Skip to main content

हुंकार वेदनेचे

हुंकार वेदनेचे

Published on बुधवार, 27/01/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या या स्वगताला कविता म्हणायचे धाडस करु नका हे फ़क्त हुंकार आहेत ! एका अतृप्त आत्म्याचे नाकारलेल्या जीवाचे ज्याला शरीरच मिळाले नही.......... हे आक्रंदन आहे तडफ़डणा-या मनाचे, ज्याचे संचित संपले आहे! याला कवितेचा दोष देऊ नका! हा शाप मी शब्दानी भोगतोय! अश्वत्थाम्याचे प्राक्तन घेऊन स्वत:ला शोधतोय! वसंतात फ़ुले फ़ुलतील आषाढात मेघ बरसतील हि नियती आहे! माझे शब्द अवेळी येणा-या पक्षांप्रमाणे आहेत, जो थवा सोडुन भरकटलाय! मी एवढेच सांगीन जे दु:ख मी भोगतोय! त्या वेदना इथे उमटतायेत! ह्या आहेत, अपुर्णतेच्या, वांझपणाच्या खुणा, ह्याला लेणी म्हणु नका! फ़क्त दगड! उन,वारा, पाऊस झेलणारा! एवढेच फ़क्त! विजयकुमार.................
लेखनविषय:

याद्या 849
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया