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहो सोप्पंय,
मूळ प्रश्नालाही उत्तर द्या
मी 1948 पासून जातीनिहाय
>> मी 1948 पासून जातीनिहाय
कर्वे रानडे आगरकरांच्या
हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो.
असं का केलं असावं भगवद्गीतेने
पहलगाम ते जातगणना
कायमच मुळ मुद्यापासून दुर नेण्यात हातखंडा असलेल्या भाजपाने नद्या अडवून पाकिस्तानचा घसा एवढ्यात कोरडा पडत नाही हे भारतीयांना लक्षात आले. भारतीयांचे काही समाधान होत नाही, त्यामुळे भारतीयांचे लक्ष अजून कुठे वळवता येईल त्यासाठी जे काही प्रयत्न सुरु होते, त्यात नद्या अडवल्या, नापाक युट्यूब चॅनल्स हटवले. पण भारतीयांचे काही समाधान होईना त्यामुळे जातीय जनगणनेचं दळन आणल्याची चर्चा माध्यमामधे सुरु आहे. भाजपास माहिती आहे की, धर्मावर निवडणूका जिंकता येतात आणि जातीचा मुद्दा येतो तेव्हा भाजपा बॅकफूटवर जातो तेव्हा बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्या गेल्याचे म्हटले जात असले तरी त्यासाठीचा फायदा आणि सद्य पहलगाववरुन लक्ष हटवणे किती सोपे झाले तो येता काळ ठरवेल. जातजनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी काँग्रेसपक्ष करीत होता. पण, नागपूरहुन हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे या विषयावर सरकार कायम गप्प राहिले आहे. जातीय जनगणनेची घोषणा केली पण अंमलबजावणी कधी होणार यावर सरकार काहीही बोलणार नाही. आता प.नेहरु यांनी जातगणनेला कसा विरोध होता आणि आम्ही पुन्हा कशी जातजनगणना देशहितासाठी आणली हे पुढे सुरु राहील. महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मधे जातीवर आधारित आरक्षणाची पहिली मागणी केली. विषमतेचे चटके स्वतः भोगले असल्यामुळे त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची सातत्त्याने मागणी केली. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण धोरण लागून सामाजिक न्यायाचा पाया घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात याच न्याय तत्वाला संवैधानिक दर्जा दिला. तळागाळातील लोक शिकू शिकले सामाजिक न्यायाचं श्रेय या महामानवांना जातं. सद्य सरकार जेव्हा सर्वप्रकारचे आरक्षण बंद करुन टाकेल असे जे स्वप्न पाहात होते आणि ते जे कायम अशा विचारांच्या सरकारला बिनबोभाट मतदान करीत होते त्या सर्व मानसिकतेच्या स्वप्नांचा सरकारच्या दे धक्का धोरणामुळे होतांना दिसतो. जातजनगणना झाली की, सामाजिक बदलांचा अभ्यास होईल आणि आरक्षण धोरणावर पुन्हा चर्चा झडू लागतील. आणि पुन्हा या निमित्ताने गटा-तटाचे पक्षांच्या विविध धोरणाच्या चर्चा होतील. भविष्यात जातजनगणना पुढे कशी जाईल ? भारतीयांसाठी जनगणनेवर आधारित 'धोरण आणि योजना' कशा आणल्या जातील हे पाहणे रोचक ठरणार आहे. सध्या तरी पहलगामची वाट जातजनगणनेवर पोहचली आहे. तुर्तास एवढेच. -दिलीप बिरुटे
उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला
जर तर...
+१
खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले
अवघड आहे.
गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर
भावना पोहोचल्या.
:) You nailed it!
तुम्ही युद्धाची जबाबदारी झटकत आहात असे नाही म्हणालो
+१
थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे
सैन्याला अधिकार दिले
अहो इंदिरा गांधी यांचे कौतुक आणि श्रेय हे त्यांनी दाखवलेल्या
डॉ.खरे साहेब...
श्रीमती इंदिरा गांधी यांनी
जी स्थिती भुजबळांची आहे, तीच
मी आधीच लिहिले आहे.
JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात
JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ?ज्जे बात. खरोखर शिक्षण घेणारे शिकतात / पदवी घेतात आयुष्यात पुढे जातात. रेम्याडोक्याची शिक्षणाच्या नावाखाली नसते चाळे करतात व नंतर आम्हाला नोकरी नाही म्हणुन गळे काढत शिव्या देतात.कहा राजा भोज और ...
:)
लष्करात वैदकीय विभागात असणा
धन्यवाद डॉक्टर!
लष्करातील आचारी...
:)
बिरुटे सर
अब आया उंट पहाड के निचे....
शांत व्हा डॉक्टर. द्वेषाने
डॉक्,
=))
:)
'जावा फुल स्टॅक' सारखा डू
आम्ही आधीपासूनच बरे आहोत,
आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे.अगदी खरे आहे. पूर्ण सहमत. यांच्यातल्या एकाचे सदस्यत्व अर्वाच्य लेखनामुळे ४ वेळा प्रतिबंधित केले होते. त्याच्या अनेक तोतया सदस्यनामांना कायमस्वरूपी अर्धचंद्र दिला होता. परंतु ५ व्यांदा पुनर्जन्माची संधी मिळूनही या सदस्यात कोणतीही सुधारणा नाही.बाकी आपण इतक्या खालच्या
बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!ते पाताळाच्याही खाली जाऊ शकतात. तुमची तयारी आहे का इतके खाली उतरण्याची?मला कधी कधी वाटतं की हा
इंदिरा गांधींवरील हल्ल्याला
इंदिरा गांधीचां वध झाला
+१
इंदिरा गांधीचां वध?
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे
धर्माचे अयोग्य पढिक आकलन
अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच
भक्त लगेच पिसाटल्यासारखे