Skip to main content

कविता

चमकणारे आभास निळे

लेखक निनाद यांनी रविवार, 14/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ. 'मी विचार करतो, म्हणून मी आहे'? पण हे विचार कुणाचे?
काव्यरस

उंदीर

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 01/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
घरात पडला उंदीर मरूनी थकलो सगळे शोध घेऊनी चंद्रावर गेला मानव तरीही उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...
काव्यरस

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

लेखक Bhakti यांनी रविवार, 24/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण १ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.

असं कुठं लिहिलंय?

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 22/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा मागे वळून बघू नये, म्हातार्‍याने चळू नये, आठवणीत जळू नये, असं कुठं लिहिलंय? अवचिता परिमळू नये, शरदी मेघांनी पळू नये, अवकाळी झरू नये, असं कुठं लिहिलंय? कातरवेळी झुरू नये, कांचनसंध्यी उमलू नये, गजरा भाळी माळू नये, असं कुठं लिहिलंय? एकांताशी बोलू नये, भरल्या डोळी डोलू नये, ओल्या शब्दीं भिजू नये, असं कुठं लिहिलंय? उंबऱ्याशी थांबू नये, गवाक्षी झांकू नये, प्रेमागंधी गंधू नये, असं कुठं लिहिलंय? सावलीं मागे धावू नये, भूतकाळाशी भांडू नये, शब्द मागे फिरवू नये , असं कुठं लिहिलंय? हसू ओठी बांधू नये, आंसू कुणा

पाउली पैंजणांचा मला भार आहे

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 19/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे.. शेजावरी स्वप्नकळ्यांचा मूक शृंगार आहे कुंकवाचा चंद्रमा त्यालाही डाग आहे... नजरेत भावनांचा भरला बाजार आहे.. आरसा मनाचा त्यालाही भेग आहे.. अंतरात श्वासांचा खोल वार आहे.. सावल्यांच्या मिठीत माझा संसार आहे... पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे.. -शब्दमेघ..एक मुक्त स्वैर स्वच्छंदी जीवन (१९ ऑगस्ट २०२५) (चार वर्षांनंतर पहिल्यांदा)
काव्यरस

सहा कोवळे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

गुरूंना वंदना

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 10/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे || उंच पर्वत, खोल दरी हळू जोरात वाहणारी नदी हे म्हणती, मानवा शिका रे जितके श्रम तिथेच यश सारे || पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक ते शिकवती, आयुष्य बिकट चिकाटीने पुढती जाता होते सगळे सरळ सुलभ || हे सगळे मनुष्याचे गुरू जन्मास येता होई शिक्षण सुरू बालक असो वा वृद्ध जर्जर शिकणे त्याचे न संपते खरेतर || त्या शिक्षणा देती मूर्त आकार ते आपले गुरू साकार || अ पासून शिकवता बाराखडी कधी वापरावी लागते छडी || तसेच शिकता जीवन कळते तेव्हा उमगते परी नंतर वळते || मोठे झाल्यावर कळतो तो पाढा तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा || क
काव्यरस

आषाढी एकादश

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 05/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादश, भक्त कासावीस, विठ्ठलाची आस, दर्शनाची || उचंबले मन, हरपले भान, लागलेच ध्यान, पांडुरंग || वैजयंती सुगंध तुटे भाव बंध, वैष्णव ते धुंद, नाचण्यात || टाळ मृदुंग धून, विठ्ठला चे गुण, भजन आतून, कीर्तनात || नाचे वारकरी, तुळशी हार करी, भवतारु पारकरी, कृपावंता || कसा भक्तीरंग, बाजीगर दंग, पाहता अभंग, लेखणीत ||

गेले द्यायचे राहून.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 28/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
गेले द्यायचे राहून....., म्हणत आयुष्य Mute केलं प्रारब्ध, नशीब म्हणत ..... कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं जगण्याची मजा काय विचारता? स्वतःच्या मनाला mute करून, दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय... Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर Google करून बघतोय! घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं .... इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत Telling lies करतोय.... worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय. म्हटलं तर successful...म्हटलं तर blissful Stressful आयुष्य gressful करून जगतोय. "आकांक्षाशी", break up झालं तरी heart अजून lite आहे "अपेक्षा" ची साथ
काव्यरस

यंदाचा पाऊस .

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 20/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय ! बराच चिखल मग बरेच उन्ह मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून निसरडा कधी , गच्च ओला क्षणात रस्ता भिजवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥ गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा , तरिही अंगावर आणवून काटा मोठ्या भावासारखा घाबरतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥ पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर स्वतःची शक्ती पाऊस दाखवून "मीच परमेश्वर" , म्हणतोय पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .