✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी

स
स्वधर्म यांनी
गुरुवार, 05/01/2025 - 03:49  ·  लेख
लेख
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे: - पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली. - अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली. - आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते. गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही. हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते. जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे. टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38304 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

तुमचं चालू द्या

सुबोध खरे
Sat, 05/03/2025 - 11:54 नवीन
तुमचं चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/03/2025 - 18:45 नवीन
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार उघडे पडले आहे, चहुबाजूने टीका होत असल्याने नी आपल्याला उत्तर देता येत नसल्याने काही मिपाकर वेडेपिसे झाले आहेत, सरकारला धारेवर धरणाऱ्यांनाच व मिपावर फॅक्ट दाखवून प्रश्न विचारणाऱ्यांनाच वेडे ठरवू लागले आहेत. :) अंधभक्तो हो अंधभक्ती!
  • Log in or register to post comments

तुमचं चालू द्या

सुबोध खरे
Sat, 05/03/2025 - 18:55 नवीन
तुमचं चालू द्या भुजबळ बुवा हा प्रतिसाद आपल्यासाठी नव्हताच you are a persona non grata for me
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ज्याला कशातलंच काहीच समजत

श्रीगुरुजी
Sat, 05/03/2025 - 19:00 नवीन
ज्याला कशातलंच काहीच समजत नाही, त्याला तुमचा प्रतिसाद शष्प समजणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला

श्रीगुरुजी
Sun, 05/04/2025 - 09:43 नवीन
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्वत्र पाकिस्तानप्रेमींना पाकिस्तानप्रेमाचं भरतं आलंय. मिपावरील पाकिस्तानप्रेमींचंही तसंच झालंय. कठीण आहे मोदींचं. उघड उघड असलेल्या बाह्यशत्रूंशी लढायचं आणि त्याचवेळी गुप्त अंतर्शत्रूंशीही लढायचं.
  • Log in or register to post comments

कठीण आहे मोदींचं. उघड उघड

आग्या१९९०
Sun, 05/04/2025 - 10:27 नवीन
कठीण आहे मोदींचं. उघड उघड असलेल्या बाह्यशत्रूंशी लढायचं आणि त्याचवेळी गुप्त अंतर्शत्रूंशीही लढायचं. टेंशन नका घेऊ. " एक अकेला सब पर भारी " वर विश्वास डळमळीत होऊ देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/04/2025 - 10:07 नवीन
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार उघडे पडले आहे, चहुबाजूने टीका होत असल्याने नी आपल्याला उत्तर देता येत नसल्याने काही मिपाकर संतुलन हरवून बसले आहेत, सरकारला धारेवर धरणाऱ्यांनाच व मिपावर फॅक्ट दाखवून प्रश्न विचारणाऱ्यांनाच देशाचे शत्रू ठरवू ठरवू लागले आहेत. मोदीना विरोध म्हणजे देशाला विरोध का हो? अंधभक्ती हा मानसिक आजार मानावा का?
  • Log in or register to post comments

२०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला.

मारवा
Sun, 05/04/2025 - 18:13 नवीन
कुठलीतरी निश्चीत बाजू घ्यावीशी वाटणे नव्हे ती तशी असणे असे वाटणे ही एक सर्वसाधारण मानवी मनाची कन्सीस्टन्सीची गरजच असावी. म्हणजे व्याख्ये सारखं अनेकांना प्रत्येक बाबतीत एका निश्चीत व्याख्येची गरज भासते. व्याख्या जितक्या प्रमाणात अस्पष्ट संदिघ्द असेल तितक्या प्रमाणात अस्वस्थता स्ट्रेस वाढत जातो. उदा. सध्याचा राष्ट्रवाद हा मुद्दा यावरुन मग कुठली बाजु उचलुन धरायची हा निवडीचा तणाव निर्माण होतो. सत्य वा व्यक्ती वा तथ्य हे स्थितीशील नसुन गतीशील असल्याने व सतत परीवर्तनशील असल्याने त्याला असं निश्चीत पॅटर्न मध्ये पकडणं शक्य नसतं हे एकीकडे व बाजु घेण्याचा दबाव दुसरीकडे या पेचात बरेचदा अडकायला होतं मॉब लिंचींग मध्ये किंवा रॅगींग मध्ये जर आपण पिडिताची बाजु घेतली तर आपल्यावरही तोच प्रसंग गुदरेल या भितीने मॉब ची बाजु जरी चुकीचा असेल तरी घेतली जाते. इथे संस्थळावरील चर्चेतही जर आपण वेगळी बाजु मांडली तर टीका होइल असा दबाव असु शकतो +१ ही प्रतिसाद शैली बहुतांश या दबावप्रेरणेतुन येत असावी. हो हो मी ही तुमच्या बरोबरच आहे. मोदी हा एक रोचक फॅक्टर इथे आर्वजुन नमुद करावासा वाटतो म्हणजे मोदी च्या बाबतीत मिक्स्ड फीलींग्ज असु शकतात पण त्यांच्या समर्थक वा विरोधक दोघांना दोन्ही कडे प्रसंगानुरुप बाजु घेणे मंजुर नसते या तो तुम हमारे साथ हो..................... असा बालिश आग्रह असतो. आता यात संधीसाधुपणा हा ही एक भाग आहे म्हणजे सोयीस्कर कुठलीच बाजु न घेणे पॉलिटीकली करेक्ट असणे पणं आता हा फरक की अमुक एक पॉलिटीकली करेक्ट वागतोय की जेन्युइनली त्याला एकाच वेळेस अनेक बाबी पटतातही व नाहीही थोडक्यात जेन्युइनली मिक्स्ड इमोशन्स वा कन्फ्युज्ड आहे. जे फंडामेंटलीस्ट आहेत मग कुठल्याही बाबतीत धर्म च नव्हे विचारसरणी त्यांच्यात कमालीचा ठामपणा आढळतो आकर्षक उद्दाम सोपा पण अंतिमत: घातक ठामपणा काळे वाइटच..... अ‍ॅलोपॅथी वाइटच.......... पैसा हवाच..... आत्मा आहेच..........................इ.इ. त्याउलट जितका विचारी संवेदनशील माणुस तितका बिचारा कनफ्युज्ड आढळतो कुठला झेंडा घेऊ मी हाती ? काही फॅक्ट्स च मोठ्या घोळदार असतात उदा भारतीय अध्यात्मातील ब्रह्म ते असे आहे ते तसे आहे ते इथे आहे ते तिथे आहे ते आहे ते नाही ते अमुक ते तमुक थोड्या वेळाने आपण फक्त गोल च फिरतोय असा भास होतो चक्कर येउ लागते. असो
  • Log in or register to post comments

