.

कुणास ठाऊक ?

Primary tabs

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
17 Mar 2016 - 10:55 pm

कुणास ठाऊक ?
काय शोधण्यासाठी
काय साधण्यासाठी
या जगात आलोय आम्ही

कुणास ठाऊक ?
काय जाणण्यासाठी
काय गणण्यासाठी
या जगात आलोय आम्ही

कुणास ठाऊक ?
काय जिंकण्यासाठी
काय थुंकण्यासाठी
या जगात आलोय आम्ही

कुणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नुसतेच मरण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
आत्मशोध (काव्यसंग्रह)

गजेंद्रकविता

प्रतिक्रिया

gsjendra's picture

17 Mar 2016 - 10:56 pm | gsjendra

आपला अभिप्राय बहूमूल्य आहे

अभ्या..'s picture

17 Mar 2016 - 11:10 pm | अभ्या..

सुंदर. अप्रतिम रचना.
फार आवडली.

चांदणे संदीप's picture

17 Mar 2016 - 11:28 pm | चांदणे संदीप

कुणास ठाऊक?
काय वाचण्यासाठी, काय वाचविण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही
कुणास ठाऊक?
काय पाहण्यासाठी, काय चाचपण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही
कुणास ठाऊक?
काय हुंगण्यासाठी, काय शिंकण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही
कुणास ठाऊक?
काय कळण्यासाठी, का नुसतेच खरडण्यासाठी
या मिपावर आलोय आम्ही

(आत्मशोध - सुरू आहे!)
Sandy

जव्हेरगंज's picture

17 Mar 2016 - 11:33 pm | जव्हेरगंज

ख्खिक्क!!!

नाखु's picture

18 Mar 2016 - 10:49 am | नाखु

"संदीपा जरा म्हणून धीर नाही तुला, पापड वाळण्यापुर्वीच भाजलास की रे ! बाकी छोटी परी काय म्हणते असे हे विचारत होते."

सार्वकालीन माई

चांदणे संदीप's picture

18 Mar 2016 - 2:37 pm | चांदणे संदीप

परकायाप्रवेश करून का होईना आज आमच्याशी बोलल्या! =))
बाकी, ह्यांना सांगा माई, छोटी परी (सर्वांनाच) ल्लूल्लूउउउउलुल्लूल्लूउउउउ म्हणते!! =))

नाखु's picture

23 Mar 2016 - 9:49 am | नाखु
अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2016 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा

सं दीपाचे चांदणे! =))

भरत्_पलुसकर's picture

18 Mar 2016 - 12:30 pm | भरत्_पलुसकर

मला माहितीये
काय शोधण्यासाठी
काय साधण्यासाठी
या जगात आलाय तुम्ही

मला माहितीये
काय जाणण्यासाठी
काय गणण्यासाठी
या जगात आलाय तुम्ही

मला माहितीये
काय जिंकण्यासाठी
काय थूंकण्यासाठी
या जगात आलाय तुम्ही

मला माहितीये
काय करण्यासाठी
का नूसतेच मरण्यासाठी
या जगात आलाय तुम्ही

नाहीसांगतजा (टुक्टुकसंग्रह)

कंजूस's picture

18 Mar 2016 - 1:16 pm | कंजूस

सगळ्यांस ठाऊक
आलोय इथे आम्ही
पाजळण्यासाठी.

ठिगळ लावलेली
दाखवून कौतिक
करवून घेण्यासाठी.

रातराणी's picture

19 Mar 2016 - 12:09 am | रातराणी

भारीये कच्चा माल!