पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:
- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.
गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.
हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.
जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.
टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचं चालू द्या
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी
तुमचं चालू द्या
ज्याला कशातलंच काहीच समजत
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला
कठीण आहे मोदींचं. उघड उघड
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी
२०१९ च्या एका चर्चेत हा प्रतिसाद दिला होता तो आठवला.
शंभरावा प्रतिसाद!
जितका बिनडोक, तितका ठाम
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे
सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे.उपरोधाने लिहिले नाही असे गृहीत धरतोय. सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवून नराधम भिंद्रनवाले व शेकडो अतिरेक्यांना मारणे हे अत्यावश्यक पुण्यकर्म होते. हे खूप आधीच व्हायला हवे होते.. निवडणुकीवर डोळा ठेवून खूप उशिरा ही कृती केली, परंतु ती योग्य कृती होती. सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून भिंद्रनवालेला मारून इंदिरा गांधींनी त्याला मोठे करण्याच्या आपल्या पापाचे परिमार्जन केले होते. या कामगिरीचे नेतृत्व करणाऱ्या जनरल अरूणकुमार वैद्य यांची दुर्दैवाने जिंदा आणि सुखाने हत्या केली. नंतर त्यांनीच मॉडेल कॉलनीतील युनियन बँकेवर दरोडा टाकून तेथील शिपाई भगवान भरगुडेचीही हत्या केली. पण नंतर त्यांनाही फासावर चढवून आपली पापे फेडावी लागली.असो.
State and state forces have
State and state forces have no business to interfere with its matters whatsoever.हजारो निष्पाप नागरिकांना ठार मारून सुवर्णमंदिरात लपलेल्या आणि पाकिस्तानशी हातमिळवणी करून देशविरोधी कृत्य करणाऱ्या क्रूर देशद्रोह्यांना यमसदनास पाठविण्यासाठी सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून ठार मारणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. तेथील कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी सैन्य गेले नव्हते. तेथे बॉम्ब व बंदुकांचा साठा करून लपून बसलेल्या क्रूर देशद्रोह्यांना ठार मारणे अत्यावश्यक होते.पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !!अतार्किक हास्यास्पद विधान.पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू.जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झालेल्या अयोध्येतील श्रीराममंदिराचे पडसाद ३ महिन्यांनतर झालेल्या निवडणुकीत पडले नव्हते. मग २०२९ निवडणूक तर अजून ४ वर्षे अंतरावर आहे.कोणत्याही मंदिरात सेक्युलर
कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे.कोणतेही मंदिर मशीद, दर्गा, चर्च असो, त्यात देशद्रोही घुसले असतील तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करायला हवी हे अत्यंत पुण्यकर्म आहे. मंदिरापेक्षा देश महत्वाचा आहे.कुठल्या आधारावर असली विधाने करतात......
अत्यंत अतार्किक विधाने आहेत.
ब्लू स्टार ऑपेरेशन योग्यच
योगायोग...
भाजपेयी विश्वासार्ह्य नाहीत!
योगायोग नाही
+१
पहलगामच्या घटनेमुळे सरकार
श्री मोदी काही करत नाहीत हे
आरक्षणाला विरोध नाही मात्र 50 टक्केची मर्यादा कधीही भंग नको
तरीही तामिळनाडू मोदींच्या
अगदी रास्त प्रश्न आहे
तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८०
याविरुद्धचा खटला सर्वोच्च
याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही.फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला. त्याविरोधात तात्काळ उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यासाठी ३ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले. या खंडपीठाने अत्यंत संथ गतीने सुनावणी सुरू केली. ६०% सुनावणी पूर्ण झाल्यानंतर एका न्यायाधीशाची बदली केल्याने आधीचे सर्व कामकाज रद्द झाले. आता तिसरा न्यायाधीश नेमून नव्याने सुनावणी होणार असे सांगितले गेले. फिर्यादी पक्षाने जानेवारी २०२५ मध्येच तिसरा न्यायाधीश नेमून सुनावणी करावी असा अर्ज दिलाय. परंतु ४ महिने उलटल्यानंतरही तिसरा न्यायाधीश नेमला जात नाही. सुनावणी पूर्ण झाली तर हा कायदा रद्द होईल. त्यासाठी सुनावणीच टाळणे हे राज्य सरकार करीत आहे व न्यायालयाची त्यांना साथ आहे.न्यायालयात न्याय मिळतोच असे
फेब्रुवारी २०२४ मध्ये
सांख्यिकीने कोणतीही गोष्ट
फक्त ८ दिवसात १५० प्रश्न
चांगली माहिती.
50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास equality चे तत्व भंग होईल.
मुळात मागासवर्गातील पात्र
जातीवर आधारित आरक्षण शिगेला
जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे.शाहू महाराजांनी जातीआधारित आरक्षण देऊनच अनेक जातींचा पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष केला!किती सहज, किती निष्पाप
साफ चुकीचा अर्थ लावलाय.
मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी
विजेंदर यांचा हा व्हिडिओ मी बघितलेला आहे
रास्त प्रश्न आहे
- इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे
इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत.मी कोणाच्याही गटात नाही. मी स्वतंत्र विचार करून माझी मते ठरवितो व मते लवचिक ठेवतो जेणेकरून काही नवीन माहिती मिळाली, घटना घडल्या तर आधीची मते बदलू शकतात. मी कोणाचीही अंधभक्ती किंवा अंधद्वेष करीत नाही. पी जी वुडहाऊस यांचे वाक्य थोडे सुधारून सांगतो. I neither hate nor love in plurals.तुंम्ही नसाल पण
अजिबात सहमत नाही.
धन्यवाद
अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण म
तुंम्हाला बरोबर जाणीव आहे
@स्वधर्म, माझ्या मते ही...