काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ''साला, यावर लिहिलं पाहिजें" पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. '' माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन" हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ''नाटय महोत्सव''.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता कार्यक्रम.. ते काहीही असो , या घटनेने मला मात्र खुप काही दिलं,शिकवल .