Skip to main content

जीवनमान

ग्रॅण्ड शो

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 05/06/2023 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
नवं शैक्षणिक वर्षं उजाडलं, आम्ही नोटीस बोर्डासमोर जमलो. बघतो तर लोचा! आम्हाला दिलेला वर्ग साक्षात जुन्या इमारतीत आणि नवे विद्यार्थी (नी) मात्र नव्या इमारतीत. ही फाळणी कुणालाच मंजूर नव्हती. काही लडीवाळ शब्दांची देवाण घेवाण झाली आणि सर्वांची पाऊले हॉलिवुड कडे वळली. हॉलिवुड म्हणजे आमच्या कॉलेजची मागची बाजू. मोठा नयनरम्य परिसर. ईमारतीच्या भिंतीलगत हिरवळ आणि काही शोभिवंत झाडं. अशोक, गुलमोहर आणि नारळाचे उंच वृक्ष. दुसर्‍या म्हणजे खाडीलगतच्या बाजूला सलग बांबूची बेटं. मधे पायवाट. टोकाला खाडी, डावीकडे वळलं की आमच्या नव्या इमारतीला वळसा घालून कला, वाणिज्य च्या इमारती आणि पुढे कँटीन.

दोघांत 'तिसरा' : एक मुलायम स्पर्शक

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 28/05/2023 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो.

चौसष्ट रुपयांची बचत

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 22/05/2023 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
बचत हे आम्हा मध्यमवर्गीयांचं आमरण व्यसन. पैसे वाचवले याचा आनंद काही वेगळाच असतो. बरोबरच आहे. आपला कष्टाचा पैसा उगाच का दवडायचा? निवृत्तीनंतर वेळ भरपूर, शिवाय मिळकत बंद! आम्ही खाजगी क्षेत्रातले मजूर त्यामुळे पेन्शन नाही, फक्त टेशन. सबब काहीही खरेदी करायचं झालं तर वाण्यापासून अनेक ऑन लाईन विक्रेत्यांच्या किमती पडताळून पाहायच्या. जो स्वस्त तो आपला. कालंच घरातला तेलाचा बुधला संपला आणि राखिव बुधला वापरात आणला गेला. म्हणजे तेल विकत घेणे आले. तपासाअंती अ‍ॅमेझॉन फ्रेश वर ९९९ चा बुधला ६९९ रुपये हा सर्वात स्वस्त दर आढळून आला. मागणी नोंदवणार तेवढयात डोक्यात किडा वळवळला.

आम्हां काय त्याचे ??!

लेखक आजी यांनी मंगळवार, 16/05/2023 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अकरा मे चा दिवस. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. रिटायर्ड केंद्र सरकार कर्मचारी श्रीमती. राधाबाई, सकाळी अकरा वाजल्यापासून टीव्हीसमोर बसलेल्या होता. त्यांचं असं नेहमीच होतं. क्रिकेट मॅच (त्यात भारत खेळत असला पाहिजे हं मात्र! 'इतर' दोन देशातल्या मॅचमध्ये उनको इंटरेष्ट नहीं ।) हां ,तर क्रिकेट मॅच -अगदी बाॅल टु बाॅल-,निवडणुकींचे निकाल,(विधानसभा, लोकसभा, अगदी पंचायत समित्यांचे सुद्धा), कोर्टाचे निकाल, असं काही असेल तर राधाबाई पहाटे उठून, लवकर सर्व आटोपून, शुचिर्भूत होऊन,धूतवस्त्र नेसून,सुखासनात टीव्ही समोर बसत. नजर (नासिकाग्रावर नव्हे तर) टीव्हीवर खिळलेली असे!