Skip to main content

कविता

लकेरी

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शनिवार, 16/01/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
अंत कवटाळला फिरस्ता चिरे वाकडी वाट फुटल्या दिव्यांच्या काचा कापती अंधाराची लाट || गच्च झुडपात वाजे झिंगल्या रातकिड्याचां झांज अस्ताला गेली दूर वाट सांडली सांज || कुणी चुकला छायाचित्रकार टिपे प्रकाशाचे कवडसे वाहत्या वा-यासवे धुळीत हरवले गेले ठसे || आणे उधाण वारा शरीर भरल्या प्रणयास वाढत्या जवळकीने घुमती मोकाट सुटले श्वास || घुमे वा-याची शीळ उघड्या तलावाच्या शिरी दर्ग्यातुनी अलगद येती प्रार्थनेच्या सुरेल लकेरी || विजयकुमार........ ०४.११.२००९, महाबळेश्वर

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

मिशी नृत्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 15/01/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य

कुंपणापलीकडली हुरहूर

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 15/01/2016 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंतर्मनावर ओरखडे ठेवून तू क्षितिजापार गेलीस मावळत्या संध्येसारखी, क्षितीजाचं रसरसलेपण तसचं ओरखड्यात ताजं अन् ती कातरवेळेची हुरहूर मला मावळत असते. मुठ्मातीनंतर मी कितीदा ठरवलं, तुझ्या "त्या" चीरशांतीच्या विश्रामस्थळास भेट देईन का कुणास ठाऊक ? फाटकाच्या आत पाउल कधी पडलचं नाही मात्र गंजलेल फाटक कुरकुरत असताना मी तुझं ते पांढरं आच्छादन न्यहाळत असतो, पुसट होत जाणारं वाढत्या रात्रीबरोबर कमी होत जाणा-या हुरहुरीसारखं . हळूहळू सगळच पांढूरकं होत जात अन् तुला शोधणं मुश्कील होतं तू लहानपणी दडवलेला तो लाकडी रंगीत घोडाही सापडत नाही कुठतरी हरवलायं रंग हरवल्यासारखा.

संक्रांत

लेखक सुधीर वैद्य यांनी शुक्रवार, 15/01/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत आणखीन एक वर्ष सरले. थंडी घेऊनच नवीन वर्ष अवतरले. गार हवेची शाल लपेटून माणसाचे मन सुखावले. गार झुळकेने पतंग प्रेमी आनंदले. तीळ - गुळाच्या गोड वासानी पोटच भरले. संक्रांतीचे दागिने घडले. नवीन नवरीला त्याचेच अप्रूप झाले. जावईबुवा हलव्याचा हार आणि नारळ मिळणार म्हणून खुश झाले. फोटो काढले , आधी हलव्याच्या दागिन्यांचे आणि मग मुलगी -जावयाचे. आणखीन एक सण पार पडला म्हणून सासूबाईनी हुश्य म्हटले. संक्रांतीचा सण आला आणि गेला. दरवर्षीच येतो आणि जातो. पतंग उडवले जातात आणि कापले पण जातात. पतंग कधी कागदाचे असतात तर कधी स्वप्नांचे . कधी तरी माणसावर संक्रांत कोसळते.
काव्यरस

अन् मलाही!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 14/01/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू? ऐकशील? ते कंगव्यातून सुटणारे केस राहूदे तसेच, भुरभुरूदे तेवढाच त्यांना विरंगुळा ...अन् मलाही! वाराही कधी लाडात येतो पदराशी सलगी करतो तू तशीच राहा, मला सावरू दे खेळू दे त्या दोघांना ...अन् मलाही! मोकळी छान हसताना इकडे तिकडे पाहताना वेडी डूलं झुलत राहतात झुलू दे त्यांना मजेत ...अन् मलाही! गालावरच्या खळ्यांना लाल ओठ नि चंद्रबिंदीला न्याहाळत बसतो आरसा पाहू दे ग निवांत त्याला ...अन् मलाही! - संदीप चांदणे

अंतर

लेखक अविनाश लोंढे. यांनी गुरुवार, 14/01/2016 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
[ती] नवल वाटतय मला , इतक्या वर्षानी तूझी हाक आली , कदाचीत ,तुला वाटल असेल की , 'काळाने ' माझी जखम भरली …. जखम माझी अजूनही ओली , पण स्वप्नांनी आपल्या पांघरलेली आठवते ? जुन्या स्वच्छंदी तारुण्यात, सर्रकन पायाखालून जमीन सरकलेली ..... अंतर आपल्यात लाखो मैलांच …। मग कसं शक्य मीलन दोघांच ?
काव्यरस

नको वाटते..

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 14/01/2016 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
नको जीव लाऊ, नको वाट पाहू, अता श्वास घेणे नको वाटते.. कधी आस होती तुझ्या कौतुकाची, अता शब्दलेणे नको वाटते.. कशी चूक झाली, कुणी चूक केली, पुन्हा जाब देणे नको वाटते.. इच्छा निमाल्या. मनी शांतताहे. तिला छेद देणे नको वाटते. मला साद घाली खुला पैलतीर, इथे बंदी होणे नको वाटते.. (सद्ध्या एक आजी पेशंट म्हणून येतात. त्यांच्या बरोबर येणारे आजोबा अगदी लगबगीने त्यांना हवं, नको ते पहातात. म्हणून कौतुकाने त्या आजीना म्हटले, " आजोबा किती काळजी घेतात तुमची !" त्यावर त्या म्हणाल्या ,"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?" )

पहिले विडंबन

लेखक gsjendra यांनी बुधवार, 13/01/2016 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मनात याच्याविषयी रागंच होता तरी ह्यो पठ्ठया तिच्या मागंच होता सेंडलकडं नजर टाकत तिने सहज पाहिले तेवढयावरंच महाशयांनी तिला र्हदय वाहिले महाशय गेले विचारात घरी जाऊन पडले पत्रांच्या अरी खिशात पैसे नसताना एसटीडी कॉल केला फोनवर तिच्याऎवजी तिचा बापंच आला हिंमत धरून घरी गेला पैलवान बापाने काळानिळा केला जीभ चावत म्हणाला चूकला बेत वाटेत दिसले तिरडीवर प्रेत प्रेतावर पूष्प टाकून याने मोठ्याने गळा काढला प्रेत म्हणाले गप्प मूर्खा मी तर या नादात जीव सोडला
काव्यरस

आता घे आवरते सारे

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 13/01/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
उघड्या घराचे कोंदट श्वास आता जाहलेत मोकळे लख्ख डोळ्यानी, निरख वाटा दिशा दाखवतील वादळवारे आता घे आवरते सारे || प्रत्येक जगण्याने साथ सोडली गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे किती डोळ्यांच्या वाटा करशील का वाहतोस आठवांचे भारे आता घे आवरते सारे || जनापवाद कुणा न टळला का बंद करतोस कवाडे ? मान मनाचे सामर्थ्य तुझीया अंधारातच तेवतात तारे आता घे आवरते सारे || वाहत्या आसवांनी कुणी का परतते ? सोडूनी वर्तमानास भविष्य येते कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला कुणी असे जगतात का रे ? आता घे आवरते सारे || बघ जगी , दुख राहीले भरून सुख मिळते का कधी मरुन ? परवेदनेस मानूनी आपले डोळे पुसण्यासाठी जग रे आता घे आवरते सारे ||