।। भाषा सरिता इव ।।
भाषा नद्यांसारख्या असतात.संस्कृतीच्या अत्त्युच्च शिखरांवरून उगम पावतात. पृथ्वीच्या अंतरंगातील ज्वालामुखीच्या कणांकणांतून शुद्ध केलेली बीजं, खनिजांचा कणखरपणा, मातीतील जीवनरसांचा ओलावा, या आभाळाशी नातं जोडणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रधनुष्य फुलवंत अथक वाहत असते. दोन्ही तीरांना समृद्ध करत, साहित्याची नवनवीन बेटं तयार करत त्यांभोवती वळणं घेत घेत नवनवीन अर्थांना जन्म देत राहते.
वाऱ्यावर हिंदकळणाऱ्या ऊर्मितरंगांना मनांमनांत उमटवंत आयुष्यभर साथ देते.