.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
22 Dec 2025 - 11:57 pm

येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता.

आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका.

आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला भरपूर मराठी कथा कविता ऐकायला मिळतील.

थेट लिंक:

https://youtu.be/mJWY89lJMpY

एम्बेडेड व्हिडिओ:

ही कथा आहे येरूडकरची..

पावसात भिजत आणि बुडत चाललेली एटीएमची रूम,
तिथे बसलेला एक पेताड आणि हरलेला गार्ड,
त्याचा आणि एका टेकीला आलेल्या गरोदर कुत्रीचा मूक संवाद… पावसाच्या संकटात अडकलेले दोन जीव.

ही कथा शब्दांइतकीच आवाजावर उभी राहणारी आहे.
प्रत्येक पात्राचा स्वभाव, बोली आणि थांबे
आवाजातून जिवंत झाले आहेत.

हे निव्वळ कथावाचन नाही. ही एक कथानुभूती आहे. खऱ्या अर्थाने कथाकथन आहे. समोर बसून गोष्ट सांगणं म्हणा ना..

कथाकवितामुक्तकभाषाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

23 Dec 2025 - 4:35 am | विजुभाऊ

झकास
खास गवि टच असलेली कथा.

हेमंतकुमार's picture

23 Dec 2025 - 7:00 am | हेमंतकुमार

अभिनंदन !

टर्मीनेटर's picture

23 Dec 2025 - 10:45 am | टर्मीनेटर

बोलेतो... एकदम झकास 👍
लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...

Bhakti's picture

23 Dec 2025 - 11:29 am | Bhakti

छान!

वास्तवातील करुणा. भारी झालीय कथा.
गोवे ( गोष्टी वेल्हाळ) इतके दिवस होते कुठे?

भागो's picture

23 Dec 2025 - 11:21 pm | भागो

व्वा, मस्त कथा आवडलीच.
छोटीसी कथा, शब्दांचे अवडंबर न माजवता, आशय घन!

प्रचेतस's picture

24 Dec 2025 - 7:20 am | प्रचेतस

कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे.
ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2025 - 4:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असंच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

किंडलवर कथा वाचली आणि आवडली.
अभिप्राय पण दिला आहे.
स्वगतः गवि आत मिपावर ललित / कथा, प्रवासवर्णन लिहीणार का?

आवडली.