Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वधर्म on गुरुवार, 05/01/2025 - 03:49
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे: - पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली. - अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली. - आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते. गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही. हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते. जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे. टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.
  • Log in or register to post comments
  • 38304 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/02/2025 - 22:09

In reply to विषय काय, बोलताय काय.. by स्वधर्म

Permalink

अहो सोप्पंय,

अहो सोप्पंय, जाती निहाय गणना होत आहे त्यात एक साधा प्रश्न विचारायचा १. जातीनिहाय आरक्षणाचा तुमच्यावर काय परिणाम झाला पर्याय 1. आरक्षणाचा लाभ झाला, मला त्या संधी मिळाल्या ज्या ओपन मध्ये मिळाल्या नसत्या. 2. आरक्षणामुळे नुकसान झाले, केवळ जातीमुळे माझ्या संधी हिरवल्या गेल्या. 3. आरक्षणाचा काहीही परिणाम झाला नाही. मला नाही वाटतं की कोणीही मनुष्य ह्या प्रश्नाचे खोटे उत्तर देईल. कारण खोटे उत्तर देऊन फायदा नाही नुकसानच आहे. इतकं सोपं आहे हो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Sun, 05/04/2025 - 22:50

In reply to अहो सोप्पंय, by प्रसाद गोडबोले

Permalink

मूळ प्रश्नालाही उत्तर द्या

>> मोदी व इतर भाजप नेते जातनिहाय जनगणनेच्या राहूल गांधी व काँग्रेसने केलेल्या मागणीची अर्बन नक्षल म्हणून हेटाळणी करत होते. हा देशाला विभागणारा, समाजात दुही माजवणारा विचार आहे असे म्हणत होते. त्यावेळी तुंम्ही कधी जातनिहाय जनगणनेचे समर्थन केले होते का, हे जाणून घ्यायला आवडेल. या मूळ प्रश्नालाही उत्तर द्या. तसेच वरील प्रश्न विचारून काहीही उपयोग नाही. हा सर्व डेटा, व्यक्तीकडे नसून त्या त्या संस्थांकडे आहे. व्यक्ती कदाचित या प्रश्नांची उत्तरे देऊही शकणार नाही, किंवा आपल्या समजेप्रमाणे चुकीची देऊ शकेल. आरक्षण हे मुळी आणलंच आहे ते सकारात्मक भेदभाव करुन पूर्वी ज्यांच्या १००% लोकसंख्येवर अन्याय झाल्या, सर्व संधी नाकारल्या गेल्या, त्यांच्या काही टक्के लोकसंख्येला किमान संधी देण्यासाठी. त्यामुळे पिढ्यानुपिढ्या ज्ञान व संधी घेणार्‍या लोकांच्या संधी व्यक्ती म्हणून कमी होणारच, पण एक देश म्हणून अधिक लोकसंख्येचे भले होणार यात संशय नाही. असो आता मूळ प्रश्नाला उत्तर द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 05/04/2025 - 23:16

In reply to मूळ प्रश्नालाही उत्तर द्या by स्वधर्म

Permalink

मी 1948 पासून जातीनिहाय

मी 1948 पासून जातीनिहाय जनगणनेचे समर्थन करत आहे ! बाकी संख्याशास्त्र, data science, वगैरे मधील काहीही कळत नसून तुम्ही ज्या प्रकाराची विधाने करत आहात ते पाहून तुम्हालाही 2029 गटात टाकायची वेळ आलेली आहे असे जाणवते. तुम्हाला इतकेच मिरची लागली आहे सरकारी निर्णय पाहून तर तुम्ही ह्या सरकार ला 2029 या निवडणुकीत सत्तेतून बाहेर खेचा . आपण त्यानंतर बोलू. पण ते ही नकोच. इतरांचे सोडा, माझ्यावर वैयक्तिक झालेल्या अन्यायाचे तुम्ही ज्या निर्ढावलेपणाने समर्थन करत आहात त्यानंतर मला तुमच्याशी चकार शब्द बोलायची इच्छा नाही. तुमचा विश्वास नसेल पण माझा ठाम विश्वास आहे - ह्या तुमच्या लौकिक न्याय अन्यायाच्या कल्पनंच्यापरे एक श्रेष्ठ न्यायालय आहे जे पाप पुण्याचा हिशेब ठेवत आहे आणि त्या न्यायासना समोर मी ताठ मानेने उभा आहे , माझ्या ज्ञात 3 4 पिढ्यांपैकी कोणीही कोणावर अन्याय केलेला नसताना जे माझ्या आजोबांना , वडिलांना , मला "तुमच्या ह्या असल्या सामाजिक न्याय संकल्पनेच्या मुळे" जे जे भोगायला लागलं त्याचा हिशोब मागत. आणि माझा त्याच्या न्याय बुद्धीवर नितांत विश्वास आहे ! सत्यमेव जयते||
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Mon, 05/05/2025 - 22:09

