मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
29 Jan 2020 - 2:35 pm

https://misalpav.com/node/45617

निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं .... मी त्या पेशंटला म्हणालो ताई नशिबवान आहात सासरा तुम्हाला सुन न मानता पोटची पोरगी मानतो आणि काळजीपोटी सोबतही येतो !!
का कोण जाणे हा माणूस पूर्णपणे बदलेला होता आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला ते जाणवलं ......

_____________________________________

शेवटचा पेशंट म्हणाला डाॅक्टर तुम्ही ईतक्या ठिकाणी व्हिसीटला जाता ,जालन्याला का येत नाही ?
ह्या मी म्हणालो की ती सगळी गावं किमान सव्वाशे किलोमिटर्सवर आहेत आणि जालना फार जवळ आहे , तिथपर्यंत तर मी सायकलनीच जातो ;))

(मी औरंगाबादला प्रॅक्टीस करतो , तिथून जालना ६० किमी अंतरावर आहे)

_____________________________________

ही पेशंट नेहेमीच त्रास वाढला की येते , तेव्हा औषधही संपलेली असतात .... मी त्यांना नेहमी रागावतो, स्वत:ची काळजी करत नाही हे सांगतो आणि परत तपासणी करून पुढची तारीख व औषधं लिहून देतो....

हा गेल्या ५-६ वर्षांचा शिरस्ता , पण ह्यावेळेस ती पेशंट नेहमीपेक्षा जास्त कालावधीनी आलेली आणि नेहमीपेक्षा किंबहूना फारशी बोलतच नव्हती .... हे मला जाणवलं आणि मी थोडं खोलात जाऊन विचारल्यावर ती म्हणाली डाॅक्टर मला अस्थमाशिवाय बिपी आणि थायराॅईड साठी ट्रिटमेंट घ्यावी लागते. घरी सासू ह्यावरून सतत घालून पाडून बोलतात त्यातही ईन्हेलर घेतांना दिसले तर हसायलाच लागतात किंवा शेजारचं कोणी आलं तर माझी गाऱ्हाणीच मांडत बसतात .... ह्यासगळ्याला तोंड देता देता मी बरेचदा ईन्हेलर, बिपीची गोळी किंवा थायराॅईडची गोळी विसरून जाते आणि मला तुम्ही दुसरे डाॅक्टर्स ह्यावरून नेहेमीच रागवतात ; एव्हाना डोळ्यांच्या कडांमध्ये अडलेलं घळाघळा वाहू लागलं ...
मी त्यापेशंटला धीर दिला आणि सांगीतलं की ह्यापुढे तुम्हाला कधी रागावणार नाही, ईन्हेलर छोट्या आकाराचं देतो आणि सासूसमोर कोणतही औषध घ्यायचं नाही ,अगदीच शक्य नसलं तर बाथरूम मध्ये जाऊन औषधं घ्या (ह्यावर रडणारी पेशंट खुदकन हसली)कारण आपण त्यांना बदलू शकत नाही म्हणून स्वत:मध्येच थोडा बदल करूयात ....
आणि सर्वात महत्वाचं पुढल्या भेटीत घरच्या सर्वाना मला भेटायला घेऊन यायचं !!

ह्या प्रसंगाच्या निमित्तानी मी सर्व मिपाकरांना हा प्रश्न विचारतो की असं तुमच्याबाबत किंवा तुमच्या आप्तस्वकीयांबाबत कधी घडलंय का ? जर नसेल घडलं तर फार उत्तम परंतू असं घडतांना दिसलं तर पेशंटला सपोर्ट द्या , आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ही भावना पेशंटसाठी औषधापेक्षा जास्त महत्वाची असते !! हे मला कोणी शिकवलं असेल तर ते श्रेय माझ्या रुग्णांना _/\_

_____________________________________

पेशंटचा सोबत आलेला मित्र - डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू असतो का हो ?

मी - का हो ?

पे. मित्र - आम्हाला रविवारी सुटी असते ना !

मी - अरे वा !! द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते ;)) :))

(ह्यातला गंमतीचा भाग सोडला तर आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही)

_________________॰______________

मांडणीविनोदआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारसद्भावनाप्रतिक्रियालेखअनुभवसल्लाप्रश्नोत्तरेमदतआरोग्य

प्रतिक्रिया

अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे.

इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

डॉ श्रीहास's picture

8 Feb 2020 - 12:35 pm | डॉ श्रीहास

१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात.
२.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !!
३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे.
४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत.
५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar's picture

29 Jan 2020 - 2:52 pm | Nitin Palkar

अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.

अगदी अगदी

शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत's picture

29 Jan 2020 - 3:07 pm | प्रशांत

डॉक... फारच सुंदर लिहता..

आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही

हे एक लंबर..!

mayu4u's picture

29 Jan 2020 - 3:11 pm | mayu4u

तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

प्रास's picture

29 Jan 2020 - 3:26 pm | प्रास
प्रास's picture

29 Jan 2020 - 3:26 pm | प्रास
सुबोध खरे's picture

29 Jan 2020 - 6:37 pm | सुबोध खरे

द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते

हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती

स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा?

महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना

स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

मुक्त विहारि's picture

29 Jan 2020 - 7:33 pm | मुक्त विहारि

डॉक्टर एकच आहे पण तो सुट्टी घेत नाही.

डॉ श्रीहास's picture

29 Jan 2020 - 9:01 pm | डॉ श्रीहास

एकच आहेत म्हणून

कुमार१'s picture

29 Jan 2020 - 7:36 pm | कुमार१

आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , + १११११

सुधीर कांदळकर's picture

29 Jan 2020 - 9:18 pm | सुधीर कांदळकर


'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.

१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच.

छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

डॉ श्रीहास's picture

29 Jan 2020 - 9:31 pm | डॉ श्रीहास

ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

श्वेता२४'s picture

30 Jan 2020 - 10:57 am | श्वेता२४

आवडलं लेखन

वा. नेहमीप्रमाणेच हृद्य लेख.

स्थितप्रज्ञ's picture

30 Jan 2020 - 9:25 pm | स्थितप्रज्ञ

+१

देशपांडेमामा's picture

30 Jan 2020 - 12:04 pm | देशपांडेमामा

लेख आवडेश. तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो असल्याने तुमचे बोलतानाचे हावभाव अनुभवू शकलो :-) !

देश