‘शब्दमल्हार’ नियतकालिक, ऑक्टोबर 2019 च्या अंकात श्री. रविंद्र पांढरे यांनी लिहिलेला लेख:
दांभिकतेवरचं परखड भाष्य:
‘मी गोष्टीत मावत नाही’
- रवींद्र पांढरे
सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा बहुजन समाजजीवनाचा एक महत्त्वाचा घटक. याचं जगणं म्हणजे समाजजीवनाचं, समाज संस्कृतीचं प्रतिबिंबच. चाकोरीबद्ध आयुष्य हे याचं प्रातिनिधीक वैशिष्ट्य. स्वप्न पाहील, पण ते पूर्णत्वास गेलंच पाहिजे यास्तव आग्रही नाही. समाजकारण, राजकारण, अध्यात्म, साहित्य आणि कामजीवनही, यावर तासनतास चर्चा करेल, त्यावरचं आपलं आग्रही मत हिरीरीने मांडले, पण ते केवळ चर्चेपुरतं, आपआपल्या वर्तुळाच्या मर्यादेत.