In reply to मी 1948 पासून जातीनिहाय by प्रसाद गोडबोले

Permalink

>> मी 1948 पासून जातीनिहाय

>> मी 1948 पासून जातीनिहाय जनगणनेचे समर्थन करत आहे ! - वय काय आपले? अशक्य गोष्टी बोलत आहात म्हणून विचारतो. >> बाकी संख्याशास्त्र, data science, वगैरे मधील काहीही कळत नसून - दुसर्‍याला काही कळत नाही सारे सारे काही आपल्यालाच कळते असे तुंम्हाला वाटते. पण दुर्दैवाने तुमच्या लिखाणात तसा पुरावा दिसत नाही. >> माझ्यावर वैयक्तिक झालेल्या अन्यायाचे - ज्यांच्या १००% लोकसंख्येवर अन्याय झाल्या, सर्व संधी नाकारल्या गेल्या, त्यांच्या काही टक्के लोकसंख्येला किमान संधी आता मिळत आहेत, ते तुमच्यासारख्या इतिहासात केवळ एकदा अन्याय झालेल्यांना सहन होत नाही. तुमची पोटदुखी समजू शकतो व मोदी आता ती वाढवण्याच्या मागे आहेत. कसं करायचं? >> माझ्या ज्ञात 3 4 पिढ्यांपैकी कोणीही कोणावर अन्याय केलेला नसताना जे माझ्या आजोबांना , वडिलांना , मला "तुमच्या ह्या असल्या सामाजिक न्याय संकल्पनेच्या मुळे" जे जे भोगायला लागलं... - त्या काळात जी जाळपोळ झाली, ती निंद्य होती, हे कोणीही मान्य करेल. त्याचा इतका कडवटपणा आपण बाळगत असाल तर भटक्या विमुक्तांना तेंव्हा घरेच नव्हती. त्यांची घरे जाळणार कशी? त्यांनी किती राग धरावा? >> मला तुमच्याशी चकार शब्द बोलायची इच्छा नाही. असो. आपण धाग्यावर प्रतिसाद दिला नाही, तर बोलायचे कारण नाही, पण दिलात आणि काहीही अतार्किक मांडणी करून इतरांना कमी दाखवू पहाल, तर काहीही मुलाहिजा न ठेवता चोख उत्तर दिले जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 05/02/2025 - 19:52

In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले

Permalink

कर्वे रानडे आगरकरांच्या

कर्वे रानडे आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळली, जमिनी हडपल्या, त्यांना देशोधडीला लावले, आता लोकांच्या पुढे येईल की महाराष्ट्रात ह्या साडेतीन टक्के लोकांच्यातील किती ब्राह्मण सरपंच आहेत, किती जिल्हापरिषदेत आहेत, किती नगरसेवक आहेत , किती आमदार आहेत. किती लोकांच्या शिक्षणाच्या संधी हिरवल्या गेल्यात, किती लोकांना आरक्षणाची झळ बसली आहे.
प्रगो, भारी मुद्दा आहे ... पण या जाती जनगणनेत व्यवसाय / धंदा / नोकरी अश्या तपशिलांचा पण विदा गोळा करणार का ?
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 05/02/2025 - 20:22

In reply to लेखनाचा विषय चांगला आहे पण by प्रसाद गोडबोले

Permalink

हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो.

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।। परधर्म भयावह आहे हे ठासून सांगून खालच्या वर्णाने वरील वारणा जाण्यास प्रतिबंध केला आहे discourage केलेले आहे. अ.18 क्रमांक 47 चा हा श्लोक तर अती स्पष्ट आहे. श्रेयांस्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् | स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् || अपना धर्म करना , भले ही अपूर्ण रूप से हो, दूसरे का धर्म करने से श्रेष्ठ है , भले ही वह पूर्ण रूप से हो।अपने स्वाभाविक कर्तव्यों का पालन करने से मनुष्य को पाप नहीं लगता। यात तर अती स्पष्टतेने की जरी एखादा स्वतः च्या.धर्मात अपूर्ण असेल कच्चा असेल तरी चालेल पण त्याने ते सोडायलाच नको कधीही. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या धर्मात तो भलेही बेस्ट परफॉर्मर असो त्याने त्याच्या नादी लागू नये असे बजावले जात आहे. भगवद गीते च्या कंपायलर ने काळजीपूर्वक त्यापूर्वी जी भेदभावपूर्ण शोषणाची व्यवस्था होती तिची केवळ भलामण केली आहे असे नव्हे तर आग्रहपूर्वक त्याविरोधी वर्तुणुकीला discourage सुद्धा केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 05/02/2025 - 21:39

In reply to हा श्लोक माझ्या मते जन्माधिष्ठित वर्णव्यस्थेला प्रोत्साहन देतो. by मारवा

Permalink

असं का केलं असावं भगवद्गीतेने

असं का केलं असावं भगवद्गीतेने ? आपण माणसं तरी एखादा निर्णय कसा घेतो त्याक्षणी आपल्याला जे परफेक्ट वाटतं ते आपण करतो. भगवद्गीतेचा मते सनातन धर्मातील वर्णाश्रम व्यवस्था च पार्फेक्ट आहे , सर्वोत्तम आहे, मोक्षप्रत नेणारी आहे. अवांतर : मला हे संशयाच्या कक्षेच्या पार पटते म्हणूनच मी "सनातनी" आहे. यतो धर्म: ततो कृष्ण: यतो कृष्ण: ततो जय: ।।
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/02/2025 - 12:36

Permalink

पहलगाम ते जातगणना

पहलगाम हल्ल्यानंतर, आपला भारत देश पाकिस्तानला कसा प्रत्युत्तर देईल या खयाली पुलावाच्या अंदाजाने समग्र भारतीय मन रात्री-बेरात्री उठून न्युजवर लक्ष ठेवून होते.

