मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शहाणपण शोधतो मी...

बाजीगर ·
Intelligence is abundant in the world, I'm searching wiseness...  जगात, बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी | मोठेपणा खूप झालाय,  लहानपण शोधतो मी | तर्क कुठे उगाळावा,  सहाण पण शोधतो मी | माणुसकी ची पाणपोई, तहान पण शोधतो मी | प्रत्येक उत्तर chat gpt ला, विचारणाऱ्या पिढीच्या, छद्मी AI पासून दूर नेणारे, वाहन पण शोधतो मी | शुष्क तार्किक संवादात, मायेचा ओलावा कळेना, जुन्या अडाणी प्रेमाचा, जहाँ पण शोधतो मी | बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी |

67 नगरसेवक बिनविरोध विजयी

बाजीगर ·

शाम भागवत 05/01/2026 - 07:21
फक्त ६७! २०१८ साली प. बंगालमध्ये स्थानिक निवडणुकांत काही हजार बिनविरोध निवडून आले होते. सुप्रिम कोर्टानेही त्याची दखल घेतली होती. त्यावरची केलेली कविताही वाचायला आवडेल.

In reply to by शाम भागवत

२०१८ म्हणजे ७-८ वर्षे मागे जायची पण गरज नाही. अगदी मागच्या महिन्यात पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपचे १९५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्र पंजाबपेक्षा जवळपास चौपट मोठे राज्य आहे आणि महाराष्ट्रात ६७ तर पंजाबात १९५ म्हणजे जवळपास तिप्पट. म्हणजे महाराष्ट्रात जो प्रकार झाला त्याच्या जवळपास १२ पटींनी अधिक गंभीर प्रकार पंजाबमध्ये झाला. पण त्यावर सगळे डापु गँगवाले लोक मूग गिळून- मिडियातही ही बातमी कुठेतरी कोपर्‍यात. बहुदा पंजाबातील ते बिनविरोध निवडून येणे सेक्युलर बिनविरोध निवडून येणे असावे. https://www.tribuneindia.com/news/punjab/early-lead-for-aap-as-195-candidates-elected-unopposed-over-9500-in-fray/

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तिथे किती बिनविरोध तलवारीने हल्ला?, गोळीबार, पिस्तूल कंबरेला लावणे असे प्रकार करून निवडून आलेत? तिथले पोलीस उमेदवाराना नेत्यांच्या बंगल्यावर नेत होते का? माघार घे सांगायला? डेटा देत आहात तर हा डेटा पण द्या ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आग्या१९९० 08/01/2026 - 10:05
भाजपला काँग्रेसची गरज आहे, काँग्रेसला भाजपची नाही हे काँग्रेसने भाजपला साथ देणाऱ्या आपल्या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवून दिले. आता भाजपचे मुख्यालय फोरस रोडवर हलवले तरी आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आग्या१९९० 11/01/2026 - 13:53
हा हा हा ! तुम्ही तर डायरेक्ट अंधभक्तांच्या धोतरलाच हात घातला. परंतु धोतर कधीच उडून गेल्याने तुमच्या हाती भलतंच लागेल, अर्थात त्याची शक्यताही शून्यच आहे. :)

कंजूस 05/01/2026 - 08:05
यावर भाजपने विचारले उद्धव ठाकरेही बिनविरोध निवडून असे आले? प्रतिस्पर्धींनी अर्जसुद्धा भरले नव्हते. प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर येतेच.

In reply to by विवेकपटाईत

कंजूस 09/01/2026 - 04:10
याचीच काही लोक वाट पाहात आहेत. पूर्वी नाही का प्रत्येक राज्यांत राजे लोकांच्या वारसांची भांडणे व्हायची 'गादीसाठी' आणि त्यातला एक जण ब्रिटिशांची मदत (कंपनी सरकाराची) घ्यायचा.

निवडणूक झाली नाही, पण विजयी झाले काही. नवीन फंडा बिनविरोध... व्हा बाप वापरून निरोध ! ५ कोटी बक्षीस द्या... माघारपत्र विकत घ्या... निवडणूक आयोग करणार आहे चौकशीचा फार्स, एक affidavit फेकून मिळणार, शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स. कुणाचाही नव्हता दबाव, माघारवीर करणार बनाव. जिंकला गेल्याचे नाही, मतदारांचा मारला हक्क.. म्हातारी मेल्याचे नाही, काळ सोकावतो हे दुःख. एक उमेदवार असला तरी, घ्याच मतदान प्राधिकार, 'None of the above' NOTA चा मतदार वापरतील अधिकार !

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

पाषाणभेद ·
दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

पहिले ‘काव्य’ प्रसवताना . . .

