Skip to main content

कविता

एकांत

लेखक मीनादि यांनी सोमवार, 29/02/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
हवा मज एकांत बेबंध धुंद, आणि शांत स्व:ताचीच ओळख नव्याने करण्यास, भूतकाळच्या जखमेवर खपली धरण्यास . जगापासून अलिप्त होण्यास, स्वताच्याच कोशात लुप्त होण्यास. अंतर्मुख झालेल्या मनाला टोचणी घडलेल्या चुकांची, समजुतीची झालर फाटक्या दु:खाची. करून टाकावा निचरा कोरड्या मनाने, पुन्हा नवीन भवितव्यासाठी.
काव्यरस

तू

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 28/02/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू मेघ सावळासा घनदाट गर्द ओला तू चांदवा निशेच्या केसात माळलेला तू सूर बासरीचा दूरात गुंजणारा पहिल्याच पावसाच्या तू स्वैर धुंद धारा तू साद अंतरीची देहा सुखावणारी तू शीत शांत छाया ह्या पेटत्या दुपारी तू गंध रंगलेला दारातल्या कळीचा तू नाद गुंजणाऱ्या ह्या सोनसाखळीचा रे मी समूर्त आज सजले तुझ्याचसठी हळुवार लाघवी हे हासू तुझेच ओठी हा गंध चंदनाचा पुरता तुझ्या हवाली विरहार्त आसवेही सगळी तुझीच झाली मी एकली धरेशी तू स्तब्ध ध्रूव दूर तुजवीण मी तुझ्यात विणते सशब्द सूर जग हे जरी न माने असणे तुझे सख्या रे देहात ह्या वसे जो, तो प्राणही तुझा रे © अदिती जोशी
काव्यरस

कुण्या देशीचे पाखरू

लेखक शरद यांनी रविवार, 28/02/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुण्या देशीचे पाखरू तारुण्यात पदार्पण करतांना युवतीच्या मनांत एक नवी हुरहुर सुरू होते. शालेय मैत्रीणींच्या सोबतीतले रम्य दिवस आता थोडे मागे जात असतात. नवीन काय मिळणार आहे, आपला शोध काय ? याचाही पुरता अंदाज आलेला नसतो. नवीन मित्र जोडलेले नसतात. पण त्यांच्याबद्दल, प्रेम.... नाही प्रेम म्हणता येणार नाही, ओढ म्हणावी कां ? तसच काही तरी म्हणा पाहिजे तर. " जायेंगे कहॉ सुझता नही ! चल पडे मगर रास्ता नही ! क्या तलाश है, कुछ पता नही !! अशा विभ्रमावस्थेतली अस्फुट मनोवस्था कवी सुधीर मोघे यांनी पुढील कवितेत अतिशय तरल, हळुवार शब्दात पकडली आहे.

पाटी

लेखक मीनादि यांनी शनिवार, 27/02/2016 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
असावी एक चुका पुसणारी पाटी ठरेल ती उ:शाप प्रत्येकासाठी खदखदणारे दु:ख घडलेल्या चुकांचे ओघळले डोळ्यातून अश्रू पश्यातापाचे नकळत घडलेल्या चुका करतात आपुलाच घात मानाने मनावर केलेली खोटी मात वेळ निघून गेल्यावर सार काही कळत पण उपयोग नसतो त्याचा हेच दु:ख छळत खाडाखोड होत नाही घडलेल्या भूतकाळाची पण जगन तर सुटत नाही ओढ असते भविष्याची पुसाव्यात ह्या चुका आणि स्वच्छ करावी पाटी कारण चुकतो तो माणूस हेच कारण जगण्यासाठी.
काव्यरस

बालपण

लेखक मीनादि यांनी शुक्रवार, 26/02/2016 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे नवी भरारी नव आकाश अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश सावरावे किती अन कसे जीवाला, लागते ओढ ही किती मनाला. वास्तवाची झळ नसे पुसटशी. इवलाश्या त्या बालमनाला अखंड असावे हे दिवस निरंतर, प्रत्येकाच्या नशिबाला
काव्यरस

सासुरवाशीण

लेखक मीनादि यांनी गुरुवार, 25/02/2016 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
झालेय आता सासुरवाशीण तरी आई तुझ्याकडे यायचंय आई तुझ्याकडे यायचंय , मला परत लहान व्हायचंय नाही सहन होत ग आता जबाबदारीच ओझ तुझ्या कुशीत शिरून मला खूप खूप रडायचंय नाही इथे कुणालाच माझ ऐकायचंय मनात साठलेलं तुलाच फक्त सांगायचंय पुन्हा तुझी आळशी मुलगी मला बनायचंय पुन्हा मला उशिरा पर्यंत लोळायचय तुझ्या हातच गरमगरम जेवायचंय इथे कुणाला माहीतही नाही मला काय आवडत, सासुरवाशिणी साठी नसतो हा नियम जाणलंय मी तरीही आई मला तुझ्याकडे यायचंय मला तुझ्याकडे यायचंय आई, मला पुन्हा लहान व्हायचंय . होईल का ग हे शक्य नाही ना !!!!
काव्यरस

ढग, पाउस, आठवणी आणि भावना...

लेखक सतिश गावडे यांनी गुरुवार, 25/02/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मन कोरडं कोरडं नाही पाऊस पडत जरी जळालं हे रान नाही मोहर झडत नियतीच्या दरबारात आता मागेन मी दाद आंधळ्या न्यायदेवतेला आता घालेन मी साद आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर

कधीतरी.........

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 25/02/2016 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी पुन्हा भेटशील त्या रिमझिमणार्या पावसात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक चिंब शहारणारी बरसात कधीतरी पुन्हा भेटशील त्या पहाटेच्या धुक्यात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक गुलाबी मिठी गारठ्यात कधीतरी पुन्हा भेटशील त्या एकांती शिवारात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक उत्कट आसुसलेली सांजरात कधीतरी पुन्हा भेटशील त्या लुकलुकणार्या चांदण्यात असावीस फ़क्त तू आणि मी सोबत एक मदहोश निशिगंध अंगणात कधीतरी खरीखुरी भेटशील माझ्या एकएकट्या प्रवासात सोबत असावीस फ़क्त तू तेव्हाच अर्थ येईल ह्या जगण्यात सांग ना...... एकदातरी भेटशील.........

आठवणी

लेखक मीनादि यांनी बुधवार, 24/02/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा, आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा . कधी ना पुसे ठसे आठवांचे, ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे. कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या, नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात, आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.
काव्यरस