photo_2025-05-02_12-06-35
छायाचित्र जालावरुन साभार

कायमच मुळ मुद्यापासून दुर नेण्यात हातखंडा असलेल्या भाजपाने नद्या अडवून पाकिस्तानचा घसा एवढ्यात कोरडा पडत नाही हे भारतीयांना लक्षात आले. भारतीयांचे काही समाधान होत नाही, त्यामुळे भारतीयांचे लक्ष अजून कुठे वळवता येईल त्यासाठी जे काही प्रयत्न सुरु होते, त्यात नद्या अडवल्या, नापाक युट्यूब चॅनल्स हटवले. पण भारतीयांचे काही समाधान होईना त्यामुळे जातीय जनगणनेचं दळन आणल्याची चर्चा माध्यमामधे सुरु आहे. भाजपास माहिती आहे की, धर्मावर निवडणूका जिंकता येतात आणि जातीचा मुद्दा येतो तेव्हा भाजपा बॅकफूटवर जातो तेव्हा बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्या गेल्याचे म्हटले जात असले तरी त्यासाठीचा फायदा आणि सद्य पहलगाववरुन लक्ष हटवणे किती सोपे झाले तो येता काळ ठरवेल. जातजनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी काँग्रेसपक्ष करीत होता. पण, नागपूरहुन हिरवा कंदील मिळत नसल्यामुळे या विषयावर सरकार कायम गप्प राहिले आहे. जातीय जनगणनेची घोषणा केली पण अंमलबजावणी कधी होणार यावर सरकार काहीही बोलणार नाही. आता प.नेहरु यांनी जातगणनेला कसा विरोध होता आणि आम्ही पुन्हा कशी जातजनगणना देशहितासाठी आणली हे पुढे सुरु राहील. महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मधे जातीवर आधारित आरक्षणाची पहिली मागणी केली. विषमतेचे चटके स्वतः भोगले असल्यामुळे त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची सातत्त्याने मागणी केली. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी देशातील पहिले आरक्षण धोरण लागून सामाजिक न्यायाचा पाया घातला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात याच न्याय तत्वाला संवैधानिक दर्जा दिला. तळागाळातील लोक शिकू शिकले सामाजिक न्यायाचं श्रेय या महामानवांना जातं. सद्य सरकार जेव्हा सर्वप्रकारचे आरक्षण बंद करुन टाकेल असे जे स्वप्न पाहात होते आणि ते जे कायम अशा विचारांच्या सरकारला बिनबोभाट मतदान करीत होते त्या सर्व मानसिकतेच्या स्वप्नांचा सरकारच्या दे धक्का धोरणामुळे होतांना दिसतो. जातजनगणना झाली की, सामाजिक बदलांचा अभ्यास होईल आणि आरक्षण धोरणावर पुन्हा चर्चा झडू लागतील. आणि पुन्हा या निमित्ताने गटा-तटाचे पक्षांच्या विविध धोरणाच्या चर्चा होतील. भविष्यात जातजनगणना पुढे कशी जाईल ? भारतीयांसाठी जनगणनेवर आधारित 'धोरण आणि योजना' कशा आणल्या जातील हे पाहणे रोचक ठरणार आहे. सध्या तरी पहलगामची वाट जातजनगणनेवर पोहचली आहे. तुर्तास एवढेच. -दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 05/02/2025 - 13:40

In reply to पहलगाम ते जातगणना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला

उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला तर तुम्ही हे प्रांजळपणे मान्य करणार का की या जनगणना घोषणेचा आणि पहलगाम वरून लक्ष हटवण्याचा काहीच संबंध नव्हता ? कारण जर सरकारने पाकिस्तानवर हल्ला चढवला तर पाकिस्तान मोडून पडण्यापूर्वी तुमचा दावा मोडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/02/2025 - 14:14

In reply to उद्या समजा एक जोरदार हल्ला पाकिस्तानवर केला by मारवा

Permalink

जर तर...

'माध्यमांमधील चर्चा' असे म्हटले आहे. अर्थात आपल्या प्रतिसादातील 'समजा' हा जो भावनेने ओथंबलेला जो शब्द आहे, त्यात सद्य सरकारवरील दयाभाव दिसतो. थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे हे कदापी शक्य नाही, त्यामुळे केला तर वगैरे कल्पना रम्य कल्पनेत रमायची आणि दावा मोडायची शक्यता अजिबातच नाही, असे प्रांजळपणे कबूल करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 05/02/2025 - 14:48

In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 05/02/2025 - 15:21

In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले

जर तर च्या चर्चेत काही अर्थ नाहीच. म्हणजे हा approach चुकीचा आहे. कधी कधी thought experiment मध्ये अशा situations जाणीवपूर्वक दिल्या जातात. उदा. Trolley problem https://en.m.wikipedia.org/wiki/Trolley_problem पण तो वेगळा तात्विक चिंतनाचा भाग झाला. आपल्या येथील चर्चेत जर तर उपयोगाचे नाही फारसे हे खरे आहे. त्याचप्रमाणे माझ्या कानावर असे आलेले आहे की सूत्रांकडून समजले की गावात चर्चा होती की माध्यमांमधील चर्चा यांचा वापरही जबाबदारी झटकणे उद्या उलटलं तर स्पष्टीकरण द्यायला नको असा करू नये होऊ नये असेही वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/02/2025 - 16:03

In reply to खरे आहे तुमचे म्हणणे मला पटले by मारवा

Permalink

अवघड आहे.

