मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात्र

आनंदमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
दूरात चंद्रमाचा मधुरम्यसा महाल फिरती सभोवताली तारांगणे विशाल निष्पाप कोवळ्या ह्या गोष्टीत दंगलेली चैतन्य शैशवाचे उधळीत रात्र आली ... तो स्पर्श पावसाळी तो चिंब देह ओला तो केवडा सुगंधी केसात माळलेला तो मोरपीस वेडा भिरभीर होय गाली हळुवार मालवूनी नक्षत्र, रात्र आली ... स्वप्नील लोचनात साचून चंद्रतारे गगनात घे भरारी, जिंकून घे दिशा रे तारुण्य ध्येयवेडे लेवून आज भाळी वाटा नव्या यशाच्या शोधीत रात्र आली ... थकल्या सुन्या दिशा ह्या अन वाट संपलेली आता छटा सुखाची अंतात गुंफलेली अंकूरण्या नव्याने झडुदेत जीर्ण वेली चाहूल शेवटाची मिरवीत रात्र आली... © अदिती जोशी unaadpaus.blogspot.com

वाचने 3640 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by एस

पैसा Tue, 01/26/2016 - 16:13
एस भाऊशी बाडिस. कविता सुंदर आहे. पण या प्रतिक्रियेचा अर्थ कळला नाही. आनंदमयी, दुसर्‍या कोणाच्या कविता इथे पोस्ट करत आहात का?

In reply to by आनंदमयी

आनंदमयी गुरुवार, 01/28/2016 - 19:38
माझ्या वडिलान्नी नुकतच अंतर्जाल वापरणे शिकण्यास सुरुवात केली आहे... डेस्कटॉप वर हे पेज उघडे असताना त्यान्नी ह्या कवितेवर स्वतःचं फेसबुक पेज समजून प्रतिक्रीया दिली.. मला हे लक्षात आलं असूनसुद्धा प्रतिक्रीया काढून टाकता येत नव्हती... कविता माझीच आहे.. :) आपल्या प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद...

खुप आवडली कविता. या कवितेमध्ये प्रचंड सुंदर आशय भरलेला आहे आणि भाषेच्या सौंदर्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. या अशा कविताच मराठी साहित्याला समृद्ध बनवित असतात आणि वेगळ्याच उंचीवर घेऊन जात असतात. पुढील लेखनासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!