शंभरावा प्रतिसाद!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/04/2025 - 18:57 नवीन
शंभरावा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

जितका बिनडोक, तितका ठाम

स्वधर्म
Sun, 05/04/2025 - 22:13 नवीन
>> जे फंडामेंटलीस्ट आहेत मग कुठल्याही बाबतीत धर्म च नव्हे विचारसरणी त्यांच्यात कमालीचा ठामपणा आढळतो आकर्षक उद्दाम सोपा पण अंतिमत: घातक ठामपणा - सहमत. जे कृष्णमूर्ती यांचे विधान आठवले: Confident human being is a dead human being - त्याचमुळे टोकाचे उजवे लोक आपल्या महानेत्यावर प्रचंड विश्वास ठेवतात व विरोधी मत असलेल्या लोकांना, त्यांच्या नेत्यांना अत्यंत कमी लेखून त्यांचा कमाल अपमान करायचा प्रयत्न करतात. याची उदाहरणे या लेखात ठाईठाई दिसत आहेत. टोकाचे डावेही कदाचित हेच करत असावेत. >> जितका विचारी संवेदनशील माणुस तितका बिचारा कनफ्युज्ड आढळतो. बरोबर. जितका बिनडोक, तितका ठाम हा वरील विधानाचा व्यत्त्यास होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे

श्रीगुरुजी
Sun, 05/04/2025 - 23:53 नवीन
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे. उपरोधाने लिहिले नाही असे गृहीत धरतोय. सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवून नराधम भिंद्रनवाले व शेकडो अतिरेक्यांना मारणे हे अत्यावश्यक पुण्यकर्म होते. हे खूप आधीच व्हायला हवे होते.. निवडणुकीवर डोळा ठेवून खूप उशिरा ही कृती केली, परंतु ती योग्य कृती होती. सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून भिंद्रनवालेला मारून इंदिरा गांधींनी त्याला मोठे करण्याच्या आपल्या पापाचे परिमार्जन केले होते. या कामगिरीचे नेतृत्व करणाऱ्या जनरल अरूणकुमार वैद्य यांची दुर्दैवाने जिंदा आणि सुखाने हत्या केली. नंतर त्यांनीच मॉडेल कॉलनीतील युनियन बँकेवर दरोडा टाकून तेथील शिपाई भगवान भरगुडेचीही हत्या केली. पण नंतर त्यांनाही फासावर चढवून आपली पापे फेडावी लागली.
  • Log in or register to post comments

असो.

प्रसाद गोडबोले
Mon, 05/05/2025 - 01:54 नवीन
असो. कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे. Temples are islands of religious sovereignty. State and state forces have no business to interfere with its matters whatsoever. मी माझे स्पष्ट मत मांडले. I want every Hindu temple to be treated like Vatican City. पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !! असो. पण हा फाट्याने फाटा फुटत गेलेला विषय आहे . ह्याचा मूळ पहलगाम आणि मोदी द्वेषी लेखाशी संबंध नसल्याने मी अवांतर काहीही बोलू इच्छित नाही पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू. कोलांट्याउड्या बास आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

State and state forces have

श्रीगुरुजी
Mon, 05/05/2025 - 08:16 नवीन
State and state forces have no business to interfere with its matters whatsoever. हजारो निष्पाप नागरिकांना ठार मारून सुवर्णमंदिरात लपलेल्या आणि पाकिस्तानशी हातमिळवणी करून देशविरोधी कृत्य करणाऱ्या क्रूर देशद्रोह्यांना यमसदनास पाठविण्यासाठी सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून ठार मारणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. तेथील कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी सैन्य गेले नव्हते. तेथे बॉम्ब व बंदुकांचा साठा करून लपून बसलेल्या क्रूर देशद्रोह्यांना ठार मारणे अत्यावश्यक होते. पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !! अतार्किक हास्यास्पद विधान. पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू. जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झालेल्या अयोध्येतील श्रीराममंदिराचे पडसाद ३ महिन्यांनतर झालेल्या निवडणुकीत पडले नव्हते. मग २०२९ निवडणूक तर अजून ४ वर्षे अंतरावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कोणत्याही मंदिरात सेक्युलर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/05/2025 - 11:47 नवीन
कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे. कोणतेही मंदिर मशीद, दर्गा, चर्च असो, त्यात देशद्रोही घुसले असतील तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करायला हवी हे अत्यंत पुण्यकर्म आहे. मंदिरापेक्षा देश महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कुठल्या आधारावर असली विधाने करतात......

कर्नलतपस्वी
Mon, 05/05/2025 - 00:54 नवीन
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत अतार्किक विधाने आहेत.

