Skip to main content

कविता

पुस्तके…

लेखक मनिष यांनी शनिवार, 02/01/2016 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
Pustake पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते आतल्या आतच फुलणारे ते झाड आनं

याद

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 02/01/2016 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी याद अशी , अमावसेच्या रातीला येते अन रातीसारखच माझ मन अंधारागत करून जाते डोळ्यावरची झोप , रुसून जाते अन बेचैन हृद्यायला खवळत सुटते सुटलेले क्षण , Chat History मध्ये शोधते हरवलेले मन , तुझ्या प्रतीमात हरवते डोळे असेच screen समोर , मग हळूच ओले होतात अन सकाळची सूर्यकिरणे , ऑफिसला जाण्याची साद देतात ........
काव्यरस

आयुष्य

लेखक सुधीर वैद्य यांनी शनिवार, 02/01/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य आपले आयुष्य हे मेणबत्ती सारख असत, जळता जळता आठवणींच मेण जमत असत.
काव्यरस

पोर्ट्रेट

लेखक हर_हुन्नरी यांनी शुक्रवार, 01/01/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्ट्रेट म्हणजे रूढार्थाने चेहरा चितारणे पेन्सिल, चारकोल , शाई , रंग असं काहीही वापरून पोर्ट्रेट म्हणजे सर्वसाधारणपणे एक कपाळ , भव्य ( भव्य कपाळ वाले लोक भाग्यवान किंवा श्रीमंत असतात असं म्हणतात) किंवा अरुंद , आठ्यांनी भरलेलं किंवा अगदी सपाट जी ए कुलकर्णींच्या कथेतली कपाळावरची तटाटलेली शीर दाखवणारं कपाळावर आलेली केसांची बट किंवा चक्क टक्कल दोन भुवया पांढऱ्या किंवा काळ्या कुळकुळीत सुबक कापलेल्या किंवा शरीरावरील सर्वात दुर्लक्षित भागांपैकी एक एकमेकींना न जोडलेल्या एकमेकींना जोडलेल्या ( असे लोक भाग्यवान किंवा श्रीमंत असतात असं म्हणतात) दोन नाकपुड्या असलेलं एक नाक

'नो बॉल'

लेखक अविनाश लोंढे. यांनी शुक्रवार, 01/01/2016 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपण व्यर्थ शृंखलेत बरबाद झालो खोलीची पर्वा न करता दरीत पडलो एका चुंबनाने दोघ मोहजालात अडकलो एक प्रेम ज्याला नाकारू नाही शकलो आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं , मरेपर्यंत हवीये तू मला …. मृगजळाच्या मागे धावयचा नाही मला , मरेपर्यंत हवीये तू मला …. 'नो बॉल' सारखा आलोय तुझ्याकड , सडकून मैदानाबाहेर पाठवू नकोस मला तुझ्या 'क्रीझ' जवळ यायचा होता पण तू 'extra hit 'ला ही सडकलं आभाळाच्या ही वरती तुला मी चढवलं आत्ता तुझे डोळे खाली बघायला हि लाजल सारच बदलल, तू माझ्या मनाला जाळलं अन त्याच राखेत जमिनीवर प्रेम अडकलं आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं , आजन्म हवीये तू मला ….
काव्यरस

अनुभव

लेखक सुधीर वैद्य यांनी शुक्रवार, 01/01/2016 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
अनुभव अनुभव हा अनुभव असतो. प्रत्येकाचा वेगळा असतो. अनुभव सुखद असतो किवा दु:खद असतो. दु:खद अनुभव आयुष्यावर काळी छाया पसरवतो सुखद अनुभव आयुष्याला सोनेरी किनार देतो. सुखद अनुभव थकल्या जीवाला आसरा देतो, मनावर फुंकर घालतो. मलाच दु:खद अनुभव का म्हणून विचारू नये. दु:खद अनुभव दुसऱ्याला का नाही म्हणून खंतावू नये. कोणता अनुभव मिळेल हे आपल्या नशिबावर अवलंबून असते. मित्रानो, प्रत्येक अनुभव घेत जावे. प्रत्येक अनुभवातून शिकत जावे. दु:खद अनुभव तुम्हाला शिकवतो. सुखद अनुभव विकार वाढवतो. दु:खद अनुभवाने खचू नका. सुख - दु:ख हे निसर्गाचे चक्र आहे. देवही एव्हडा निष्टुर नाहीये. त्याच्याकडे सोसायला बळ म
काव्यरस

