Skip to main content

कविता

हुरहुर

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/12/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या झाकोळलेल्या बोलल्या वाऱ्यास हलके जा उन्हाला सांग आता, थांब.. घे थोडा विसावा पावले चालून थकली गाव अजुनी दूर माझा सांग त्या रस्त्यासही घे श्वास वेड्या तू जरासा सांजवेळी काहुर मनी, दाटती अवचीत डोळे अंतरीचा शाम कोठे ?
काव्यरस

आई

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 17/12/2015 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
"आई " हाक मारली कि सारं आकाश डोळ्यात का गोळा होतं ? कधी कळलच नाही, इवल्याश्या तोंडातून काहीतरी भव्य बाहेर पडावं जसं ज्ञानेश्वरांच्या रेड्यामुखी गीता ! त्या लहानपणीच्या दुरवरच्या गावात ती देवघरात पूजेला बसायची अन् मी तिच्या मांडीवर डोके ठेवून निजायचो शांतपणे, रात्रभर पसरलेलं चांदण डोळ्यात साठवून ! क्षिताजापार सीमा शोधायचा एक जीवघेणा खेळ आयुष्यभर केला, नशाळलेल्या रात्री तिचा हात हातात घेतला की त्या सा-या सीमारेषा धुसर होतात त्याचवेळी क्षितीज धरतीला टेकून धरतीचॆ क्षमा मागू लागते तितकीच क्षमाशील ती मायेचा ओलावा डोळ्यात साठवून अवेळी बरसणारी ! नंदी गेली तेव्हा तिच्या डोळ्यात

आतातरी जाग

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 16/12/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
उठा करुणाकरा पसरला काळोख सैतानी प्रवृत्तीची वाढली लगबग दयाघना आतातरी जाग ! क्रूसावरी लटकुनी करू नका डोळेझाक आंधळ्या जगात डोळस सावज प्रभो आतातरी जाग ! सीता जरी सुटली मातले रावण विवस्त्र द्रौपदीला पदरात घाल दयानिधी आतातरी जाग ! अश्वत्थाम्याच्या शराने डळमळे उत्तरेचा गर्भ अनिष्ट प्रव्रुत्तींचा करा विसर्ग श्रीहरी आतातरी जाग ! दिवस ग्रासल्या काळोखाला दाव प्रकाशास्त्र रुतल्या रथाचे सारथ्य त्याग विश्वरूपा आतातरी जाग ! विजयकुमार......... ०४.०९.२००९,मुंबई

चांदणधुळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 15/12/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणधुळ माळुनी केसात आजही तू तशीच दिसतेस सोडुनी आलो कळीला तरीही टवटवीत भासतेस ! उल्कापाताचे खडे आजही जपलेत कालचे कृष्णमेघ रूपेरी जाहलेत तशीच ओढ अजुनी आहे बरसण्याची शिशिरगोठल्या ओठी स्मित टेकविण्याची ! काळात हरवलेली सय पुनश्च मिलनाचे भय जाळीदार पिंपळपानापरी हृदयी कोरले पुन्हा आठवणींचे पुस्तक जोडले ! वळुनी जातानाची नजर हृदयी बंद आहे अत्तरकुपीपरी युगे लोटली अनेक साहवासाची उर्मी साठवली उरी ! फिरुनी आलीस तू सामोरी मनाची जाहाली भिंगरी देऊनी गेलीस बगल हलकेच पुन्हा तीच उरी शिरशिरी ! विजयकुमार................. 01 / 01 / 2009

तुझी आठवण

लेखक माहीराज यांनी सोमवार, 14/12/2015 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण ही का अशी जागवी मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। रात्र वेडी जागताना अंतरंग मोहरे पाहताना मी तुला चांदणे ही बावरे का असे भास होती वेड्या मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। आठवण ही का अशी जागवी मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
काव्यरस

माझ्याच श्वासांनी

लेखक मयुरMK यांनी सोमवार, 14/12/2015 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी - जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे? आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी यातना दिल्या ना कधी मी कुणाला ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले फसविले आज मला माझ्याच लोचनांनी जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी मलाच मारायचे योजिले या सार्‍यांनी सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
काव्यरस

घरट्याची ओढ

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 14/12/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
वेळूच्या बनात एक पाखरू एकटे शीळ देई वारियाला         सांगे जा तू घरट्याला वारा उनाड बावरा घुमे वेळूच्या भवती म्हणे वेळूचे गे गाणे         गळा भर, पाखराला पारा उन्हाचा महान लखलख मृगजळ करी कंठी पाखराच्या परि         पाऊस घरचा ओला जीव बनी अडकला जीव एक घरट्यात देई हळवा संधिकाल         बळ नाजूक पंखाला - संदीप चांदणे

टेकडी आणि तो..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 13/12/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजही तो जात होता त्या टेकडीवर अर्धवट धुंदीत, शरिराला झोकांड्या देत पाउलवाटेची कोडी अंदाजाने सोडवत सरळसोट रस्त्यावरही उगाचची वळणं घेत लहानपणापासून यायचा तो तिथे जणू ती टेकडी त्याची सर्वस्व होती जिवनातल्या सगळ्या चढ-उतारांची त्याच्या ती एकमेव साक्षीदार होती आयुष्यातली प्रत्येक आनंदाची बातमी त्याने सर्वप्रथम तिलाच तर सांगितली होती आजवरच्या भांडणातली आपली बाजू फक्त तिच्याकडेच मोठ्या उमेदीने मांडली होती सगळे डाव मनासारखे जुळून आलेले समृध्दी प्रतिष्ठाही हातांत हात घालुन मिरवीत आली पण ........ अचानक फासे पलटले, दैवाने खो घातला आपलं म्हणवणाऱ्यानीही, आपली खरी ओळख दाखवली त्यानंतर तो वरचेवर तिच्याक

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .