श्रीकृष्ण
महाभारत हे भारतभूमीचे वैभव आहे. कृष्ण हा त्या वैभवातला कौस्तुभमणी!बरोबर! _/\_ :)
In reply to छान लिहीलंय ! by उगा काहितरीच
कृष्णाच्या बाबतीत केली तीच चूक आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत करतोय.या दोघांबाबत मर्यादीत नाही तर एकुणच व्यक्तीपुजा आणि व्यक्तीद्वेष दोन्ही टाळले पाहीजे, व्यक्तींच्या / व्यक्तीरेखांच्या कृती आणि विचार याचे कोणत्याही दबावा शिवाय समिक्षण करता येण्याचा आदर्श हवा याचे मला समर्थन करावेसे वाटते. पण मानवी स्वभाव पहाता जसे पुस्तक पुज नको म्हणणार्यांच्या पुस्तकांच्या पुजा होतात तसे व्यक्तीपुजा नको म्हणणार्यांच्याही व्यक्ती पुजा होतात. अशावेळी पोथ्यांना बासनात आणि व्यक्तींना मुर्तीत बद्ध करून पुजा करावी फुले वहावीत आणि प्रत्यक्ष व्यवहारात कालसुसंगत किंवा तर्कपुर्ण नसलेली गोष्ट पोथीने सांगितली अथवा व्यक्तीने केली होती म्हणून करण्यापेक्षा, पोथीत काय लिहीले व्यक्तीने नेमके काय केले होते हे विसरून नास्तिका प्रमाणे कालसुसंगत तर्कपूर्ण विचाराच्या आधारांवर व्यवहार करावेत. असे माझे मत. आणि कृष्णनितीच्या नावावर बहुधा घागा लेखकही आडपडद्याने माझ्या शब्दात 'व्यक्तीपुजेच्या मर्यादा समोर येताच 'नास्तिक मुर्तीपुजक' व्हावे या विचारापर्यंत येऊ शकण्याची शक्यता वाटते. असो. असो.
In reply to अख्या जगात एकच व्यक्ती इतका by जॉनविक्क
In reply to श्रीराम जिथे न्यायाच्या by आदिजोशी
In reply to उत्तर रामायण वाचावे by जॉनविक्क
In reply to उत्तर रामायण वाचावे by आदिजोशी
रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची आज्ञा मुळीच पाळली नसती.ही गडबड झाली. ह्या वाक्याने रामही कळला नाही आणि कृष्णही अस वाटण्याची शक्यता निर्माण होते.
कृष्णाने आपल्याला पटलेले विचार उचलले.कृष्ण अवतारी पुरुष होता, त्याला विचार उचलण्याची गरज नसवी. तो, अर्जुनाला पक्षी भवसागरात गोन्धळून गेलेल्यास, 'अन्तीम सत्य' काय ह्याची जाणीव करून देताना ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग ह्या रूपात वेद आणि उपनिषदांचे सार गीतेतून सांगतो. हे ज्ञान त्याला उपजतच आहे कारण तो ज्ञानी आहे. फारच सिम्पलीफिकेशन होतय ह्यातून श्रीकृष्णाचे. - (कृष्णभावनामय) सोकाजी
In reply to ह्म्म... by सोत्रि
, 'अन्तीम सत्य'हा हा हा. अर्जुनास युद्धाला प्रवृत्त केले इतपत ठीक आहे :)
In reply to , 'अन्तीम सत्य' by जॉनविक्क
In reply to गीता फक्त अर्जुनाला युद्धास by सोत्रि
In reply to , 'अन्तीम सत्य' by जॉनविक्क
In reply to चांगलंय. अर्थात् कृष्णाच्या by राघव
In reply to चांगलंय. अर्थात् कृष्णाच्या by राघव
In reply to कालयवन तर उघड उघड नंतरची भर by प्रचेतस
In reply to होऊ शकेल, शक्यता नाकारता येत by राघव
In reply to महाभारतात यवनांचे चिक्कार by प्रचेतस
In reply to मग हे सर्व उल्लेख नंतरचेच काय by राघव
In reply to होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे by प्रचेतस
In reply to होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे by प्रचेतस
अवांतरः रामायणात चक्क तथागत अर्थात गौतम बुद्धाचा उल्लेख आहे.आणि जैन श्रमणांच्या तीर्थंकरांच्या कथात राम वनवासाला गेलेला भेटल्याचे उल्लेख आहेत तसेच महाभारतातील कृष्णांशी संबधीत अरिष्टनेमि आदि नावे जैन परंपरेतील आहेत. महाभारतकालात नेमिनाथ हे तत्कालीन जैन धर्म प्रमुख होते असा उल्लेख आहे. मनुस्मृतीत लिच्छवी, मल्ल, नाथ आदी क्षत्रियांना व्रात्य असे संबोधले जात होते.
