Skip to main content

कळलं च नाई

लेखक सुखी यांनी बुधवार, 22/10/2025 08:20 या दिवशी प्रकाशित केले.

इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

लेखनविषय:

वाचने 441
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया