येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता.
आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका.
आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला भरपूर मराठी कथा कविता ऐकायला मिळतील.
थेट लिंक:
https://youtu.be/mJWY89lJMpY
एम्बेडेड व्हिडिओ:
ही कथा आहे येरूडकरची..
पावसात भिजत आणि बुडत चाललेली एटीएमची रूम,
तिथे बसलेला एक पेताड आणि हरलेला गार्ड,
त्याचा आणि एका टेकीला आलेल्या गरोदर कुत्रीचा मूक संवाद… पावसाच्या संकटात अडकलेले दोन जीव.
ही कथा शब्दांइतकीच आवाजावर उभी राहणारी आहे.
प्रत्येक पात्राचा स्वभाव, बोली आणि थांबे
आवाजातून जिवंत झाले आहेत.
हे निव्वळ कथावाचन नाही. ही एक कथानुभूती आहे. खऱ्या अर्थाने कथाकथन आहे. समोर बसून गोष्ट सांगणं म्हणा ना..
वाचने
1508
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
झकास खास गवि टच असलेली कथा.
वा ! उत्तम
बोलेतो... एकदम झकास!
छान!
वास्तवातील करुणा. भारी झालीय
व्वा, मस्त कथा आवडलीच.
कथा अजून ऐकली नाही पण तुमची
In reply to कथा अजून ऐकली नाही पण तुमची by प्रचेतस
+१
किंडलवर कथा वाचली आणि आवडली.
एक नंबर कथा कथन सुद्धा छान