In reply to अवांतरः रामायणात चक्क तथागत by अभ्या..
In reply to होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे by प्रचेतस
In reply to साशंक by सोत्रि
In reply to 'तथागत' असा उल्लेख आहे जो by प्रचेतस
In reply to तथागत - ज्या प्रमाणे बोलतो by सोत्रि
In reply to पूर्ण श्लोक असा आहे. by प्रचेतस
In reply to पूर्ण श्लोक असा आहे. by प्रचेतस
बौद्धमतावलंबीहीहे शब्द प्रयोजन तुमचे आहे का? बौद्ध अस काहीच नसत. बुद्धची शिकवण (buddha's teaching) अस असत! रामायणाचा कालखण्ड आणि गौतम बुद्धाचा कालखण्ड बघता, रामायणात गौतम बुद्धाचा उल्लेख असणे जरा अतिशयोक्त वाटतय. - (अजूनही साशंकच) सोकाजी
In reply to बौद्धमतावलंबीही by सोत्रि
In reply to का बरे साशंक? by माकडतोंड्या
In reply to बुद्धाचा कालखण्ड ~ ५५० BCE by सोत्रि
In reply to बौद्धमतावलंबीही by सोत्रि
In reply to कृष्ण ही कॄष्ण हे नाव by माकडतोंड्या
In reply to कृपया संदर्भ द्या by शरद
In reply to थोडा खुलासा by शरद
मला असे म्हणावयाचे आहे कीं राम आणि कृष्ण यांच्या वेळचे धर्म निराळे होते. कृष्णाच्या काळी धर्मच बदलला गेला असल्यामुळे त्याने पित्याची आज्ञा "अंतीम" म्हणून पाळली नसती. यात रामाचे चुकले असे काहीही म्हणावयाचे नाही. कृष्ण पित्याची आज्ञा पाळत नव्हता असेही म्हणावयाचे नाही. "राजा कालस्य कारणं " च्या धर्तीवर "धर्म: कालस्य कारणं " असे म्हणणे उचित ठरेल.भारतीय संस्कृतीच्या कालौघातील विकासात आदर्श (अवतारी) पुरुषांच्या जागा सातत्याने बदलल्या असे म्हणायचे असल्यास बर्यापैकी सहमत असेल . कृष्णपिता वसुदेव हे महाभारतातील मुख्यपात्र नाही त्यामुळे श्रीकृष्णाच्या पितृआज्ञा पालनाची परिक्षा घेतली जाण्याचा प्रसंग कृष्णावर येत नसेल. युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय असतील तरी नमन कर आणि कर्यव्यासाठी उद्धही कर हा नवा नॅरेतीव्ह कृष्णकथेतून नक्कीच उभा रहातो. भीष्म / माधवी या दोन केसेस मध्ये पितृइच्छा सन्मानाचे टोक दिसून आपोआपच मर्यादा लक्षात येईल हे नॅरेटीव्हमधून नक्कीच साध्य होते - कंस ते कौरव पितृसन्मानाची आदर्श उदाहरणेही नव्हेत- कृष्ण आला आणि कर्तव्यासाठी पितामहाशी युद्धही करावे लागेल तर करावे -पितामह आले की त्यात पित्याला समान क्रायटेरीया लावला जाईल हा नॅरेटीव्ह मान्य होतो ह्या धागा लेखकाच्या मताशी या पॉईंट पर्यंत सहमत होता येते. कर्तव्यासाठी पित्याशी संघर्षाचा हा एकमेव नॅरेटीव्ह नव्हे, गणपती कथेत मातृ आज्ञेसाठी गणपती पित्यासमोर