कोणत्याही देशावर अथवा अतिरेकी तळावर सरकार म्हणून नियोजित हल्ला करायची ज्यांच्यावर जवाबदारी असते अशा प्रमुखाऐवजी मला अधिकार असते तर, अशा शक्यतांची जवाबदारी मी घेतली असती. हात झटकले नसते. अशा, कोणत्याही व्यवस्थेत नसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अशा घटनांच्या बाबतीत काही गृहीतकृत्यावरुन व्यक्ती परत्वे दृष्टीकोण तयार होतो मतं बनत असतात, माध्यमं आणि माणसं असा विचार कायम करीत असतात, त्यात काहीही वेगळं नसतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 05/02/2025 - 16:49

In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर

बिरुटे सर सध्या "माध्यमांमधील चर्चा " या पांघरूणा मागून लपून पिल्लू सोडत आहेत. जसे गावकरी "गावात अशी चर्चा " आहे की मंजुळा कुंभाराच्या पोराचा हात धरून पळून गेली. हमारे कान पे आया जी वो तो लोग बाते कर रहे थे जी हमे न पूछो मग ते जुन्या हिंदी सिनेमात पाणोठ्यावरच्या बाई म्हणता हमारा तो मूह बंद कर दोगी सारे गाव का कैसे करोगी? असा feel मला तुमच्या गावगप्पा हात झटका शैलीतून आला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/02/2025 - 17:37

In reply to गावात अशी चर्चा आहे की बिरुटे सर by मारवा

Permalink

भावना पोहोचल्या.

एक व्यक्ती म्हणून आपलीच नव्हे अशी अनेकांची कुचंबना होत आहे, आपण ज्याला आपला हीरो समजलो होतो, ज्याच्यामागे मागे आपण भावनिक सट्टा लावला होता, तो असा फकीर निघाल्यावर जो व्हायचा तो त्रास होतोच. माझी पूर्ण सहानूभूती आपल्या पाठीशी आहे. :) --दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 05/02/2025 - 17:50

In reply to भावना पोहोचल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:) You nailed it!

:) You nailed it!
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Fri, 05/02/2025 - 17:01

In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुम्ही युद्धाची जबाबदारी झटकत आहात असे नाही म्हणालो

प्राध्यापक साहेब तुम्ही युद्धाची जबाबदारी झटकत आहात असे कुठे म्हणालो हो मी ? तुम्ही म्हणता तसे खरोखर अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Fri, 05/02/2025 - 15:21

In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 05/02/2025 - 20:27

In reply to जर तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे

थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे हे कदापी शक्य नाही. बिरुटे सर आपली पी एच डी चा प्रबंध भारताच्या लष्करी सामर्थ्याबद्दल आहे कि अर्वाचीन मराठी गद्य वाङ्मयातील सौंदर्यस्थळे या वर आहे कोणत्याही देशावर अथवा अतिरेकी तळावर सरकार म्हणून नियोजित हल्ला करायची ज्यांच्यावर जवाबदारी असते अशा प्रमुखाऐवजी मला अधिकार असते तर, अशा शक्यतांची जवाबदारी मी घेतली असती. PM Modi gives ‘free hand’ to armed forces to respond to Pahalgam terror attack
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 05/02/2025 - 20:46

In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे

Permalink

सैन्याला अधिकार दिले

सैन्याला अधिकार दिले सांगून जबाबदारीतून पळ काढता येतो? इंदिरा गांधीनाही असा पळ काढता आला असता. पण त्या देशप्रेमी होत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sat, 05/03/2025 - 14:46

In reply to सैन्याला अधिकार दिले by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अहो इंदिरा गांधी यांचे कौतुक आणि श्रेय हे त्यांनी दाखवलेल्या

इंदिरा गांधी यांचे कौतुक आणि श्रेय हे त्यांनी दाखवलेल्या political will चे आहे. त्यांनी त्यावेळी कसोटीच्या काळात जे जे धाडसी निर्णय घेतले , मुत्सद्दीपणा दाखवला त्याचे श्रेय आहे. आणि त्यात त्यांच्या कर्तृत्वात काहीही शंका नाहीच नाही. याचा अर्थ त्या सीमेवर बंदूक घेऊन उभ्या राहिल्या आणि पाकिस्तानी सैनिक स्वतःच्या बंदुकीने मारले असा नाही. आणि तसे करावे अशी अपेक्षा सुद्धा नाही. कोणत्याही निर्णयकर्त्याचे राज्यकर्त्यांचे ते काम नाहीच क्षेत्र नाही. त्यासाठी सैन्यदले आहेत. इंदिरा गांधीना त्यांच्या या निर्णयांचे रास्त असे श्रेय दिले जाते. त्याचप्रमाणे नेहरू यांनी सैन्य परत माघारी घेण्याच्या चुकीच्या निर्णयासाठी दोषी धरले जाते. तसेच मोदी यांना या अगोदर केलेल्या strikes चे श्रेय दिले जाते. तसंच आता पहलगाम नंतर काळ ठरवेल की मोदी हे कुठला निर्णय घेतात मात्र त्यासाठी किमान काहीं काळ तरी वाट पाहावी लागेल. त्यांनी काहीही केले नाही की त्यांनी मोठा धडा शिकवला. दोन्हीपैकी कुठलेही विधान सत्य ठरण्यासाठी किमान काही काळ थांबणे क्रमप्राप्त आहे.it is too early to comment हेच सर्वात समजूतदार विधान आपण आजच्या घडीला करू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/03/2025 - 00:26

In reply to थेट 'पाकिस्तानवर' हल्ला करणे by सुबोध खरे

Permalink

डॉ.खरे साहेब...