श्रीगुरुजी
Mon, 05/05/2025 - 08:06 नवीन
अत्यंत अतार्किक विधाने आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

ब्लू स्टार ऑपेरेशन योग्यच

रात्रीचे चांदणे
Mon, 05/05/2025 - 08:28 नवीन
ब्लू स्टार ऑपेरेशन योग्यच होते. नाहीतर धार्मिक स्थळं ही गुन्हेगारांचे अड्डे बनले असते. नाहीतर करा बलात्कार लपा तिथं जाऊन. करा बॉम्ब स्फोट लपा जाऊन. हे असले प्रकार घडले असते.
  • Log in or register to post comments

योगायोग...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2025 - 11:20 नवीन
लालकृष्ण अडवाणी, जे त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते होते, यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींना तेव्हा विरोध केला. त्यांनी या आरक्षणाला 'जातीयवाद' म्हटले आणि त्याचा विरोध करण्यासाठी 'रथयात्रा' काढली. आजचा भारतीय जनता पक्ष आणि नेते पुन्हा जातजनगणने द्वारे पुन्हा 'आरक्षणाकडे' घेऊन जाणार आहेत. मंडलला विरोध करीत लोकांचे लक्ष 'रथयात्रे'त लोकांना नेले. आज भाजपा 'पहलगाम' कडून देशाला कुठे कुठे जातो ते पाहणे रोचक ठरणार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भाजपेयी विश्वासार्ह्य नाहीत!

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/05/2025 - 11:44 नवीन
भाजपेयी विश्वासार्ह्य नाहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगायोग नाही

स्वधर्म
Mon, 05/05/2025 - 21:14 नवीन
चुकीच्या धारणा असतील तर काळच भानावर आणतो असे म्हणावे लागेल. जसे की आपल्या मातृसंस्थेवर बंदी घालणार्‍या नेत्याचाच पुतळा उभा करावा लागणे. तथापि, ही १८० अंशात मारलेली कोलांटी हा नक्कीच योगायोग नसावा, कारण.. नजिकच्या कालावधीसाठी: पहलगामपेक्षा मोठा दुसरा विषय लोक व माध्यमांना चघळायला देणे. हे तर जमलेले आहे. लोक पंप्र काश्मीरला गेले नाहीत, पिडीतांना भेटले नाहीत, हे विसरले व जातनिहाय जनगणनेवरच बोलू लागले. लांबच्या कालावधीसाठी: भाजप सारखा पक्ष जिंकल्याच्या दुसर्या दिवसापासून पुढील निवडणूक जिंकण्याची रणनीती आखू लागतो. काँग्रेसचा अजेंडा पळवून नितिश कुमार यांना कोपर्‍यात ढकलणे हा डाव असावा बहुतेक. किंवा खरे तर नुसतीच हूल दिलेली असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2025 - 22:17 नवीन
सहमत. पण, ''नजिकच्या कालावधीसाठी: पहलगामपेक्षा मोठा दुसरा विषय लोक व माध्यमांना चघळायला देणे'' ते आता सध्याची परिस्थिती पाहता राजकीय हितासाठी कोणतीही अशी चघळायची 'गोळी' परवडणारा नाही, हे त्यांच्या धुरीणांनाही कळते. पहलगामच्या मुद्यावर सरकारला निर्णायक मुद्यांवर जाणे आवश्यक वाटत आहे. सर्वपक्षीय पाठींबा आहे. सर्वच ठिकाणी 'चणे फुटाण्याचा' प्रसाद देऊन सर्वच खुश होतील असे त्यांनाही वाटत नाही. पहलगामच्या घटनेमुळे सरकार व्यथित झाले नसेल पण सर्वसामान्य जनता दु;खी आहे. 'हिसाब जरुरी है' याचा एक दबाव आहे. प्रतिमा जपायची तर, आता पाऊल टाकावे लागेल. भले सीमेवर जाऊन परत येणे का होईना तशी कार्यवाही करावी लागेल. एक दोन दिवस युद्धजन्यस्थिती किंवा सीमेशेजारील अतिरेकी तळांवर मारा करणे आणि पाकिस्तानात गडबड पसरवून मग आंतरराष्ट्रीय गटाकडून 'शस्त्रसंधी, थांबा, चर्चा करा, वाट पाहा,सबूरीने घ्या' इथपर्यंत येईपर्यंत एक चटका पाकला द्यावा इतपत तयारी भारत करेल तेव्हा सरकार आणि भाजपाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. आता त्या पातळीवर जाता येईल काय ? इतकंच त्यांच्या हातात आहे. बाकी, 'विकास' वगैरेचा प्रकाश झोत तर डोळ्यांना सहन होत नाही इतका तीव्र आहे. सद्य सरकारच्या राजकीय अस्तीत्वासाठी 'छोटंसं' का होईना युद्ध गरजेचं आहे. नसता. पुढील निवडणूकीत 'जहाल भाजप' 'मवाळ भाजप' 'काँग्रेस सदृश भाजप' अशा निरनिराळ्या 'भाजपाच्या' नव आवृत्त्या निवडणूकीत दिसतील असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

पहलगामच्या घटनेमुळे सरकार

वामन देशमुख
Mon, 05/12/2025 - 18:16 नवीन
पहलगामच्या घटनेमुळे सरकार व्यथित झाले नसेल
हे सन २००८ नसून २०२५ आहे, याचा विसर पडला की अशी विधाने केली जातात. बाकी...
'विकास' वगैरेचा प्रकाश झोत तर डोळ्यांना सहन होत नाही इतका तीव्र आहे.
...सहमत आहे. मागच्या दहा-बारा वर्षांत भारताने खरंच नेत्रदीपक प्रगती केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री मोदी काही करत नाहीत हे

