मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनमान

स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग शरीरभर पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

सैंधव मीठ/हिमालयीन/खेवडा मीठ

Bhakti ·
लेखनप्रकार
काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.

पंढरीची वारी

Bhakti ·
लेखनप्रकार
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे.

(पाट्या) :/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं. आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा, अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या

बरणी..

Bhakti ·
गुढ वाट्याहून प्रेरित होऊन.. मोठ्या हौशीने बरणी आणली आधी पत्र्याचं झाकण होतं लोणचं घातलं सतत तेलं खारं संपर्कामुळे ते झाकण गंजल... मग खुप शोधा शोध केली बोरं आळी,गंज बाजार त्याच मापाचं प्लास्टिक झाकण शोधून मिळवलं .. आता लोणचं नाही टाकलं मुरांबा केलाय आंबट गोड वेलदोडे ,लवंग स्वादाने भरलेला बरणीत मुरांबा आता चांगला मुरलाय बरणी आहे 'काचेची' कर् करून नावं कोरता येत नाही मलमलच्या कपडा तिच्या तोंडाशी बांधते ओळख म्हणून...

रक्तदानाची नाबाद शतकी खेळी... रक्तदान १०० पूर्ण

Abhay Khatavkar ·
लेखनविषय:
१४ मार्च २०२३....एक सुवर्णक्षण... नाबाद शतकी रक्तदान खेळी रक्तदान....एक शंभरी.... शतक... एक शुन्य शुन्य सोबत रक्तदान केलेल्याची तारखेनुसार सविस्तर माहिती PDF स्वरूपात जोडली आहे. आज सकाळी ११ वाजता इनलक्स बुधराणी हॉस्पिटल मधून प्लेटलेट साठी फोन आला की एका पेशंटसाठी प्लेटलेट पाहिजेत, लगेच या... मी त्यांना दुपारी २ पर्यंत येतो म्हणून सांगितले आणि जेवण करून ऑफिस मधुन दुपारी १ वाजता निघुन २ वाजता पोचलो.

रिमोट..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा. मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो.

एक मुलायम स्पर्शक (२)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वार्ध इथे. …………………………………………..

उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत: १. गर्भनिरोधनातील यशापयश २. गुप्तरोगांपासून संरक्षण ३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या ४.

'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

टर्मीनेटर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

साधारण अडीच वर्षांपूर्वी मिपावर चार भागांत लिहिलेल्या "दुबई : मरूभूमितले नंदनवन" ह्या प्रवास वर्णनाच्या पहिल्या भागात दुबईतल्या एका सुपर मार्केट मध्ये, तो पर्यंत ऐकून-वाचून माहिती असलेला 'चायनीज सेक्स डॉल' हा प्रका