बलीदान देतो. दुसर्या बाजूस रेणूका कथेतील परशुरामा व्यतरीक्त इतर बंधू न पटलेली पितृ आज्ञा स्विकारत नाहीत स्वकीयांची हत्या करून सुद्धा पितृआज्ञेच्या महत्तेचा नॅरेटीव्ह गिरवले जाणे परशुराम आधीचा की नंतरचा याने थांबत नाही. भारतीय नॅरेटीव्ह मध्ये पितृआज्ञा श्रेष्ठच असल्याचे वारंवार गिरवले जाते. भीष्म /माधवी कथेतही पितृआज्ञापालनाचे टोक गाठले जाऊनही मर्यादांची अप्रत्यक्ष जाणीव दिलीतरी पितृआज्ञा पालन आदर्श असल्याच्या नॅरेटीव्हला कृष्ण कथेमुळे भारतात पुर्णतः बदलतो असे वाटत नाही. कंसाचे आणि औरंगजेबाचे पित्याला कैदेत टाकून सत्ता हस्तागत करणे पारंपारीक भारतीय सांस्क्रुतिक मनाला सारखेच खटकते. नेपाळचा राजपूत्र माता पित्यांचा नाश करतो यावर सर्वसामान्य हिंदूंना चटकन विश्वास ठेवणेही कठीण जाते. रामायण महाभारतातील नॅरेटीव्हज मध्ये केवळ पितृआज्ञा बद्दलच्या दृष्टीकोणातून स्पर्धा होत नाही ती इतरही बर्याच नॅरेटीव्हमध्ये स्पर्धा करतात त्यात एक उदाहरण अतिथीदेवोभवच्या नॅरेटीव्हचेही उदाहरण घेतले तर महाभारत नॅरेटीव्ह अतिथीदेवोभव टोकास जाऊनही स्विकारताना दिसतात तर सीताहरण , शुर्पणखेला दिली जाणारी वागणूक यात आतिथी आदर अगदीच गेला असे नाही पण अतिथीदेवोभवच्या महाभारत नॅरेटीव्हला रामायण काऊंटरकरते का ? रामायण आणि महाभारत यांचे नॅरेटीव्हज एकमेकांशी स्पर्धा करतात हे खरे पण धागा लेखक या दोन्ही ग्रंथांची संपूर्ण रचना एक आधी मग दुसरा अशा स्वरूपाची गृहीत धरून लेखन करतो असे वाटते. यात या दोन्ही ग्रंथांच्या प्रक्षिप्तता भराच्या शक्यता लक्षात घेतल्या जात नाहीत. प्रक्षिप्त पौराणिक लेखन जसे -अंशतः भाटगिरी- तसे राजपूत्रांना चातुर्य कथा सांगण्यासाठी जसे जोडले गेले असु शकते तसे ते पौराणिक कथाकथनाच्या प्रक्रीयेतूनही विकसीत होऊ शकते तसे ते कथांच्या नाट्यप्रदर्शनाच्या दरम्यानही विकसीत होऊ शकते. कथांच्या नाट्यप्रदर्शनाच्या दरम्यान प्रेक्षकांना नाट्य कलेने मोहीत करण्याच्या दृष्टीनेही कथाविकास स्पर्धात्मक स्वरुपाचा झाला असू शकतो ही शक्यता पुरेशी लक्षात घेतली जाताना दिसत नाही.
In reply to मला असे म्हणावयाचे आहे कीं by माहितगार
युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय असतील तरी नमन कर आणि कर्यव्यासाठी उद्धही कर हा नवा नॅरेतीव्ह कृष्णकथेतून नक्कीच उभा रहातो.हा नवा नरेटीव्ह कसा? युद्ध हाच योद्ध्याचा धर्म आहे. अर्जुन तो विसरला होता, त्याला त्या धर्माची आठवण करून देण्याच काम कृष्णांने केले. नविन त्यात काही नाही.