सुबोध खरे
Tue, 05/13/2025 - 09:48 नवीन
श्री मोदी काही करत नाहीत हे घसा खरवडून ओरडून ओरडून घसे बसले आणि जी वस्तुस्थिती बाहेर येते आहे त्यामुळे बऱ्याच मोदी रुग्णांची फार जळजळ होत आहे. त्याला काही इलाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको

मारवा
Mon, 05/05/2025 - 12:11 नवीन
आरक्षणाची आवश्यकता असणे, दुर्बल समाज घटकांना संधी आणि प्रतिनिधित्व,तसेच सामाजिक न्याय हे सर्व योग्यच आहे मात्र कुठल्याही परिस्थिती 50 टक्के ची भिंत कुठल्याही परिस्थितीत पाडली जाऊ नये. यामुळे मूलभूत eqalitty आणि. meritocracy दोन्ही तत्वे मातीमोल होतील. याला व राहुल गांधीच्या या असंवैधानिक, अतात्विक व अन्याय्य मागणीला ठाम विरोध केला पाहिजे. (अगोदरच सुप्रीम कोर्टाच्या इंद्र साहनी केस मधील कच्च्या ढिसाळ निकालाचा फायदा उचलून, मतपेटीच्या संकुचित राजकारणासाठी, (तामिळनाडू सारख्या काही राज्यांनी अगोदरच 50 टक्के सीमा पार केलेली आहे.) येथे सुप्रीम कोर्टाने जरी अपवादात्मक स्थितीसाठी अट दिलेली होती तरी तरतुदी पुरेशा कडक न ठेवल्याने याचा पुरेपूर फायदा उचलून 50 टक्के भिंत पाडण्याचे पुरेपूर राजकीय हेतूने प्रयत्न होत आहेत. हे फार चुकीचे आहे होत आहे.
  • Log in or register to post comments

तरीही तामिळनाडू मोदींच्या

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/05/2025 - 12:43 नवीन
तरीही तामिळनाडू मोदींच्या गुजरात नी योगीच्या यूपीपेक्षा जास्त विकसित कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अगदी रास्त प्रश्न आहे

स्वधर्म
Mon, 05/05/2025 - 21:18 नवीन
तामीळ्नाडू हे शिक्षण, साक्षरता, स्त्रियांची सुरक्षितता, आर्थिक बाबतीत बिमारू गाय पट्ट्यातील राज्यांपेक्षा खूप पुढे आहे. त्यांनी दिलेल्या जीएसटी मधून त्याना व महाराष्ट्रासारख्या राज्यांना खूप कमी परतावा मिळतो व बिमारू मागास राज्यांना जास्त पैसे दिले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८०

सुबोध खरे
Tue, 05/06/2025 - 09:58 नवीन
तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० पासूनचे आहे आणि इंद्रा साहनी चा निकाल १९९२ मध्ये आला. त्यानंतर हे आरक्षण मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केले होते पण त्यावर तामिळनाडू विधानसभेत विधेयक पास करून घेतले कि हे आरक्षण ६९ % पर्यंत असावे. यानंतर तामिळनाडू चे सर्वपक्षीय मंडळ राष्ट्रपतींना भेटून हे आरक्षण घटनेच्या ९ व्य परिशिष्टात टाकण्यात आले. याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही https://www.thenewsminute.com/tamil-nadu/how-tamil-nadu-s-reservation-stands-69-despite-50-quota-cap-146116 इंद्र साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा पूर्णपीठाने सरसकट क्रिमी लेयर लावा असे बहुमताने स्पष्टपणे लिहिलेले आहे. परंतु नोकरशाही आणि लोक प्रतिनिधी यांच्या स्वतःच्या मुलांच्या फायद्यासाठी हा क्रिमी लेयर लावला जात नाही. उत्तम खोब्रागडे या आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीला आरक्षण देऊन आय एफ एस मध्ये जागा कशासाठी? तिच्या ऐवजी त्याच जातीतल्या एखाद्या जास्त पात्र उमेदवाराला हीच जागा देता आली असती. उद्या होणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुलांना आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूलभूत तत्वाला (अंत्योदय) काळिमा फासणारे आहे. ( खोब्रागडें गवई हि प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

याविरुद्धचा खटला सर्वोच्च

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 10:12 नवीन
याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला. त्याविरोधात तात्काळ उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यासाठी ३ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले. या खंडपीठाने अत्यंत संथ गतीने सुनावणी सुरू केली. ६०% सुनावणी पूर्ण झाल्यानंतर एका न्यायाधीशाची बदली केल्याने आधीचे सर्व कामकाज रद्द झाले. आता तिसरा न्यायाधीश नेमून नव्याने सुनावणी होणार असे सांगितले गेले. फिर्यादी पक्षाने जानेवारी २०२५ मध्येच तिसरा न्यायाधीश नेमून सुनावणी करावी असा अर्ज दिलाय. परंतु ४ महिने उलटल्यानंतरही तिसरा न्यायाधीश नेमला जात नाही. सुनावणी पूर्ण झाली तर हा कायदा रद्द होईल. त्यासाठी सुनावणीच टाळणे हे राज्य सरकार करीत आहे व न्यायालयाची त्यांना साथ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

न्यायालयात न्याय मिळतोच असे

सुबोध खरे
Tue, 05/06/2025 - 10:20 नवीन
न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही. न्यायालयात निकाल मिळतो तो हि वेळेत मिळेल याची खात्री नसते. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात आगीत जळत असलेल्या नोटांच्या बद्दल तीन न्यायाधीशांचा अहवाल आता दीड महिन्यांनी आला आहे. सामान्य माणसाच्या घरात असं काही सापडलं असतं तर आतापर्यंत तो पोलीस/ न्यायालयीन कोठडीत खितपत पडला असता. हे लोक सामान्यातील असामान्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

