मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाङ्मय

नेनचिम - विज्ञान कादंबरी

nishapari ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ...

सावज (भाग २)

अनाहूत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ : http://misalpav.com/node/45068 तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती . आणि त्यासाठी ती आर्जव करत होती .

द सियालकोट सागा

महासंग्राम ·
लेखनविषय:
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

देवघर

शिव कन्या ·
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

(रगेल पावट्याचे मनोगत)

नाखु ·
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

तू मेरे रुबरु है

महासंग्राम ·
लेखनप्रकार
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

भाषा सरिता इव

मायमराठी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
।। भाषा सरिता इव ।। भाषा नद्यांसारख्या असतात.संस्कृतीच्या अत्त्युच्च शिखरांवरून उगम पावतात. पृथ्वीच्या अंतरंगातील ज्वालामुखीच्या कणांकणांतून शुद्ध केलेली बीजं, खनिजांचा कणखरपणा, मातीतील जीवनरसांचा ओलावा, या आभाळाशी नातं जोडणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रधनुष्य फुलवंत अथक वाहत असते. दोन्ही तीरांना समृद्ध करत, साहित्याची नवनवीन बेटं तयार करत त्यांभोवती वळणं घेत घेत नवनवीन अर्थांना जन्म देत राहते. वाऱ्यावर हिंदकळणाऱ्या ऊर्मितरंगांना मनांमनांत उमटवंत आयुष्यभर साथ देते.

श्रीकृष्ण

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे ) काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म.

शिव त्रिगाथा

अभिजित भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भगवान शंकर..रुद्र .शिव.. नीलकंठ.मूळ त्रिदेवांपैकी एक .. जनक ब्रह्मा , पालक विष्णू आणि संहारक महेश..सृष्टीचा समतोल राखणारा शिव. देव आहे का नाही हे मला माहित नाही पण देवत्वाच्या समीप जाणारी जर एखादी शक्ती असेल तर ती आपल्या कायेमध्ये चेतना फुंकणारी आणि आंतरिक प्रेरणा देणारी शक्ती होय. अशाच आंतरिक प्रेरणेने एक I.I.M उच्च विद्याविभूषित , बड्या वित्त कंपनीत उच्चपदावरील अधिकारी शिवभक्त अमिश त्रिपाठी सगळं हातचं सोडून भगवान शंकरावर पुस्तक लिहितो काय आणि rest is the history...शिव त्रिगाथा ही भारतीय साहित्यविश्वात अल्पाधि वेळात सर्वाधिक खपाची पुस्तके ठरतात..

दिव्यांची कहाणी

शिव कन्या ·
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.