आपण लष्करात होता आणि डॉक्टर आहात यावर आता विश्वासच राहिला नाही, सर्व अधिकार सैन्याला देणे यात मोठी कर्तबगारी वाटत आहे असे वाटत असेल तर आपण चारीधाम यात्रेला निघायला हरकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 05/03/2025 - 11:50

In reply to डॉ.खरे साहेब... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

श्रीमती इंदिरा गांधी यांनी

श्रीमती इंदिरा गांधी यांनी सुद्धा असेच सर्व अधिकार फिल्ड मार्शल माणेकशॉ याना दिले होते. माणेकशॉ यांनी श्रीमती गांधी याना काही महिने तयारीला लागतील असे सांगितले होते अन त्यानंतर पाकिस्तानची सपशेल शरणागती आली हा दैदिप्यमान इतिहास आहेच One of the chief architects of India’s 1971 victory against Pakistan, Manekshaw is most famously remembered for bluntly telling Prime Minister Indira Gandhi that the Indian Army wasn’t ready for war in April 1971. ' Saying that his job was to fight to win, he asked for a few months’ time — a request which Gandhi, to her credit, accepted. True to his word, when the India-Pakistan war finally broke out in December 1971, Manekshaw delivered India one of its swiftest and most remarkable military victories. पण अर्थात हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात येत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार? तेंव्हा तुमचं चालू द्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sat, 05/03/2025 - 13:03

In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे

Permalink

जी स्थिती भुजबळांची आहे, तीच

जी स्थिती भुजबळांची आहे, तीच स्थिती प्राध्यापकांची आहे. पी.एच.डी. आहे म्हणून उगाच जास्त आशा ठेवण्यात अर्थ नाही. उच्च बुद्धिमत्तेची माणसे STEM सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग माथेमाटिक्स ह्या विषयांमध्ये करिअर करतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, अर्थशास्त्रद्न्य होतात, आपल्याला क्षेत्रात व्यग्र होऊन जातात. आणि मग आपोआपच हुमानिटीज मध्ये मोकळ्या पडलेल्या जागा सुमार बुद्धिमत्तेची माणसे भरून काढतात , आणि ते सो कॉल्ड इंटेलेकचूअल लोकं खरे काम करणाऱ्या लोकांना अक्कल शिकवायला लागतात. हा दैवदुर्विलास आहे. JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 05/03/2025 - 13:42

In reply to जी स्थिती भुजबळांची आहे, तीच by प्रसाद गोडबोले

Permalink

मी आधीच लिहिले आहे.

मी आधीच लिहिले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मिपावरील व भारतातील पाकिस्तानचा निद्रिस्त संघ आणि पाकिस्तानप्रेमी विदूषक एकदम जागे होऊनत्यांना पराकोटीचा आनंद झालाय व ते पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झालेत. विद्यावाचस्पती प्राध्यापक अधूनमधून व्यक्त होतात, पण ते दुसरं यडं सर्व ठिकाणी वेडगळ पिंका टाकत आपलं हसू करून घेतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 05/03/2025 - 23:01

In reply to जी स्थिती भुजबळांची आहे, तीच by प्रसाद गोडबोले

Permalink

JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात

JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ? ज्जे बात. खरोखर शिक्षण घेणारे शिकतात / पदवी घेतात आयुष्यात पुढे जातात. रेम्याडोक्याची शिक्षणाच्या नावाखाली नसते चाळे करतात व नंतर आम्हाला नोकरी नाही म्हणुन गळे काढत शिव्या देतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/03/2025 - 15:20

In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे

Permalink

कहा राजा भोज और ...

>>> तेंव्हा तुमचं चालू द्या... असंच म्हणतो. डॉक्टर साहेब कुठे धाडसी इंदिरा गांधी आणि कुठे प.मोदी. निर्णय घ्यायला धाडस लागतं. भाजपच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी सीमेवर तीन महीने सैनिक नेऊन ठेवले होते आणि परत माघारी बोलावले होते. =)) अर्थात हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात येत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार? लष्करात वैदकीय विभागात असणा-या लष्कराच्या तिन्ही दलाचा अभ्यास असतो ऎसे मी काही मानत नाही. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 05/03/2025 - 15:41

In reply to कहा राजा भोज और ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 05/03/2025 - 18:33

In reply to कहा राजा भोज और ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

लष्करात वैदकीय विभागात असणा

लष्करात वैदकीय विभागात असणा-या लष्कराच्या तिन्ही दलाचा अभ्यास असतो ऎसे मी काही मानत नाही मुदलात खोट असली कि अशी कुंठित विचारसरणी असते. ए एफ एम सी काय किंवा एन डी ए काय या तिन्ही सेनादलांसाठी निर्माण केलेल्या "अ" श्रेणीच्या ( category A) प्रीमियर संस्था आहेत. ए एफ एम सी म्हणजेच ARMED FORCES MEDICAL COLLEGE "आर्मी" मेडिकल कॉलेज नव्हे. मला दोन वर्षे वरिष्ठ असणाऱ्या व्हाईस ऍडमिरल आरती सरीन ( या पण रेडिओलॉजिस्टआहेत) सध्या DGAFMS- Directorate General Armed Forces Medical Services. म्हणजे सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक किंवा हिंदीत महानिदेशक सशस्त्र सेने चिकित्सा सेवा. या नौदलाच्या असून तिन्ही दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुख आहेत. माणूस एकच असतो मग तो थलसेनेत असो कि नौसेनेत कि वायुसेनेत. त्यामुळे त्याला लागणारे डॉक्टर एकच असतात. आणि या डॉक्टरांना तिन्ही दलात लागणाऱ्या अनेक वैद्यकीय प्रश्नांबद्दल प्रशिक्षण दिले जाते. तसेच युदध झाल्यास सैनिकांना कोणत्या जखमा होतील आणि त्यासाठी काय उपचार करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते या शिवाय अणुयुद्ध, जैविक युद्ध आणि रासायनिक युद्ध झाल्यास Nuclear Biological Chemical Defence (NBCD):काय उपचार करायचे असतात याचे हि प्रशिक्षण दिले जाते अर्थात हे प्रशिक्षण देताना युद्धाचे डावपेच आणि सैन्याची व्यूहरचना सुद्धा डॉक्टरांना शिकावेच लागतात( म्हणून शिकवले जातात). विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना पकडल्यावर होणाऱ्या जखमा काही वायुदलाच्या खास जखमा नव्हत्या. प्रत्येक वेळेस माहिती नसताना बेलाशक ठोकून द्यायचं आणि त्यावर त्याचे समर्थन करत राहायची हि वृत्ती आश्चर्यजनक आहे हा प्रतिसाद आपल्यासाठी नाहीच. कारण आपण आपले ज्ञानचक्षू बंद केलेले असल्याने यातून आपण काही घ्याल असे वाटत नाही. हा प्रतिसाद इतर लोकांसाठी आहे. तेंव्हा तुमचं चालू द्या
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 05/03/2025 - 18:39

In reply to लष्करात वैदकीय विभागात असणा by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद डॉक्टर!