फेब्रुवारी २०२४ मध्ये

आग्या१९९०
Tue, 05/06/2025 - 10:38 नवीन
फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला गरीब कोणत्या अर्थाने? मराठा समाजावर सामाजिक अन्याय झाल्याचा पुरावा कोणता? मराठा समाजाने राखीव जागांची मागणी करून बौद्धिक मागासलेपण दाखवू नये. उद्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी आर्थिक दृष्ट्या गरीब मराठी वर्गाला त्याचा फार फायदा होणार नाही. मराठा समाज दुभंगला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सांख्यिकीने कोणतीही गोष्ट

सुबोध खरे
Tue, 05/06/2025 - 11:41 नवीन
सांख्यिकीने कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते एक सत्य सोडलं तर घटनेतील आरक्षणाच्या मूलभूत विचाराप्रमाणे केवळ सामाजिक मागासलेपण हा आरक्षणाचा निकष आहे, आर्थिक मागासलेपण नाही आहे. या निकषात मराठा समाज कोणत्याही बाबतीत बसत नाही. सर्व तथाकथित उच्च जाती मध्ये गरीब आणि पिचलेले लोक आहेतच परंतु ते सामाजिक उतरंडीत मागासलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यास घटनात्मक आधार नाही. आपल्या ३३ % लोकसंख्येच्या आधारावर मतपेटी बनवून collective bargaining म्हणतात त्याप्रमाणे काही मराठा नेत्यांनी आपल्या राजकीय उद्धारासाठी हा मुद्दा ज्वलंत ठेवलेला आहे. बहुतांशी शिक्षण संस्था या मराठा समाजाच्या पुढाऱ्यांच्या हातात आहेत परंतु त्यांनी आपल्या समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी काही विशेष केल्याचे दिसत नाही. केवळ मतपेटीच्या आधारावर आपल्या मागण्या पदरात पडून घ्यायच्या हि राजकीय खेळी सर्वच करत आले आहेत. यात मागासवर्गीय नेते आणि मुसलमान नेते अग्रगणी होते यात आता मराठा नेत्यांची भर पडली आहे. आणि मताच्या राजकारणात कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता मराठा समाजाला आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे असे म्हणून राजकीय आत्महत्या करणार नाही. मग ते श्री शिवाजी महाराजांचे वंशज असोत कि कोणत्याही पक्षातील राजकीय नेते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

फक्त ८ दिवसात १५० प्रश्न

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 13:49 नवीन
फक्त ८ दिवसात १५० प्रश्न असलेली प्रश्नावली १४ कोटी नागरिकांकडून भरण्याचे सर्वेक्षणाचे नाटक करून मागासवर्गीय आयोगाने काढलेले निष्कर्ष - १. माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याची आणि पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्याची मराठा समाजाची पातळी कमी आहे. २. आर्थिक मागासलेपणा शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा आहे. ३. दारिद्र्य रेषेखाली असलेली आणि पिवळी शिधापत्रिका असलेली मराठा कुटुंबे २१.२२ टक्के, दारिद्र्य रेषेखाली खुल्या प्रवर्गातील कुटुंबे १८.०९ टक्के आणि मराठा कुटुंबाची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा (१७.४) टक्के अधिक असून ती असे दर्शवते की ते आर्थिकदृष्ट्या मागास आहे. ४. सार्वजनिक नोकऱ्यांच्या सर्व क्षेत्रांमध्ये (सरकारी) मराठा समाजाचे अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून सेवांमध्ये पर्याप्त प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीने ते विशेष संरक्षण देण्यास पात्र आहे. ५. दुर्बल मराठा समाजाच्या आर्थिक आकडेवारीवरून स्पष्ट होते की खुल्या प्रवर्गात मोडत नसलेल्या वर्गाच्या तुलनेतही मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती निम्न आहे. ६. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, आत्महत्या केलेल्या व्यक्तींपैकी ९४ टक्के व्यक्ती मराठा समाजातील आहेत. ७. दुर्बल मराठा समाजाचा उत्पन्नाचा आर्थिक स्रोत कमी होत मराठा समाजाला माथाडी कामगार, हमाल, शिपाई, सफाई कामगार, मदतनीस, घरगुती कामगार, डबेवाले, वाहनचालक इत्यादींकडून दिल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून राहावे लागत आहे. शेतीतून मिळणारा परतावा कमी होणे, धारण जमिनीचे तुकडे होणे, शेतीशी संबंधित असलेली प्रतिष्ठा गमवणे, इत्यादी घटकांमधून मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळली. ८. दुर्बल मराठा समाज इतका वंचित वर्ग आहे की त्याला विद्यमान मागासवर्गापेक्षा वेगळे वर्गीकरण करणे गरजेचे आहे, असे आयोगाला आढळून आले आहे. ९. मराठा समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के असल्याचे आयोगाला आढळून आले आहे. १०. मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांचा वर्ग म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. ११. मराठा समाजाला विद्यमान राखीव प्रवर्गापासून विभिन्न आणि स्वतंत्र टक्केवारीच्या प्रमाणात वेगळा समाज घटक समाजण्याची गरज आहे. यासाठी पर्याप्त टक्केवारीची तरतूद राज्य सरकार करू शकेल. यातील निष्कर्ष क्र. १ ते ८ अत्यंत अविश्वसनीय व अनाकलनीय आहेत. अनेकांनी हे जाहीर सांगितले होते की सर्वेक्षणासाठी त्यांच्याकडे कोणीही गेले नव्हते. आमच्याकडे एक माणूस आला होता. त्याने फक्त घरातल्यांची नावे लिहून घेतली व काहीही न विचारता निघून गेला. मराठा अत्यंत मागास, गरीब, शिक्षण न मिळालेले, शतकानुशतके सामाजिक अन्याय सहन करणारे आहेत असे निष्कर्ष काढायचे व ते दाखवून राखीव जागा द्यायच्या हे आधीच ठरले होते. म्हणूनच सर्वेक्षणाचे नाटक करण्यात आले. हेच नाटक २०१४ व २०१८ मध्ये करून राखीव जागा दिल्या होत्या व दोन्ही वेळा न्यायालयाने मराठा मागास असल्याचे निष्कर्ष नाकारून राखीव जागा रद्द केल्या. यावेळीही तेच होणार असल्याने न्यायालयाशी संगनमत करून खटल्याची सुनावणी होऊन दिली जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चांगली माहिती.

