Skip to main content

कविता

भय वाटते

लेखक मनमेघ यांनी गुरुवार, 24/12/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते, ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते! क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते! बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!! -मनमेघ टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.
काव्यरस

कविता

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 24/12/2015 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणतेस कवितेतल, तुला काही कळत नाही पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेवून जाते मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होवून जाते ही बेहोशी सखे, कुठल्या मैफीलीत मिळत नाही, अन म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही.. मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या , तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या, काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही, पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही.. कविता म्हणजे काय ग, शहाण्यासारख वागायचं, थोडं जगात सांगायचं , अन बराच मनात भोगायचं, आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही, पण म्हणून काही आपल, कविता होण टळत नाही.. - शैलेंद्र
काव्यरस

प्रेम तुझे हे बरसणारे

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 24/12/2015 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम तुझे हे बरसणारे पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास तुझ्याच आठवणींची मनात रास असता जवळ तु हरपतसे भान दुर जाताच हे जीवन माळरान तुझ्यात रमले आणि विरघळले जशी विरघळावी दुधात साखर आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम
काव्यरस

चोरी

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 23/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
न्हाव्याच्या परसातल्या तुळशी वृन्दावनातील देव चोरल्याबद्दल तू मला कोंडून मारले होतेस मग दिवसभर तू डोळे पुसत राहिलीस मी तुला टाळत राहिलो मध्यरात्री जाग आली तेव्हा तुझा हात छातीवर होता अन् पश्चातापचे भाव ठेवून शांत चेह-याने तू निजलेली ! मग अशीच तू कधीतरी निजलीस न उठण्यासाठी ओल्या डोळ्यानी मी स्वत:ला कोंडून घेतले सा-या जगाला टाळत मध्यरात्री जाग आल्यावर दार तसेच बंद होते अन् छाती उघडी तुझा हात नसलेली आता मला पुन्हा चोरी करावीशी वाटत आहे...... हाय ! पण मीच आज कोंडलेला आहे ! विजयकुमार......... ११.०८.२००९, मुंबई

मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून नववर्षाच्या शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
तुर्तासतरी क्षमा असावी, (उघडल्या उघडल्या एक कविता दिसावी अशी अपेक्षा असेल तर, किमान ह्या धाग्यातून स्फुर्ती घेऊन कुणी कविता बनवून प्रकाशित करत नाही तो पर्यंत) खरे म्हणजे इतिहासातल्या मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांना भारतात त्यांच्यावर एक चित्रपट रिलीज झाल्याचे कळले आणि मस्तानीला कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्या वाटल्या अशी एक कविता/ काव्य कल्पना सुचता सुचता माझ्या मनातल्या मनात राहीली, -कविता सुचताना लगेच लिहिणेबल माहोल नाही मिळाला का कोण जाणे उगाचच जरासे अस्वस्थ वाटते - हि कवि मनाची अस्वस्थता स्वतःपाशीच न ठेवता इतरांशीही शेअर करून, 'मस्तानी कवितेतून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छ

अघळपघळ

लेखक रातराणी यांनी बुधवार, 23/12/2015 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
अघळपघळ बोलता बोलता गंमत सांगून गेला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला खेळत होता तिच्या केसांशी काल उनाड वारा श्वास रोखूनी पहात होता उभा आसमंत सारा वाऱ्याशी मी त्या असा एक करार आहे केला न चुकता माझ्यासोबत घेऊन येणार त्याला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला नाजुक तिच्या हातात फुलला होता पारिजात तिचाच सुगंध जणू भरून घेत होता उरात इवल्याशा फुलासंगे मी एक करार आहे केला लपवून जरासा तिच्याजवळ नेणार आहे मला ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला येई मातीस चैतन्य हळुवार पाऊल तिचे थबकता जसे आकाशाच्या तनूवर टिपूर चांदणे पसरता मातीशी मी त्या असा एक करार आहे केला पांघरूण म्हणून घेणार आहे माती
काव्यरस

प्रसन्न सकाळ

लेखक जातवेद यांनी रविवार, 20/12/2015 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ होती वाचत होतो पेपर, हातामध्ये चहाचा कप ग्यालरी माझी चार फुटाची माती भरल्या मडक्यांचे जग एका मडक्यात होती तुळस रांगोळीला केलेला आळस गतलग्नाच्या बांगड्याही तशाच नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात दुसर्‍या मधील अबोली तर खास खेळवीत होती ओल्या दवास थोडीशी गच्ची बाहेर झुकून रोखवीत होती अगणित श्वास हाय एक होते कोरफड तशात ना रूप सुगंध गणनाही कशात घेतसे कधिमधी आजारी असता औषध म्हणून केवळ लावावयास चौथ्यात असे गोकर्णाची वेल खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली फुले टपोरी दर कोंबानजिक काही परडीत काही राहू दिलेली संपला चहा वाचून झाला पेपर पाण्याचा बंब सोडी गरम हवा उठतच होतो शोधीत कपडा-पंचा आतून आवाज वाजले किती

तुझ्यासाठी..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 19/12/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस

नदितिरी

लेखक मयुरMK यांनी शनिवार, 19/12/2015 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझिया मनासी कधी तरी वाटते फिरावे नदितिरी || हळूच घेउन हाती हिरव्या गवताची कुरवाळावी पाती || नाजुक.... गुजगोष्टी सांगाव्यात तयाशी भेटून त्याना लोटले दिस आज किती तरी - || सांगावे नाते जलदाचे नदीच्या संथ जळाशी संबध ऐलतीराचा आणि पैलतीराशी तसाच सरितेचा सांगावा सागराशी जन्म गिरिकुंदरमाहेरी सार्थक अर्णवी पद सासरी || वाटते मना परोपरी नित्य फिरावे नदितिरी ||
काव्यरस

विटाळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शुक्रवार, 18/12/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या काळ्या, आरसा नसलेल्या तावदानी फक्त तुझाच चेहरा दिसतो जन्मजात जार तू जारिणीचा संग करतो ! देऊनी माझ्या कळीला फुलाची भूल, काय साधलेस सांगताना जरा शहारते कौमार्याच्या गळी माळलास कामाग्निचा अंगार ! कौमार्याच्या अनवट क्षणी तू शिलगवलास वासनेचा कोळसा माळती माझ्या कुंताली कौमार्ययोग्या आरसा ! कातरवेळी, कुवारवेळेस मी मागते कुकवाचा जोगवा गारठधूक्यात दडल्या चंद्रास माझा विटाळ देईल सांगावा ! तुझ्या परतवाटेस मी फासला शेंदुर गोठणबिंदू गाठणा-या बेवारशी रात्रीस शरीरी पेटे अंगार ! कोवळ्या आर्द्र बोटानी मी चाळवते निखारे उरलेत माझ्या भोगल्या शरीरी रासवटलेले तुझे शहारे ! विजयकुमार..................