मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
काव्यरस
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )

तहान

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
त तहा तहान तहान तहान कधी आईच्या प्रेमाची कधी बापाच्या शाब्बाशीची कधी आजी-आजोबांच्या लाडाची कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची कधी प्रेयसीच्या झलकेची कधी बायकोच्या मिठीची कधी मुलांच्या ओढीची कधी मिटते कधी वाढते कधी लहान कधी महान तहान तहान तहान तहान म्हणजे तडफड तहान म्हणजे वणवण तहान म्हणजे कोरड तहान अगदी कहर तहान नाही संपत तहान ठेवते जिवंत तहान मिळवे पाणी तहान चाळवे भूक तहान करवे तमाशा तहान एक आशा तहान हीच भक्ती तहान हाच परमेश्वर तहान कधी पुण्य तहान कधी पाप तहान शिकवी तहान घडवी तहान तहान तहान तहा त #सशुश्रीके

विरजनातली साय

पालीचा खंडोबा १ ·
लेखनविषय:
संध्यासमयी पक्षी डोंगरापार गेले पिसे ठेवुनी बोडकेच आले ! बोडके कोणी नदीकाठी रडती उष्ट्या पत्रावळी कुत्री हुंगती ! ओलेती कोणी नग्न प्रदक्षीणेत ओला गर्भ दर्भाच्या प्रतीक्षेत ! रांड बाजारात रात्रीस दिवाळी अंधाराचे झापड दिवसाच्या भाळी ! जन्मास आला झाला सोहळा मरुनी सा-याना करे मोकळा ! माती वा राख मेल्यास काय ? आयुष्य म्हणजे विरजनातली साय ! विजयकुमार कणसे......... २१ नोव्हेंबर २००९

चाफा

शिव कन्या ·
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

"बुवा....."

टवाळ कार्टा ·
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी

देवा...

कविता१९७८ ·
लेखनविषय:
काव्यरस
देवा आता तुला स्वरक्षणार्थ माणसांचा आधार घ्यावा लागतोय दर्शनालाही तूझ्या आता घेराव घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व प्राणी तुझ्यासाठी समसमान भावाचाच तु भुकेला फक्त बाकी सर्व कस्पटासमान पण आजकाल तुलाही सोन्याचा नैवेद्य लागतोय दर्शनालाही तुझ्या आता घेराव घालावा लागतोय रांगेत भक्त भोळा तुला तासनतास शोधतोय विचारतोय कोण या भोळ्या भाविकाला तुलाही आजकाल बुवाबाजीचा गोतावळा लागतोय असशील खरा देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल दांभिकतेचा मेळावा लागतोय

हुंकार वेदनेचे

पालीचा खंडोबा १ ·
लेखनविषय:
माझ्या या स्वगताला कविता म्हणायचे धाडस करु नका हे फ़क्त हुंकार आहेत ! एका अतृप्त आत्म्याचे नाकारलेल्या जीवाचे ज्याला शरीरच मिळाले नही.......... हे आक्रंदन आहे तडफ़डणा-या मनाचे, ज्याचे संचित संपले आहे! याला कवितेचा दोष देऊ नका! हा शाप मी शब्दानी भोगतोय! अश्वत्थाम्याचे प्राक्तन घेऊन स्वत:ला शोधतोय! वसंतात फ़ुले फ़ुलतील आषाढात मेघ बरसतील हि नियती आहे! माझे शब्द अवेळी येणा-या पक्षांप्रमाणे आहेत, जो थवा सोडुन भरकटलाय! मी एवढेच सांगीन जे दु:ख मी भोगतोय! त्या वेदना इथे उमटतायेत! ह्या आहेत, अपुर्णतेच्या, वांझपणाच्या खुणा, ह्याला लेणी म्हणु नका!

आपण किती हसतो!

सुमेध रानडे ·
लेखनविषय:
रोज आपण पुष्कळ हसतो, कधी योग्य कधी वायफळ हसतो. आईच्या भोळ्या प्रश्नावर प्रेमाने हसतो, बाबांच्या लहानशा चुकांवर जोमाने हसतो. मित्रांच्या घोळक्यात एकत्र हसतो, मोबाइल मधे बघून दिवसरात्र हसतो. साहेबाच्या जोकवर टाळी मारुन हसतो, आणि नंतर साहेबावरंच मागे चोरुन हसतो. कधी मोठ्याने तर कधी हळुवार हसतो, एकाच विनोदावर शतवार हसतो. कधी उशिराने तर कधी तात्काळ हसतो, कधी निरागस कधी खट्याळ हसतो. निर्लज्ज होऊन कोणाच्या तोंडावर हसतो, कधी तोंड लपवूनही अनावर हसतो. कधी मोजून मापून कधी मुक्त हसतो, कधी गालातल्या गालात लुप्त हसतो. नावडीच्या व्यक्तीवर पोटभर हसतो, स्वतःवरच्या टिकेवर मात्र वरवर हसतो. कोणाला तरी चि

रात्र

आनंदमयी ·
लेखनविषय:
काव्यरस
दूरात चंद्रमाचा मधुरम्यसा महाल फिरती सभोवताली तारांगणे विशाल निष्पाप कोवळ्या ह्या गोष्टीत दंगलेली चैतन्य शैशवाचे उधळीत रात्र आली ... तो स्पर्श पावसाळी तो चिंब देह ओला तो केवडा सुगंधी केसात माळलेला तो मोरपीस वेडा भिरभीर होय गाली हळुवार मालवूनी नक्षत्र, रात्र आली ... स्वप्नील लोचनात साचून चंद्रतारे गगनात घे भरारी, जिंकून घे दिशा रे तारुण्य ध्येयवेडे लेवून आज भाळी वाटा नव्या यशाच्या शोधीत रात्र आली ... थकल्या सुन्या दिशा ह्या अन वाट संपलेली आता छटा सुखाची अंतात गुंफलेली अंकूरण्या नव्याने झडुदेत जीर्ण वेली चाहूल शेवटाची मिरवीत रात्र आली... © अदिती जोशी unaadpaus.blogspot.com