Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शिव कन्या on Fri, 12/11/2015 - 15:50
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

Submitted by नाखु on Fri, 12/11/2015 - 15:54

Permalink

अगदी खरे

घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते
! आम्चा प्रयत्न इथे
  • Log in or register to post comments

Submitted by जातवेद on Fri, 12/11/2015 - 19:56

Permalink

क्या बात है

खुपच सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sun, 12/13/2015 - 09:09

Permalink

जबरदस्त लिहिलय

जबरदस्त लिहिलय
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sun, 12/13/2015 - 09:18

Permalink

दुसरं आणि पाचवं कडवं मार्मिक!

दुसरं आणि पाचवं कडवं मार्मिक!
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Sun, 12/13/2015 - 16:22

Permalink

खासच

घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो!
आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Sun, 12/13/2015 - 16:35

Permalink

छान कविता !

छान कविता !
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Sun, 12/13/2015 - 19:31

Permalink

झकास

सुटलीये तुमची गाडी. आवडली ही पण.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 12/14/2015 - 01:04

Permalink

खूप सुंदर लिहिलंय.

खूप सुंदर लिहिलंय.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5143 views

Book traversal links for गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

  • ‹ गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा
  • Up
  • गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com