मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावज (भाग २)

अनाहूत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भाग १ : http://misalpav.com/node/45068 तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती . तोही आता तयार झाला होता . पण अचानक तो थांबला आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं आणि खिडकीपाशी आला . तिने क्षणभर त्याची वाट पाहिली . त्याला सादही घातली . पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिल आणि तसाच थांबला . रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . त्याला साद देऊनही तो येत नव्हता त्यामुळे ती उठली आणि हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली आणि त्याच्या कानापाशी ओठ नेऊन त्याच्या कानात कुजबुजली " मला अशी अधुरी नको ना सोडूस . चल ना . " असं म्हणत ती आर्जव करत होती . त्याने समोर पडलेल्या पाकिटातून एक सिगारेट बाहेर काढली . ती त्याच्या पाठीवर किस करत होती . त्याने सिगरेट शिलगावली आणि त्याचा कश घेत तो खिडकीतून बाहेर बघत होता . ती इतकी आतुर झाली होती मात्र तो शांत होता . " ये ना रे . काय झाल ? " तिने त्याला परत हाक दिली आणि त्याला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती . " बस जरा " म्हणत त्याने तिला आपल्या शेजारी बसवल . " कस आहे मला तू खूप आवडलीस आणि मी तुझ्याबरोबर एकरूप होणार होतो पण मधेच मला तुझ्या पहिल्या नवऱ्याची आठवण आली आणि मग जाणवल हा बेड , हि रूम इथे तुम्ही दोघ असाल , एकत्र आलेले आणि इथंच मला ... मला नाही ठीक वाटलं . मी हा विचार आल्यावरपण तसाच पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण मला तोच सर्वत्र जाणवत होता . मग माझा मूडच गेला . " " come on . तो नाहीए आता . आता फक्त आहे ते तू आणि मी . " ती त्याला समजावत म्हणाली . " नाही I am not OK with that . म्हणजे किमान या जागेवर तरी , या वास्तूत तरी नाही . या वास्तूत असं काहीतरी आहे जे जाणवतंय आणि त्यामुळे नको . " " मग आपण बाहेर जाऊया ना . " " कुठे जाणार आहेस पावसात ? " " come on असं नको ना करुस माझी काय अवस्था झालीय ते तुला काय सांगू . " " सोड मला " म्हणत त्याने तिचा हात झिडकारला . ती तशीच जाऊन बेडवर पडली . कितीतरी वेळ तळमळत पहाटे कधीतरी तिला झोप लागली . तिला जाग आली तेव्हा तो तिला उठवत होता . ती पटकन उठून बसली . " काय हे तू तयार पण झालास मला काही बोलला का नाहीस . " " मी निघतो आता . तुझी झोप नीट नाही झाली . तू आराम कर . " त्याच्या वाक्याने ती चिडली . शेजारची उशी फेकून म्हणाली " माझी काय अवस्था झाली आहे आणि तुला झोपेच पडलं आहे . " हे बघ मी तुला सांगितलं ना कारण त्याच " " but I want that " " पण इथे शक्य नाही . " " तू म्हणशील तिथं यायला तयार आहे मी . तू थांब मी लगेच तयार होऊन येते . जाऊ आपण . " असं म्हणत केस सावरत ती स्वतःच आवरू पहात होती . " एक मिनिट शांत हो . आता नाही . माझं काम आहे . आपण नंबर एक्सचेंज करू . मी तुला फोन करेन . " " ए मला नाही ना धीर धरवत . तुझ कधी काम होणार मग तू कधी फोन करणार ? " " ठीक आहे मग काय करू ? " " तू लगेच फोन कर . " " इथूनच करू का ? " " नको तिकडे पोहोचलास कि कर फोन . " " ठीक आहे करतो मी फोन . " त्यांनी नंबर एक्सचेंज केले . अचानक तिच्या लक्षात आलं त्याचा फोन सुरु होता . पण त्याच्या फोनची तर काल बॅटरी संपली होती . " अरे तुझ्या फोनची बॅटरी संपली होती आणि तुझ्याकडे तर चार्जर पण नव्हता मग कस ? " " अग इथंच सापडला चार्जर त्याने केला चार्ज . " " इथे कुठे माझा फोनचा चार्जर वेगळा आहे . मग हा ... " त्याने तिला मधेच अडवलं आणि म्हणाला " काय ते चार्जरच घेऊन बसली आहेस . ते सोड मला उशीर होतो आहे . " म्हणत तो निघाला . ती कितीतरी वेळ त्याला पाठमोरा जाताना पाहत होती . तिने फोन चेक केला त्याची बॅटरी लो झाली होती . ती तो चार्ज करण्यासाठी पाहू लागली तर लाईट नव्हती . आता अजून थोडा वेळ लाईट नाही आली तर तिचा फोन बंद होऊ शकेल अशी स्थिती होती . मग नंतर त्याचा फोन आला तर . त्याला माझा फोन बंद लागेल . त्यापेक्षा मी फोन करू का त्याला . नाही तस केलं तर त्याला राग येईल . ती असा विचार करत होती तेव्हढ्यात त्याचा फोन आला . त्यानं तो पोहोचल्याच सांगितलं . तिला पुढे बोलायचं होत तितक्यात फोन बंद झाला . तिने पाहिलं तर त्याची बॅटरी संपली होती . असू दे त्याच्या पोहोचण्याची तर खबर मिळाली . आता काय करावं याचा विचार ती करत होती . लाईट नसल्यामुळे काही करता येणार नव्हतं . मग तिने काही नाही तर रेडिओ सुरु केला . त्याच्यावर बातम्या सुरु होत्या . दोन बातम्या तिला नीट ऐकू आल्या नाहीत कि काय कुणास ठाऊक . ' शहराला जाणाऱ्या पुलावर अजूनही पाणी असल्यामुळे तो कालपासून बंदच आहे . पावसामुळे लाईटचा काही बिघाड झाला आहे आणि लाईट जी रात्री गेली आहे ती आज संध्याकाळपर्यंत परत येण्याची शक्यता नाही . ' काल मला कितीतरी वेळ झोप आली नाही . मी तशीच पडून होते आणि त्यावेळी तो तिथेच होता बसून . तो कुठेही गेला नाही . लाईट गेल्याच आठवतंय मला तोपर्यंत मी जागीच होते आणि त्यावेळी गेलेली लाईट अजून आली नाही मग याने फोन चार्ज कधी केला ? तो रात्री आला तेव्हापासून माझ्या समोरच आहे मग त्याला कधी वेळ मिळाला आणि पुलावर तर अजूनही पाणी आहे मग तो कसा गेला पलीकडे . तिला ऐकलेली अजून एक बातमी आठवली . ' कोणी बाईकस्वार पुलावरून वाहून गेला होता . ' .... क्रमशः

वाचने 2882 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मराठी कथालेखक 27/08/2019 - 11:44
छान.. पण ....मंजू आली का हो परत :)

मराठी कथालेखक 04/09/2019 - 16:04
कथेचे भाग वेळेत न टाकणे - दंड रु. ५००० कथा अपुर्ण ठेवणे - दंड रु १०,०००