धन्यवाद डॉक्टर! एएफएमसी, एनडीए या संस्था फ्रॉड असून तेथे देणगी देऊन प्रवेश मिळतो व देणगी देऊन पदवी मिळते असे मिपावरील काही पाकिस्तानी व काही जन्मजात मूर्ख म्हणतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 05/04/2025 - 09:18

In reply to लष्करात वैदकीय विभागात असणा by सुबोध खरे

Permalink

लष्करातील आचारी...

यावरुन आठवण झाली. 'लष्कारातील आचारी' अर्थात लष्करी स्वयंपाकी ज्याला स्वयंपाक तज्ञ म्हणतात अशा लष्करातील आचा-यांना आपल्या सैनिक आणि अधिका-यांसाठी जेवण बनवावे लागत असते. अशा तिन्ही दलाच्या सैनिकांना जेव्हा जेवण असे आचारी देत असतील तेव्हा, प्रथीने, कार्बोहाड्रेटस त्याचं प्रमाण, अन्नसुरक्षा, अन्नांची तपासणी वगैरे सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात असावे. कारण सैन्य आणि प्रकृती त्यांचा आहार हे सर्व सैन्यांसाठी मानसिक आणि शारिरीक तंदुरस्तीसाठी अतिशय महत्वाचे असावे. युद्ध झाल्यास जखमी सैन्यांना कोणता आहार द्यायचा वगैरे याचे तपशील त्यांच्याकडे असावेत त्याचंही प्रशिक्षण दिले जात असेल, दिले जात असावे. अर्थात असा एखादा आचारी निवृत्त झाला आणि म्हणत असेल की युद्ध सैनिक, अधिकारी, त्यांचे डावपेच, सैन्याची व्युहरचना आचा-यांनाही सांगत असतील तर, आपण हा आचारी सैन्यात होता आणि आदर म्हणून त्यांच्या या गोष्टी अद्भूत कथा-कादंब-यासारख्या वाचायच्या, ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. कारण जगातलं सगळं ज्ञान आपल्यालाच आहे, अशी माणसं जागोजागी भेटतात. एखादा माणूस अशा व्यवस्थेतही असू शकतो. आपण साहसगोष्टीतल्या गोष्टी सारख्या त्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. हा प्रतिसाद इतर लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नव्हे. तेव्हा आपलं चालू द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 05/04/2025 - 09:31

In reply to लष्करातील आचारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 05/04/2025 - 10:43

In reply to लष्करातील आचारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरुटे सर

बिरुटे सर आपला द्वेष इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं परंतु नौदलात स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 महिने प्रशिक्षण दिले जाते हे आपल्याला माहीत नाही! बाकी लष्कराला रेशन दिले जाते याचे कारण सैनिक हा तंदुरुस्त असायलाच पाहिजे त्यामुळे त्याची प्रथिने जीवनसत्त्वे इ ची गरज लक्षात घेऊन त्याला हे रेशन भारत सरकार पुरवते. दिलेल्या रेशनमध्ये समतोल आहार कसा असावा याबद्दल संरक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे याच्या पुस्तिका वेळोवेळी अद्ययावत केल्या जातात. या रेशनचे शिजवलेले अन्न रेजिमेन्ट चा किंवा जहाजाचा वैद्यकीय अधिकारी रोज आढावा घेत असतो आणि ते त्याच्या कडे टेस्टिंग साठी रोज पाठवले जाते हेही आपल्याला माहीत नसावे. बाकी लष्करातील प्रत्येक सैनिकाला लष्करी डावपेच माहीती नसले तरी प्रत्येक अधिकाऱ्याला माहिती असावेच लागतात. आणि सफाई कर्मचारी असो की वैद्यकीय सहाय्यक असो सर्वांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते आणि वारंवार सरावही केला जातो! बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 05/04/2025 - 11:02

In reply to बिरुटे सर by सुबोध खरे

Permalink

अब आया उंट पहाड के निचे....

लष्करातील प्रत्येक सैनिकाला लष्करी डावपेच माहीती नसले तरी.....
आत्ता बरोबर बोलायला लागला आहात. माझ्याकडून विषय संपला. आपलं चालू द्या. सुरमा भोपाली यांची कॉमेडी बघतोय. इंजॉय करा.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 05/04/2025 - 11:03

In reply to बिरुटे सर by सुबोध खरे

Permalink

शांत व्हा डॉक्टर. द्वेषाने

शांत व्हा डॉक्टर. द्वेषाने अंतर्बाह्य बरबटलेल्यांकडून आणि त्चांंच्या प्रत्येक वांतीला, एक हात पुढे पसरून व दुसरा कानावर ठेवून जी जी रं जी जी रं जी जी जी म्हणणारे, कधीही द्वेषाच्या चिखलातून बाहेर येणार नाहीत. भारताचं पूर्ण वाटोळं व्हावं हेच यांचे जीवनध्येय.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Sun, 05/04/2025 - 13:17