हेमंतकुमार ·

चामुंडराय 26/12/2025 - 23:59
छान, कविता आवडली. कुमार१ सर, तुम्ही खरेतर गद्य लिखाणाबरोबरीने पद्य - कवितेच्या क्षेत्रात देखील मुशाफिरी करायला हवी होती आणि अजूनही करायला हरकत नाही. कविता वाचून महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी दिवस आठवले. त्या स्वप्नाळू काळातील शिरस्त्या प्रमाणे र ला ट जुळवून यमक साधत काही कविता केल्या होत्या खऱ्या परंतु पुढे व्यावसायिक आणिक प्रापंचिक जबाबदाऱ्यांच्या दबडघ्यात त्या मागे पडल्या आणि ते कवितांचे बाड कालौघात नष्ट झाले व मराठी साहित्य एका उदयोन्मुख कवीला मुकले. मराठी सारस्वताचे दुर्दैव (आणि वाचकांचे सुदैव), दुसरे काय? पुढे मिपा चे सदस्यत्व घेतल्यावर कविता ह्या प्रकाराला फारसा ट्यार्रपी नाही असे लक्षात आले. मग काही प्रसिद्ध कवितांचे विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ती केवळ शाब्दिक मोडतोड ठरली.

हेमंतकुमार 27/12/2025 - 07:48
विडंबन करण्याचा प्रयत्न केला खरा
प्रयत्न केला हे महत्त्वाचे ! येऊ द्यात अजूनही एखादी कविता. स्वागत असेल :)

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 27/12/2025 - 20:24
पेश हैं - भारतातील ख्रिसमस आणि सांताक्लॉज बद्दलची hype बघता भारतीयांच्या सर्वसमावेशकतेनुसार ते सांताक्लॉजची आरती करायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.  डिसेंम्बरा डिसेंम्बरा ख्रिसमस सांता डिसेंम्बरा । सांताबाबाचे नाम स्मरा हो सांताबाबाचे भजन करा ।

Bhakti 27/12/2025 - 13:47
खुप छान मनोगत लिहिले आहे.खरच यमक उत्तम जुळवलि आहेत ;) ;) मला निम्म्या आयुष्यभर कविताच सुचल्या :)माझा ब्लोग २००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे. मला आजही ओळ्खीचे भेटले कि कविता करते की नाही असे कौतुकमिश्रित विचारतात.आता माझी कविता काहिशी विझली आहे,ठरवुनच विझवलि आहे !! त्या सगळ्यांचा आशय असा होता की जातिवंत कवीने फक्त कविताच करायच्या असतात; इतर कुठल्याही साहित्यप्रकारांमध्ये हातपाय मारत बसायचे नसते +११११ जेव्हा तुम्ही खरच कवितेच्या प्रेमात्,प्रान्तात मनापासुन असता ना,तेव्हा फक्त कविताच सुचतात..इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता.

हेमंतकुमार 27/12/2025 - 16:29
२००७-२०१४ पर्यन्त माझ्या कविता, त्याच्या रसग्रहणाने सम्पन्न आहे. अरे वा ! अभिनंदन . . इतक गोड ,जीवनाला पुरेल अस स्वप्न आहे कविता. अगदी ! छान काव्यमय प्रतिसाद.

वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून.

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि ·

टर्मीनेटर 23/12/2025 - 10:45
बोलेतो... एकदम झकास 👍 लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...

प्रचेतस 24/12/2025 - 07:20
कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे. ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.

येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा.

कोडी

युयुत्सु ·
कोडी === -राजीव उपाध्ये १६. नोव्हें २०२५ तो सरळ चालत होता... चालता चालता त्याला आयुष्याने कोडी टाकायला सुरुवात केली. तो कोडी सोडविण्यात मग्न असताना त्याला कुणीतरी धडक देऊन पाडले. तो पडला जखम झाली भळभळा वाहू लागली. मग आजुबाजुच्या लोकांनी त्याला आणखी दगड मारायला सुरुवात केली. त्याला आणखी जखमा झाल्या. पण तरीही त्याने सर्व ताकद एकवटली. नियतीचा धावा केला. धडपडतं परत उठून उभा राहिला. आणि मग... ... ... ... मग त्याने आयुष्याला कोडी टाकायला सुरुवात केली. ती कोडी सोडवता येईनात तेव्हा दगड मारणारे पळाले. त्याला ’शांत’ करण्यासाठी मोठे दगड शोधू लागले.

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

कळलं च नाई

सुखी ·
इवले इवले डोळे, खूप खूप खेळले, दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले, रडता रडता कधी हसले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे, मोठे कधी झाले, कळलं च नाई. इवले इवले डोळे, दूर निघून गेले, कधी परत येतात, कळलं च नाई. इवले इवले डोळे, परत फिरून आले, नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

समुद्रच आहे एक विशाल जाळं

पारुबाई ·
ही एक दीर्घ कविता आहे. एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट. या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.