यात या दोन्ही ग्रंथांच्या प्रक्षिप्तता भराच्या शक्यता लक्षात घेतल्या जात नाहीत.100% सहमती. मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपात येण्याची सुरुवात 2500-3000 वर्षांपासून झाली आणि प्रत्यक्ष घटना त्याआधि होऊन गेल्या होत्या त्यामुळे त्यात भर पडलीच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
रामायण महाभारतातील नॅरेटीव्हज मध्ये केवळ पितृआज्ञा बद्दलच्या दृष्टीकोणातून स्पर्धा होत नाही
रामायण आणि महाभारत यांचे नॅरेटीव्हज एकमेकांशी स्पर्धा करतात हे खरेअशी स्पर्धा करतात असे का वाटते? दोन स्वतंत्र ऐतिहासिक महाकथा आहेत त्या.
कथांच्या नाट्यप्रदर्शनाच्या दरम्यान प्रेक्षकांना नाट्य कलेने मोहीत करण्याच्या दृष्टीनेही कथाविकास स्पर्धात्मक स्वरुपाचा झाला असू शकतो ही शक्यता पुरेशी लक्षात घेतली जाताना दिसत नाही.नाट्यरूपात जरी कथा आल्या असतील तरी स्पर्धा का हा मुद्दा अनुरत्तीच राहतो. - (अर्जुन) सोकाजी
In reply to युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय by सोत्रि
In reply to सर्वप्रथम आपण खुप चांगले by माहितगार
स्पर्धा नेमक्या कोणत्या स्तरावर होत होत्या तर त्या आश्रय देणार्या राजांचा आश्रय आणि दानात अधिक वाटा मिळवण्यासाठीरामायण किंवा महाभारत कोणत्याही आश्रयाच्या अपेक्षेने किंवा दानाच्या अपेक्षेने लिहीलेली महाकाव्य नसावीत.
प्रतिस्पर्धी धर्माचेप्रतिस्पर्धी धर्म हे आजच्या परिप्रेक्षात कदाचित तार्किक वाटू शकेल. पण ज्या काळात अवतारी पुरुष किंवा सिद्धपुरुष आदर्श शिकवण देत होते त्या परिप्रेक्षात तस असाव अस म्हणण धाडसी असेल.
हि स्पर्धा बौद्ध जैन वैदीक आणि आगम त्यांचे उपगट अशी आहेचही स्पर्धा, त्या त्या शिकवणीच्या फॉलोअर्सनी केलेली आहे. कारण मूळ शिकवण विसरून कर्मकाण्डाच्या मागे लागत, शिकवणीचे वेगवेगळे अर्थ लावून, सम्प्रदाय तयार झाले. आणि सम्प्रदाय मोठे करण्यासाठी फॉलोअर्स लागतात, ते मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असे म्हणता येऊ शकेल. - (अर्जुन) सोकाजी
In reply to थोडा खुलासा by शरद
मला असे म्हणावयाचे आहे कीं राम आणि कृष्ण यांच्या वेळचे धर्म निराळे होते.धर्म१ सनातन असतो किंवा कालातीत असतो. त्यामुळे धर्म: कालस्य कारणं हे कस शक्य होईल?
कृष्णाच्या काळी धर्मच बदलला गेला असल्यामुळे त्याने पित्याची आज्ञा "अंतीम" म्हणून पाळली नसती.उलटपक्षी, रामाने पित्याची आज्ञा पाळत, पुत्रधर्माचे पालन करून, कृष्णाने पुढे गीतेत सांगितलेला 'कर्मयोग'च आचरणात आणला होता. त्यामुळे धर्म बदलला जात नाही असे म्हणता येते. -------------------------------------------------------------------------------------------- १ ईथे धर्म म्हणजे सम्प्रदाय नव्हे, धर्म म्हणजे निसर्गनियम किंवा निसर्गदत्त आचरण
In reply to अभ्युत्थानार्थ धर्मस्य नव्हे by llपुण्याचे पेशवेll
In reply to कृपा करून हा लेख मायबोलीवर by तमराज किल्विष
छान !