विरहाची कास

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 31/12/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
देह फुलवात सांजेची ज्योत त्यागते कात नागिणीची माया ! अत्तराचे बंध वाहती सुगंध कपाळी गंध ओल्या चंदनाचा ! वाहता पान्हा कोरडा कान्हा जाहला गुन्हा देह बळजोरीचा ! अंतरात काटा फुटती लाटा जोगीयाच्या बटा कश्या विखुरल्या ! राऊळी नगारा राखेचा ढिगारा मोराचा पिसारा रानात गळाला ! सांगा साजणीस मनातले क्लेष उरात विष साठून ठेवले ! कुवार गर्भास पिशवीची आस विरहाची कास धरू नये ! सजली शेज वेगळाच बाज समुद्राची गाज ऐकू नये ! विजयकुमार......... 07 . 01 . 2010 , मुंबई

माझ्या आठवणीत

लेखक माहीराज यांनी बुधवार, 30/12/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेलो कधी सोडून तरी     मला कधी विसरु नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। हाती हात तुझाच होता        आता कोणती आस प्रीत माझी अखंड राहील        थांबेल जरी श्वास नाही दिली जन्माची साथ     म्हणून राग मनी धरू नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। जीवन होते माझे तरी      आधार तु जगण्याचा  प्रश्नच आता उरत नाही      मी तुला विसरण्याचा जीवन माझे संपले तरी      नाते आपुले तो
काव्यरस

प्रयास

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 30/12/2015 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
(काल पोस्ट केलीली कविता ‪#‎वीट‬ , ही प्रियेसीच्या च्या नजरेने होती , आजची ‪#‎प्रयास‬ ,ही कविता प्रियकराच उत्तर …). तू जानारस होतीस , अन जाशीलही , मला राग आलाय , मी सालस असल्याचा तुला माहितेय, मी प्रयास सोडला नव्हता …… .माफी मागण्यात मी कच्चा आहे तुला माहितेय , मी हटहास सोडला नव्हता……. कदाचीत देव तरी इथं सच्चा आहे मला माहितेय … कि तुला माहितेय , मी एकदा नाही … चूक दोनदा केलीये अन दोनदा नाही …चूक तीनदा केलीये अन तीनदा नाही…. चूक शंभरदा केलीये म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये …. माझ्या चुकांना सुधारायची म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये ….
काव्यरस

गौरीचे गाणे

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 30/12/2015 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी माझी सोनुली झोपली आनंदाने तिच्यासाठी गातो चिउकाउचे गाणे || गौरीस आवडे साखर मउ साय लावुनी मी झोपवितो तिज अंगाई गाऊनी || गौरी आमची छान लांब तिचे कान तिज निजवताना भरूनी आले मन || गौरीच्या गं स्वप्नी गुळाचे उंच पहाड रात जाहली मोकळी स्वप्नांचे उघडे कवाड || माझ्या गौरीच्या स्वप्नी प-यांचा गं गाव दूधसागरी पोहते तिची चॉकलेटाची नाव || फूल पाकळयाचें सडे तिच्या नजरे वाहती आकाशी उडती गालीचे तिज चांदण्या न्याहाळती || माझ्या बहिणीचे रूप घेऊनी गं गौरी आली दोघींची एकच प्रतिमा माझ्या नजरी राहिली || विजयकुमार................. 04 / 01 / 2009 माझ्या भाचीसाठी लिहिलेले बालगीत आहे हे.