ज्यू असण्याचे जोखड
रोज शरीराची
मशाल पेटवावीच
लागते,
इच्छा असो वा नसो
तसे फारसे
पर्यायही
उपलब्ध नसतात
मग उगाचच वाटत
राहतं
आपण नाझींच्या छळछांवणीतले
ज्यू आहोत म्हणून ......
यातनागृहे
सर्वत्रच आहेत
तक्रार करण्यात
हशील ते काय ?
जे भोगायचे ते निमुटपणे
फक्त आरश्याला सांगायचे
तेही डोळे मिटून
कारण
उघड्या डोळ्यांनी
आरसा बघवत नाही
अन
त्यात दडले नापाक
असे हे शरीर....
मिसळपाव
पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत
आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात
न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे
नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात
अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी
एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते
आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता
अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात
आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते
आतल्या आतच फुलणारे ते झाड आनं