Bhakti
Tue, 05/06/2025 - 13:38 नवीन
चांगली माहिती. मग १९८० च्या आधीच मराठा आरक्षण मिळवायला हवं होतं.मी तर जो मागेल त्याला आरक्षण मिळावं असे म्हणते.शेवटी कोणीही असो माणसालाच पुढे न्यायचे आहे. होय क्रीमी लेयरचा नियम मात्र तंतोतंत पाळलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास equality चे तत्व भंग होईल.

मारवा
Tue, 05/06/2025 - 14:08 नवीन
भारतीय राज्यघटने च्या basic structure of constitution ज्यामध्ये principle of equality सुध्दा येते. हे doctrine सुप्रीम कोर्टाने दिलेल्या केशवानंद भारती तसेच इतर महत्वाच्या खटल्यात स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. आणि केवळ या मुळेच संसदेने सुद्धा एखादा कायदा पास केला की जो या basic structure उल्लघन करतो तो पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार आहे. कारण सर्वोच्च न्यायालय हे भारतात राज्यघटनेचे सर्वोच्च अधिकारी interpreter मानले गेलेले आहेत. आणि यासाठीच याच आधारावर इंद्र साहनी केस मध्ये 50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास ते principal of equality चे भंग होईल.म्हणूनच 50 टक्केची मर्यादा आखून दिली. तसेच अती अपवादात्मक स्थितीत केवळ तिला वाढवण्याची परवानगी दिली होती. माया मते ही अपवाद मंजूर करणे ही सुप्रीम कोर्टाची सर्वात चुकीचा निर्णय होता. कारण आरक्षण हा right नाही हे एक well established legal तथ्य आहे. जेव्हा ओपन वर्गाला 50 टक्केपेक्षा कमी जागा राहतील तेव्हा हे सरळ सरळ घटनेचे उल्लघन आहे. जे की उघड उघड अन्याय असे आहे व घटनाविरोधी आहे. सुप्रीम कोर्टाच्या अपवादात्मक तरतुदी cha अत्यंत गैरवापर राजकीय हेतूने होत आहे. म्हणून मागेल त्याला आरक्षण अशी भूमिका सर्वथा चुकीची आहे जर त्यात या मर्यादेचे भान नसेल तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मुळात मागासवर्गातील पात्र

सुबोध खरे
Tue, 05/06/2025 - 18:23 नवीन
मुळात मागासवर्गातील पात्र उमेदवारांना खुल्या प्रवर्गात प्रवेश घेता येतोच कि. म्हणजेच आरक्षणापेक्षा त्यांना जास्त जागा उपलब्ध आहेतच. त्यांना अधिक आरक्षण देण्यापेक्षा सक्षम करून खुल्या प्रवर्गात स्पर्धेत उतरवायला हवे. परंतु मतपेटीच्या राजकारणामुळे असे उघडपणे कोणताही पक्ष किंवा नेता म्हणतच नाही हीच तर शोकांतिका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला विरोध केला होता. कारण आरक्षण दिल्यास कोणीही पुढे येण्यास तयार होणार नाही हि त्यांची भीती होती. ती संपूर्णपणे सार्थ होताना दिसते आहे. चंद्रावर अंतराळ वीर पाठवण्याच्या रांगेत चांद्रयानात २७ टक्के मागासवर्गीय, २३ टक्के इतर मागास वर्गीय, १५ टक्के आदिवासी , १५ टक्के धार्मिक मागासवर्गीय, १९ टक्के आर्थिक मागासलेले आणि जर जागा शिल्लक राहील्यास दोन अंतराळवीर अशी मांडणी होईल. जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

जातीवर आधारित आरक्षण शिगेला

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 18:50 नवीन
जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे. शाहू महाराजांनी जातीआधारित आरक्षण देऊनच अनेक जातींचा पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष केला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

किती सहज, किती निष्पाप

स्वधर्म
Wed, 05/07/2025 - 21:03 नवीन
>> उद्या होणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुलांना आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूलभूत तत्वाला (अंत्योदय) काळिमा फासणारे आहे. नुकतेच निवृत्त झालेले सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे वडीलही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. तसेच त्यांचा मुलगाही अत्यंत तरूण वयात सरकार तर्फे अनेक मह्त्वाच्या प्रकरणांत थेट उच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. सध्याचे न्यायाधीश खन्ना यांचे चुलतेही सरन्यायाधीश होते. न्यायव्यवस्थेत तर कुठे आरक्षण नाही. पण 'ते' अदृश्य आरक्षण बरोबर काम करतेच आहे. फक्त गुणवत्तेचा ध्यास लागलेल्या हुषार पण 'निष्पाप' लोकांना घटनेद्वारे सामाजिक मागासलेल्यांना मिळणारे आरक्षण अगदी डाचते, पण वरील 'आरक्षणात' काही खटकत नाही. मुळात त्यांना ते लक्षातच येत नाही. मात्र त्यांना अजून गवई सरन्यायाधीश व्हायच्या आधीच आरक्षण लागू होऊन त्यांची मुले पदावर बसतील अशी चिंता लागली आहे. अवांतरः काही दिवसांपूर्वी आरक्षण नसलेल्या न्यायव्यवस्थेतील एका न्यायमूर्तींच्या घरी नोटांचे घबाड आढळले होते. प्रकरण संथ गतीने सुरू राहील व ते कार्यरतही राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

साफ चुकीचा अर्थ लावलाय.