In reply to बिरुटे सर by सुबोध खरे

Permalink

डॉक्,

डॉक्, तुमच्यामध्ये बोलतो म्हणून क्षमस्व - भुजबळ आणि प्रोफेश्वर हे दोघेही एकाच पातळीवरचे आहेत. त्यांच्या तोंडी लागणे म्हणजे पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या मनुष्याने गटारात लडबडलेल्या प्राण्याशी दोन हात करणे आहे. त्यांच्यात आणि इतर मिपाखरांमध्ये फरक आहे.
बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!
त्यांच्या पातळीला जाणे माझ्यासहित अनेक मिपाखरे शक्यतो टाळतात. तुम्हीही टाळता आले तर बघा. - (शक्यतो पातळी न सोडणारे मिपाखरु) द्येस्मुक् राव्
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 05/04/2025 - 13:56

In reply to डॉक्, by वामन देशमुख

Permalink

=))

'जावा फुल स्टॅक' सारखा डू आयडी घेऊन आर्वाच्य भाषेत लोळणारे जेव्हा असे काही लिहितात तेव्हा हसून हसून पुरेवाट होते. =)) लवकर बरे व्हा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 05/04/2025 - 14:16

In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Mon, 05/05/2025 - 09:51

In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

'जावा फुल स्टॅक' सारखा डू

'जावा फुल स्टॅक' सारखा डू आयडी घेऊन आर्वाच्य भाषेत लोळणारे जेव्हा असे काही लिहितात तेव्हा हसून हसून पुरेवाट होते. =))
पहा मित्रांनो, म्हटलं होतं नं, दोघांची पातळी एकच आहे म्हणून! तो सदस्य अधूनमधून कुणावरही डुआयडीचा आरोप करत असतो, यावेळी तोच आरोप वेगळा आयडी वापरून केला आहे इतकेच. अर्थात मिपाखरं असल्या आरोपांना फाट्यावर मारतात हेवेसांन.
लवकर बरे व्हा...!
आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 05/05/2025 - 10:06

In reply to 'जावा फुल स्टॅक' सारखा डू by वामन देशमुख

Permalink

आम्ही आधीपासूनच बरे आहोत,

आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे. अगदी खरे आहे. पूर्ण सहमत. यांच्यातल्या एकाचे सदस्यत्व अर्वाच्य लेखनामुळे ४ वेळा प्रतिबंधित केले होते. त्याच्या अनेक तोतया सदस्यनामांना कायमस्वरूपी अर्धचंद्र दिला होता. परंतु ५ व्यांदा पुनर्जन्माची संधी मिळूनही या सदस्यात कोणतीही सुधारणा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 05/04/2025 - 13:34

In reply to बिरुटे सर by सुबोध खरे

Permalink

बाकी आपण इतक्या खालच्या

बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते! ते पाताळाच्याही खाली जाऊ शकतात. तुमची तयारी आहे का इतके खाली उतरण्याची?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 05/04/2025 - 15:54

In reply to बाकी आपण इतक्या खालच्या by श्रीगुरुजी

Permalink

मला कधी कधी वाटतं की हा

मला कधी कधी वाटतं की हा नैतिकतेतील फरक आहे गट 1 आणि गट 2 च्या लोकांच्या मधील. इंदिरा गांधीचां वध झाला तेव्हा कोणत्याही संघ कार्यकर्त्याने, जन संघाच्या नेत्याने, उजव्या विचारसरणीच्या नेत्याने, पंतप्रधानाच्या सुरक्षेत झालेल्या अक्षम्य निष्काळजीपणाचा मुद्दा बनवला नाही. त्या निष्काळजी पणाला खुद्द पंतप्रधान च जबाबदार होत्या हे सत्यही आता काही लपून राहिलेले नाही तरी आपण त्याच्या इश्यू बनवत नाही. ही गट.2 लोकं मात्र पहलगाम सारखा स्पष्ट आपल्या धर्माच्या लोकांवर हल्ला झाला तर हल्ल्याचा निषेध करायचे बाजूला ठेऊन सुरक्षा रक्षणेत गुप्तचर यंत्रनेने काय चुका केल्या ह्याचे पाढे मोजायला सुरू करतात म्हणजे अतिरेकी धर्मांध दहशतवादी , आणि त्या दहशतवादाचे मूळ कारण त्यांचे तत्वद्न्यान हे राहिलं बाजूला बाष्कळ मुद्दे रेटत राहतात. आणि मी ह्याचे थोडे psychoanalysis केले आहे. परधार्जीनेपणा , स्वकीयांपेक्षा परकियांच्या बाजूला उभे रहायचे हा ह्या लोकांच्या मनोवृत्तीचा , तत्त्वज्ञानाचा भाग आहे,... "पेशवाई बुडाली बरं झालं इंग्रजांचे राज्य आलं" हा विचार ह्यांच्या तत्वज्ञानाच्या मूळ संस्थापकाने कैक वेळा त्याच्या लेखनात मांडला आहे. 3rd Anglo Maratha war मध्ये एका थातूरमातूर चकमकीचे इंग्रजांनी स्मारक उभारले त्याचा उरूस कोणी सुरू केला हे मुळातूनच शोधून पाहण्यासारखे आहे. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 05/04/2025 - 16:09

In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले

Permalink

इंदिरा गांधींवरील हल्ल्याला

इंदिरा गांधींवरील हल्ल्याला खुद्द इंदिरा गांधी जबाबदार होत्या हे सत्य सर्वांना पचले तसे पहलगाम हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार आहे हे आपल्या पचनी का पडत नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 05/04/2025 - 16:41

