Skip to main content

जीवनमान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक अहिरावण यांनी बुधवार, 06/12/2023 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

पुन्हा एकदा राजगड-तोरणा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 04/12/2023 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज पहिल्यांदा एक प्रयत्न करून बघतो आहे टायपिंग ऐवजी स्पीच टू टेक्स्ट वापरायचा. बघुया कसे जमतेय. =============================== राजगड तोरणा हा रेंज ट्रेक मी याच्या आधी पण केलाय. साधारण २०१५ मध्ये हा ट्रेक मी एकदा केला होता आणि त्याच्या आधी एकदा २००४ मध्ये तोरणा ते राजगड असा उलट ट्रेक केला होता पण त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी रात्री मुंबईहून निघून वेल्ह्यापर्यंत गेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेल्ह्यातून तोरण्यावर गेलो होतो.

दिव्यांग दिवसानिमित्त एका संस्थेची ओळख

लेखक मार्गी यांनी रविवार, 03/12/2023 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन" ✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन" ✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा ✪ बेवारसांचे वारस आम्ही ✪ जोडीने जाऊ पुढे ✪ संवेदनशीलतेची क्षमता ✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता" ✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो.

भूक आणि तृप्ती : हॉर्मोन्सची जुगलबंदी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 16/10/2023 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी शरीरात स्रवणाऱ्या अनेक रसायनांमध्ये हॉर्मोन्सचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म प्रमाणात स्त्रवणारी हॉर्मोन्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणा एखाद्या चमत्काराप्रमाणे नियंत्रित करतात. आपल्या शरीरात जवळपास ६० हार्मोन्स विविध अवयवांत कार्यरत आहेत. त्यापैकी इन्सुलिन, थायरॉईड आणि ॲड्रीनल ग्रंथींच्या दमदार हार्मोन्सचा परिचय वाचकांना यापूर्वी करून दिलेला आहे. अन्न ही आपली मूलभूत गरज. भूक लागली की आपण खातो आणि खाता खाता तृप्तीची भावना झाली की खाणे थांबवतो. या दृष्टीने भूक आणि तृप्ती या दोन अतिशय महत्त्वाच्या संवेदना आहेत.

‘निपा’ विषाणूचा अतिघातक आजार

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 04/10/2023 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे. रोगाचा जागतिक इतिहास या आजाराचा पहिला रुग्ण १९९८ मध्ये मलेशियात आढळला. तेव्हा तो तिथे डुकरांची संबंधित असलेल्या लोकांमध्ये सापडला होता. भारतातील पहिला रुग्ण 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता.

कॅपिटल आय आणि स्माॅल आय.

लेखक आजी यांनी बुधवार, 04/10/2023 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
आता मी वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलाय. सत्तरी ओलांडली. माझ्यासारखे अनेकजण आहेत ज्यांनी साठी, सत्तरी ओलांडली आहे. साठीनंतरच खरं तर वानप्रस्थाश्रम सुरु होतो. कसं वागायचं वानप्रस्थाश्रमात? प्रश्न पडतो ना? त्याची उत्तरे अनेक आहेत. पहिलं म्हणजे आपण मुलाबाळांच्या संसारात "कॅपिटल आय" न होता "स्माॅल आय" व्हायचं. अहंकार, मीपणा झटकून टाकायचा. कॅपिटल आय तरुणपणी असतो. अंगात मस्ती मुसमुसत असते. माज असतो. जोश असतो. मनगटात ताकद असते. मनात ऊर्मी , उत्साह संचारलेला असतो. मी काहीही करेन असा अहंकार असतो. "कर्तुं,अकर्तुं, अन्यथा कर्तुम्"अशी ताकद असते. जिद्द असते . क्षमता असते. कर्तबगारी असते.

एल-निनो : बिघडलेले आरोग्य आणि संभाव्य धोके

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/09/2023 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांनी या संदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे.

थेटरमध्ये पाहिलेेले इंग्रजी सिनेमा

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 13/09/2023 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
दोन हजार सालापर्यंत चित्रपटगृहातच जाऊन पाहावे लागत. तिकिटांचे दर कमी असत. चित्रपट पाहणे, हे दुर्मीळ होते त्यामुळे त्याला सामान्य माणसाच्या भावविश्वात मोलाचे स्थान होते. मराठी, हिंदी चित्रपट चित्रपटगृहात खूप पाहिले. हा लेख चित्रपटगृहात पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांवर व त्यावेळच्या भावविश्वावर. Twenty thousand leagues under the sea हा लहानपणचा पहिला चित्रपट पाहायला माझे काका घेऊन गेले होते. युनिव्हर्सल सर्टिफिकेट असल्याने मुलांनी पाहायला हरकत नव्हती. त्यातला ऑक्टोपस हा प्राणी लक्षात आहे. Black stallion हाही चित्रपट नातेवाईकांसह पाहिला होता.

रिपोर्ट (कथा - पात्रे व प्रसंग काल्पनिक)

लेखक केदार पाटणकर यांनी गुरुवार, 07/09/2023 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
रिपोर्ट दीपक पळत पळत एकत्र जमायच्या ठिकाणी आला. वर्गातली मुलं वाट पाहतच होती. आणखी एक दोघं बाकी होती. ते आल्यावर सगळे बसमधे बसले. सरांनी मोजणी केली. दहाच्या दहा हजर होते. केशरी सूर्य हळहळू वर सरकू लागला व बसही वेगाने धावू लागली. भेंड्या खेळताना प्रवास लवकर संपला. बस वाडीच्या आधी असलेल्या गावाशी पोचली. सरांनी आधीच गावातल्या लॉजचं बुकिंग केलं होतं. उतरल्या उतरल्या सगळ्यांनी चहा घेतला आणि आपापल्या खोल्यांमधे जाऊन बॅगा टाकल्या. दीपक, शेख, हरवंदे, गोखले यांचं सूत जास्त जमलेलं होतं. सगळे लॉजमधून बाहेर आले व सरांच्या पुढच्या सूचनेची वाट पाहू लागले.

जेव्हा तुझ्या बटांना (कथा)

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 06/09/2023 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
केतनने नेहमीप्रमाणे हाय टाकलं. जाईने उत्तर दिलं. तीही ऑनलाईन होती. बरेच दिवस ते ऑनलाईन बोलत होते. जाईची ब-यापैकी माहिती त्याला कळली होती. तिच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. तिला एकदा पाहायचं होतं. मनात तुंबलेला प्रश्न विचारायचा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर केतनने विचारलं. "कधी भेटायचं ?" "भेटू रे." हे जाईने तिस-यांदा तरी ऐकवलं होतं. आता मात्र केतन वैतागला. "भेटू रे, भेटू रे खूप दिवस चाललंय तुझं. नक्की सांग. आपण असं किती दिवस चॅटिंग करणार ? गेले दोन आठवडे तू टाळत आहेस.एकदा भेटूच ना.