सुबोध खरे
Fri, 05/09/2025 - 20:35 नवीन
साफ चुकीचा अर्थ लावलाय. माझे म्हणणे एवढेच होते कि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या मुलांना जर केवळ मागासवर्गीय घरात जन्माला आले आहेत म्हंणून आरक्षण दिले गेले तर मुळातील "अंत्योदय" या कल्पनेलाच काळिमा फासला जाईल. क्रिमी लेयर सरसकट का लावायला हवा यासाठी दिलेले ते उदाहरण आहे. अशा उमेदवारा ऐवजी मागास जातीतील दुसरा संधी न मिळालेला उमेदवार जास्त पात्र ठरतो एवढेच म्हणणे आहे वशिला ( NEPOTISM) आणि आरक्षण हे दोन वेगळे मुद्दे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी

स्वधर्म
Fri, 05/09/2025 - 21:57 नवीन
क्रीमी लेयर लावावा हे तत्व मलाही मान्य आहे. मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी. चंद्रचूड हे एक उदाहरण आहे, जे फक्त घराणेशाहीने घडले असे नाही. तथापि घडलेले उदाहरण तुमच्या लक्षात आले नाही पण गवई यांच्या बाबतीत अजून जे घडलेच नाही, ते मात्र लगेच लक्षात आले! मुद्दा असा होता की केवळ मागासवर्गीय घरात जन्माला आला म्हणून आरक्षणाने एखाद्याला संधी मिळते याचे आपणांस जेवढे दु:ख होते, तेवढे... केवळ प्रस्थापित सामाजिक स्तरात (उच्चवर्णीय आणि त्यामुळे आपसूकच मिळालेले नेटवर्क, सामाजिक भांडवल, उच्च पद इ.) जन्माला आलेले लोक ज्या प्रकारे आरक्षण भोगत आलेले आहेत, त्याचे दु: ख होते का? अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण २२.५% आज ७५ वर्षे आहे. पण - आजपर्यंत २४५ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यात फक्त ७% च दलीत का आहेत? - पण आय ए एस मधे आज रोजी अनुसूचित जाती व जमातीचे फक्त ८% लोक आहेत. बाकीचे सर्व लोक कुठून तिथे पोहोचतात? - इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. हे असे का आहे? इथे कोणते आरक्षण कार्यरत आहे? ते केवळ प्रस्थापित समाजगटात जन्म झाल्याने मिळाले नाही का? ते कसे मिटवायचे याचा काही विचार तुमच्याकडे आहे की फक्त पदावर असलेल्यांच्या मुलांना फक्त घटनेनुसार असलेल्या आरक्षणाने ते मिळू नये असे वाटते? संदर्भः https://www.youtube.com/watch?v=x1MlD_88kr4&list=FLE5dZfbrUTs-di3rE9DIXaw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विजेंदर यांचा हा व्हिडिओ मी बघितलेला आहे

मारवा
Sat, 05/10/2025 - 06:15 नवीन
यातील काही भागाशी मी सहमत आहे. जिथे सर्वात मोठी अस्पष्टता आणि सहमती नाही तो हा खलील भाग आहे. इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. हे असे का आहे? इथे कोणते आरक्षण कार्यरत आहे? ते केवळ प्रस्थापित समाजगटात जन्म झाल्याने मिळाले नाही का? हे विधान नेमके उलटनप्रश्न सुद्धा उपस्थित करते तिथे नोकरी का मिळवू शकत नाही ? नेटवर्क आणि social capital हा अत्यंत तकलादू लवचिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँक्रिट आधार नसलेला unmeasurable असा निकष आहे. ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांना याच कारणामुळे मिळाली 30 टक्के हे कसे सिद्ध केले ? हा कोणता सर्वे होता नेमका ? आणि हा मुद्दा अगदी जरी मोजायला बसली तरी तो कोणत्या समाजाचे किती नेटवर्क आहे किती social capital आहे हे कसे मोजणार ? Dalit chamber of commerce ही एक दलीत उद्योजकांची संघटना आहे, आता 10 जाती आहेत त्यांचे social capital मोजले तर ते मूळात मोजता तरी कसे येईल सर्वात अगोदर त्यांनी हा 30 टक्के समान गुणवत्ता असूनही मिळाली नाही कारण इंटरव्ह्यू घेणारा हा उच्चवर्णीय होता असे बहुधा म्हटले आहे हे नेमके कसे सिद्ध केले ते जाणून घ्यायला आवडेल नंतर हे मोजायचे कसे नंतर या आधारावर द्यायचे कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