In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले

Permalink

इंदिरा गांधीचां वध झाला

इंदिरा गांधीचां वध झाला तेव्हा कोणत्याही संघ कार्यकर्त्याने, जन संघाच्या नेत्याने, उजव्या विचारसरणीच्या नेत्याने, पंतप्रधानाच्या सुरक्षेत झालेल्या अक्षम्य निष्काळजीपणाचा मुद्दा बनवला नाही. जनसंघ काय किंवा इतर उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि नेत्यांनी इंदिरा गांधीची हत्या नव्हे तर वध ठरवले तर ते कसे निष्काळजीपणाचा मुद्दा बनवतील? हत्या मानली असती तर मुद्दा बनावलाही असता . असते एकेकाची मानसिकता. पहलगामध्ये आपल्या नागरिकांची हत्या झाली असे मानतो. उजवे वध मानत असतील म्हणून गप्प असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 05/04/2025 - 17:03

In reply to इंदिरा गांधीचां वध झाला by आग्या१९९०

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Sun, 05/04/2025 - 22:33

In reply to मला कधी कधी वाटतं की हा by प्रसाद गोडबोले

Permalink

इंदिरा गांधीचां वध?

गोडबोले, तुमच्या सारख्या विचारसरणीचे लोक इंदिरा गांधींचा 'वध' असे का म्हणतात? अधम, खल व्यक्तीची जर नायक मानलेल्या व्यक्तीकडून हत्या झाली तर त्याला वध असे म्हणतात. उदा. अफझलखान वध, जरासंध वध इ. इंदिरा गांधी या आपल्या पंतप्रधान होत्या, त्यांनी हयात त्यांच्या मताप्रमाणे राष्ट्राची सेवा करण्यात घालवली. काही चुकाही केल्या पण नंतर मान्य करून सुधारल्या देखील. (जे तुमच्या आवडत्या कट्टर उजव्या, सनातनी विचारसरणीत कधीही आढळत नाही.) त्यांचा भ्याडपणे त्या नि:शस्त्र असताना गोळ्या घालून खून करण्यात आला. त्याला तुंम्ही वध म्हणता? तर एवढा द्वेष तुंम्ही व तुमच्या विचारसरणीचे लोक आणता तरी कुठून असा मला जेन्युइन प्रश्न पडला आहे. एकाच वेळी सर्व भूतमात्रांप्रती द्वेष करू नये अशा अर्थाच्या संताच्या ओव्या लिहायच्या आणि त्याच वेळी आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा मरणोत्तर उल्लेख करताना सुध्दा आपला द्वेष जराही विसरायचा नाही, थोडेही मनाचे औदार्य दाखवायचे नाही, हे तुमच्या गट क्र १ मधील लोकच करू जाणोत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 05/04/2025 - 23:31

In reply to इंदिरा गांधीचां वध? by स्वधर्म

Permalink

सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे

सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे. ज्ञानेश्वरांनी अल्लाउद्दीन खिलजी पाहिला नव्हता, Alphanso De albuquerque, सेंट(?) झेवियर्स पाहिला नव्हता. पाहिला असता तर तेही कृष्णासारखेच म्हणाले असते - म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥ म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. ॥२-१८९॥ खुद्द तुकोबाही म्हणाले आहेत - तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३|| आणि समर्थ तर स्पष्टच बोलतात. धर्मासाठी झुंझावें। झुंझोनीं अवघ्यासी मारावें । मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।। देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।। देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां । मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्म संस्थापनेसाठीं ।।३।। सोडा, तुम्हाला नाही कळणार . 2029
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Mon, 05/05/2025 - 21:37

In reply to सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे by प्रसाद गोडबोले

Permalink

धर्माचे अयोग्य पढिक आकलन

अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी पाप केले व म्हणून त्यांचा 'वध' असा शब्दप्रयोग तुंम्ही करत असाल, तर तुमचे बेसिकच इतके गंडलेले आहे, की पुढे काही बोलण्यासारखेच नाही. धर्माचे अयोग्य पढिक आकलन माणसाच्या सामान्य ज्ञानाला कसे झाकोळून टाकते याचा उत्तम नमुना म्हणजे आपले 'वध' हे संबोधन. मी म्हटल्याप्रमाणे अध्यात्मिक ओव्या दरएक प्रतिसादात पेरणारी व्यक्ती कुणाचा इतका द्वेष मृत्यूनंतर इतकी वर्षे करत असेल तर असले अध्यात्म काय कामाचे? तुंम्ही कोणाचाही द्वेष करू नये यावर १००० शब्दांचा व १०० ओव्या व श्लोक असलेला लेख लिहू शकाल, पण आपल्याला मते न पटणार्या व्यक्तीचा द्वेष करू नये, हे कळत नसेल तर... असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 05/02/2025 - 21:35

Permalink

अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच

अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे सरकारचे इनकमिंग आणि आऊट गोईंग धोरण ,दुसरे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 05/02/2025 - 21:40

In reply to अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच by आग्या१९९०

Permalink

भक्त लगेच पिसाटल्यासारखे

भक्त लगेच पिसाटल्यासारखे मुस्लिमद्वेष करू लागले! अरे पण अतिरेकी आलेच कसे नी गेलेही कसे हे प्रश्न भक्तांना पडले नाहीत, मोठमोठ्या गप्पा हाणायला नी आंतरराष्ट्रीय प्रश्नात डोळे खोपस्सायला ही मांडली पुढे असते! ३५ - ४० हजार कोटींचा कश्मीरवर खर्च दाखवला जातो, हा खर्च हे भाजपेयी नक्की काश्मीरवर करताहेत की हा पैसा भाजप नेत्यांच्या खिशात जातो आहे हे कोणती यंत्रणा तपासणार?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com