Skip to main content

कविता

काकणे आणि गाळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 29/12/2015 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखभरल्या वाटेवर पाऊल जपून टाक अनाहूत पडलेल्या उल्केचा खडा पायात शिरेल अन् तुझ्या अस्फुट हुंदक्याने संभोगनिद्रेतले गाव जागे होईल. कासाराच्या उकिरंड्यातल्या फुटक्या काकणांची पोरींनी तोरणे केलीत वा-याच्या झुळकीला चुकवून पुढे हो वारा वळला तर काकणे किनकिनतील अन् मन मारणा-या विधवांना शृंगारस्वप्ने पडतील. लुगडे जरा वर उचल लाजेचे भय तुला आहे अंधारास नाही चुकुन पाय अडकेल अन् धुळीचे लोट उठुन वखवखलेल्या कुत्र्याना जागे करतील तेव्हा मात्र अंधारपण लाजेल. नदीत पाय रेट उचलून टाकु नकोस खळखळाटात सोनेरी माश्यांबरोबर मनुष्य मांसाला चटावलेल्या सुसरीही उठतील मग मात्र गाव सोडणे अवघड होईल. वेशीतल्या गावदे

सूर्यसावलीत अडकले रथचक्र

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी सोमवार, 28/12/2015 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
वटवृक्षाच्या सावलीत खुरटी झालेली झुडपे बघताना उगाचच हरीलाल समोर येतो अन सुर्वेमास्तरांच्या सावलीत कोमेजलेली नासकी फळे आठवतात. जगणं हे असचं असतं का ? एक सूर्य अन त्याचे ग्रह त्यांचे असंख्य उपग्रह काही शोधलेले तर काही काळकुपीच्या मागे दडलेले पुढे कधीतरी परप्रकाशित उजेडात सामोरे येणारे. संभाजीही असाच होता का ? सूर्याचा ग्रह काहीच माहिती नाही पण सूर्यापासून सूर्यप्रकाश घेवूनही स्वप्रकाश पसरवून गेला, काय वाटले असेल त्याला ? मयूर सिंहासनाची धूळदाण बघताना कधीतरी सूर्यापोटी जन्म घेतल्याचा त्यास पश्चाताप झाला असेल का ?

लानपन

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 27/12/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुह्य माह्य लानपनं कसं गेलं मजाकीनं येते यादं घळी घळी नाई भुललो आजुनं धुर्या वरच्या बोरीले जातं व्हतो संगमंग रखवाली पाह्यताचं कशी आंगाले बिलंगं माहा अक्षर खराबं मारे मास्तरं म्हनूनं रमे तुह्यं मनं कसं तेचं अक्षर पाहूनं? जत्री जायाचा जीवाले बाई हरीक केवळा कशी मांगस घेऊनं खनं जरीचा पिवळा टकं लाऊनं पाह्यसं चिची वरं राघू मैना कायं कयलं त्यातलं तूह्या जीवाले सांगना? जीवा वाटते राहूनं व्हावं आजूनं लहानं तूह्या संगचं खेऊनं भागू मनाची तहानं

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 27/12/2015 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतले आपण, आपले आपले. गुलाब काढा, मोगरा लावा मोगरा काढा, मरवा लावा, मरवा काढा, सुगंध ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला सुगंध आपला आपला. खुर्ची काढा, झोपाळा लावा, झोपाळा काढा, चटई टाका, चटई काढा, मोकळीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतली स्पेस आपली आपली. काचा काढा, गज लावा गज काढा, पडदे लावा, पडदे काढा, उघडीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला प्रकाश आपला आपला. असणे नको, नसणे नको, आता कुठला ध्यास नको, कुठे फुलला, कुठे अडकला, असला मिळमिळ श्वास नको, मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला श्वास आपला आपला.

अखेरची मानवंदना

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 25/12/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.

अखेरची मानवंदना

अखेरची ही मानवंदना
नतमस्तकल्या स्वरी
अश्रू होऊन हृदय वितळले
योद्ध्या चरणावरी

कृषीवलांना, मृदश्रमिकांना
तूच आसरा होता
अर्थवादाच्या प्रबोधिनीचा
तू प्रकाशतारा होता
तूच आमुची मथुरा, काशी
प्रयाग नि पंढरी

एका दाण्यापासून दाणे
हजार निर्मित जेथे
डाकू, लुटारू बनूनी शासक
सनद घेऊनी येते
उणे सबसिडीचा मांडलास तू
हिशेब गणितेश्वरी

युगायुगाच्या अबोलतेला
फोडलीस तू वाचा
काव्यरस

निकरवरी मैनाराणी

लेखक सुरवंट यांनी शुक्रवार, 25/12/2015 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या, माहित नाही खास, काय घडले विशेष! पण हाय!! निकर कड्यावरून घसरले, अन मैना सगळ्या फांद्यांवर दिसल्या. जितकी विद्वत्ता जास्त, तितक्या त्यांच्या मैना सप्तरंगी! त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला. ‘निकरवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’ हाती लेखण्या घेतल्या, आणि निकर उडवणाऱ्या वादळामागे मैना सावरत मूढ सगळ्या अमाप धावल्या. वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले, ‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’ ......... .............. काही वीरांगणा कृतिशील! फार चळवळ्या!
काव्यरस

CTRL + C, CTRL + V

लेखक हर_हुन्नरी यांनी शुक्रवार, 25/12/2015 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
CTRL + C, CTRL + V कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करत राहणाऱ्या आपल्या बोटांना , मनाला , शरीराला कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट ची वाळवी लागून बोटं आणि मन सडून -झाडून जाण्यापूर्वी जवळच्या किंवा लांबच्या समुद्र किनाऱ्यावर जावं अथांग समुद्र किनाऱ्यावर आपला तुकडा शोधून वाळू हातात घ्यावी आणि बांधायला घ्यावा वाळूचा किल्ला किल्ला छोटा की मोठा सहज ठरवावं , किंवा ठरवू ही नये होऊ द्यावा आपणहून बनला तर छोटा , बनला तर मोठा एकासारखा दुसरा बुरुज बनवता येतो का ते पाहावं इथे कॉपी पेस्ट तंत्रज्ञान काम करीत नाही आदिम व्हावं लागतं रेतीचे सूक्ष्म ओले कोरडे चिखलाळलेले कण बनून जावं लागतं खालून

!! मद्य !!

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 24/12/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
या मदिरालयात सगळेच धुंद जाळुनी स्वत:स दिवे जाहले मंद पसरला सर्वत्र अस्पृश्य गंध रिचवुनी चषक, उरले रक्तांध !! किती बुडवावे क्लेष चषकात? मद्याने मेंदू बधीर कळ हृदयात जमतात इथे दुख: विसरण्या उद्याचे कोणी काही म्हणा, साम्राज्य आहे मद्याचे !! खर्चुनी पदर, स्वत:स विकतात हाय! पिळविटणा-या संगीतात रिझतात स्वत:ला फ़सवुनी, प्रतारणा करतील अम्रुताही लाजवेल हे विष, पिऊनी मरतील !! काजव्याची हि लढाई, करतील प्रकाशाशी स्वत:स पेटवुनी, ठेवतील कोळश्याच्या राशी ह्यांचे दु:ख कुणा का ऊमगेना ? ह्या मद्यमेळ्यात का मी उभा मज समजेना...............!! विजयकुमार.........

भय वाटते

लेखक मनमेघ यांनी गुरुवार, 24/12/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते, ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते! क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते! बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!! -मनमेघ टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.
काव्यरस