रास्त प्रश्न आहे

स्वधर्म
Sun, 05/11/2025 - 20:21 नवीन
> इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. > हे असे का आहे? इथे कोणते आरक्षण कार्यरत आहे? ते केवळ प्रस्थापित समाजगटात जन्म झाल्याने मिळाले नाही का? >> हे विधान नेमके उलटनप्रश्न सुद्धा उपस्थित करते >> तिथे नोकरी का मिळवू शकत नाही ? तुमचा प्रश्न रास्त आहे, पण... समाजात असे सहज दिसते ते तर नाकारता येणार नाही. समाजात आपआपल्या जातीची वर्णाची जाळी आहेत, त्यांच्या संस्था आहेत आणि तिथे संधी त्याच लोकांना मिळते. ज्यांना आधीपासून शिक्षण व सामाजिक स्थानाचा फायदा मिळाला त्यांचे जाळे आधीच तयार आहे जे अधिक वरच्या पातळीवर आणि आधिक व्यापक पसरलेले आहे. यालाच सोशल कॅपिटल म्हणत असावेत. तिथे इतर तथाकथिक कनिष्ठ समजल्या जाणार्‍या वर्णातील लोक का पोहोचू शकत नाहीत? याचे इतर कोणते स्पष्टीकरण देता येईल? उदा. तशा जातीतील सर्वच्या सर्व बुध्दीने कमी आणि आळशी निपजले असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. आता उलट प्रश्न असाही विचारता येईलः विशिष्ट अंगमेहनतीच्या (हमाली, महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी, स्मशानभूमीवर कर्मचारी इ.) काम करणारे उच्चवर्णीय जवळजवळ आढळत नाहीत. ते का? सर्वजणच उत्कृष्ट बौध्दिक क्षमता व कष्ट करण्याची वृत्ती घेऊन जन्माले आले का? खरे तर आरक्षण हा खूप मोठा विषय आहे. जातिनिहाय जनगणनेच्या धाग्यावर बोलण्यापेक्षा स्वतंत्र धागा पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे

वामन देशमुख
Sat, 05/10/2025 - 09:17 नवीन
- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे.
विश्वसनीय संदर्भ वाचायला आवडतील, मग पुढे बोलता येईल.‌ तोपर्यंत हे विधान "अजून सत्यापित नाही" असे गृहीत धरता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे

रात्रीचे चांदणे
Sat, 05/10/2025 - 09:34 नवीन
इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. मी माझ्या ऑफिसचा अनुभव सांगतो. गेले दोन तीन महिने आम्ही नवीन भरती करतोय. एवढे interview घेऊन पण योग्य candidates मिळत नाही. जातं पात बघायची म्हणलं तर शक्यच होणार नाही. Interview panel ला लाथा मारून हाकलून देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील

श्रीगुरुजी
Mon, 05/05/2025 - 21:52 नवीन
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत. मी कोणाच्याही गटात नाही. मी स्वतंत्र विचार करून माझी मते ठरवितो व मते लवचिक ठेवतो जेणेकरून काही नवीन माहिती मिळाली, घटना घडल्या तर आधीची मते बदलू शकतात. मी कोणाचीही अंधभक्ती किंवा अंधद्वेष करीत नाही. पी जी वुडहाऊस यांचे वाक्य थोडे सुधारून सांगतो. I neither hate nor love in plurals.
  • Log in or register to post comments

तुंम्ही नसाल पण

स्वधर्म
Tue, 05/06/2025 - 01:31 नवीन
गोडबोले गट पाडत आहेत ना! त्यामुळे त्यांना प्रतिसाद दिला होता. असो. या बाबतीत तुमचा दृष्टीकोन ठीकच आहे पण गोडबोले यांचे धर्माचे जे काही आकलन आहे त्यानुसार ते या गोष्टीस पाप व इंदिरा गांधी यांना पापी ठरवून त्यांचा 'वध' झाला असे म्हणत आहेत. त्याच्याशी तुंम्ही सहमत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजिबात सहमत नाही.

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 06:53 नवीन
अजिबात सहमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

धन्यवाद

स्वधर्म
Tue, 05/06/2025 - 16:42 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म

कर्नलतपस्वी
Mon, 05/05/2025 - 23:31 नवीन
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत. १९८२ ते १९८५ जळता पंजाब अनुभवला आहे. अमरेन्द बाहुबली यांच्या विधानाची संपुर्ण सहमत. अतिरेकी,देशद्रोही यांचे उच्चाटन करताना कुठलाही मुलाहिजा ठेवू नये. सर्वोच्च हित देशाचे, देशवासीयांचे. पेशवे आपापसातील दुफळी,सत्तालोलुपता, डोईजड सरदार व कर्तृत्वहिन नेतृत्व या कारणांमुळेच लयाला गेले. पाप पुण्य या सापेक्ष कल्पना आहेत. मी हिन्दू आहे,देशप्रेमी आहे आणी याचा मला अभिमान आहे.
  • Log in or register to post comments

तुंम्हाला बरोबर जाणीव आहे

स्वधर्म
Tue, 05/06/2025 - 01:36 नवीन
तुंम्हाला बरोबर जाणीव आहे कारण तुम्ही जळता पंजाब अनुभवला आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी जे करणे आवश्यक होते ते इंदिरा गांधी यांनी त्या वेळी केले हे पटू शकेल. परंतु त्या गोष्टीची प्रत्यक्ष जराही झळ न बसलेली व्यक्ती जेंव्हा इंदिरा गांधी यांचा 'वध' झाला असे म्हणते, त्याच्याशी आपण सहमत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

@स्वधर्म, माझ्या मते ही...

कर्नलतपस्वी
Tue, 05/06/2025 - 03:29 नवीन
इंदिराजींची हत्या झाली आहे. नकारात्मक भावनेने, सूड उगवण्याच्या किंवा एखाद्या चुकीच्या किंवा वाईट हेतूने कोणाला जीवे मारले गेले असेल तर त्याला हत्या म्हणतात. पण समाजासाठी कल्याणकारी भावनेतून , दुर्बळांच्या रक्षणासाठी किंवा स्वरक्षणासाठी एखाद्याला जीवे मारले असेल तर त्याला वध म्हणतात. उदा. रावण वध, कीचक वध, कंस वध. हरमंदिरवर कारवाई झाली नसती तर कदाचित वेगळेच काही घडले असते याची शक्यता नाकारता येत नाही. इंदिराजीनी भारताला सक्षम नेतृत्व दिले आहे व त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे. हत्या वध हा शब्दप्रयोग ज्याच्या त्याच्या राजकीय दृष्टीकोनातून व आकां च्या इच्छेनुसार केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा