Skip to main content

जीवनमान

भारतीय विचार - मांडुक्य उपनिषद

लेखक अभिजीत यांनी रविवार, 26/03/2023 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
मांडुक्य उपनिषद हे उपनिषद, मनुष्य रोजचे आयुष्य जगत असताना मनुष्याचे स्वरूप सच्चिदानंद आत्मा म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि ते मनुष्याने स्वत: कसे जाणावे हे समजावून सांगते. उपनिषदांनी ब्रह्म जाणण्यासाठी विविध प्रक्रिया शिकवल्या आहेत. मांदुक्य उपनिषद जी प्रक्रिया शिकवते तिला ‘अवस्थात्रय’ म्हणता येईल. मानवी आयुष्याचे सर्व अनुभव, जागेपणा, स्वप्नावस्था आणि स्वप्नरहित असलेली गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये असतात हे सर्वांनाच माहीत असते. आपण याचा रोजच अनुभव घेतो. आपण जागेपणी या व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. स्वप्नावस्थेत आपले मन विविध कल्पना निर्माण करते आणि आपल्याला जगाचा अनुभव येतो.

गोदातीरीची ऐतिहासिक भेट.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 25/03/2023 13:53 या दिवशी प्रकाशित केले.

आज सकाळी कधी नव्हे ते, बॅडमिंटन खेळायला गेलो. पूर्वीसारखे आता नियमित खेळणे होत नाही. नेटजवळील सेटल घ्यायला जी लवचिकता आणि चपळता लागते ती आता वयांपरत्वे कमी व्हायला लागलीय. पण, मित्रांसाठी भेटीगाठी होतात म्हणून अधून-मधून बॅडमिंटन कोर्टवर जात असतो.

हवाईजन्मांच्या अघटित घटना !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 07/03/2023 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
गरोदरपणाच्या अखेरच्या महिन्यातील वाहनप्रवास हा एक संवेदनशील विषय आहे. सर्वसाधारणपणे मानवी गरोदरपणाची कालमर्यादा 40 आठवडे मानली जाते. परंतु, “नववा लागल्यानंतर काही खरं नसतं!”, हा पूर्वापार चालत आलेला आजीबाईंचा सल्ला देखील दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. एखाद्या गरोदर स्त्रीला डॉक्टरांनी व्यवस्थित काढून दिलेली “तारीख” दरवेळेस अचूक ठरतेच असे नाही. कित्येकदा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकरही प्रसूतीवेदना चालू होतात. कधी कधी या वेदनांचा प्रारंभ आणि बाळाचा जन्म या घटना आश्चर्यकारक वेगाने घडतात. अशा प्रकारे नको तिथे बाळंत होण्याचे काही प्रसंग आपण अधूनमधून ऐकतो.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/03/2023 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा ✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते ✪ भीमा आणि गाणगापूर ✪ अशी राईड = अपूर्व आनंद ✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट ✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट ✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- च

वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 24/02/2023 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला. संदर्भ असा - 'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे.

गंधीत आठवणी

लेखक सालदार यांनी शुक्रवार, 17/02/2023 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण एप्रिल-मे महीन्यात परीक्षा आटोपत्या आलेल्या आणि सुटीची आतुरता लागलेली असायची. उन्हाळ्याच्या उकाड्यासोबतच सगळीकसे हवा कशी मोकळी वहात असे. अधुन मधुन घामाळलेल्या अंगावरुन एखादी हवेची झुळूक गेली की काय तो आनंद व्हायचा. पडवीत असलेले कडुलिंबाचे झाड उन्हाची दाहकता बर्‍याच अंशी कमी करायचे. आम्ही गल्लीतील सगळी मुले ह्या झाडाखालीच खेळायचो. उन्हाळ्याच्या त्या दिवसांचा गावाकडचा विशिष्ट असा गंध आजही माझ्या लक्षात आहे. उन्हाळा आला कि आजही मला तो गंध सुटीची आतुरता देऊन जातो. सुटीमधे चाखायला मिळणारे आंबे, कैरी यांचेही विशिष्ट वास मनात घर करुन आहेत.

आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

लेखक मार्गी यांनी बुधवार, 15/02/2023 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
✪ प्रखरता नव्हे शीतलता ✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी ✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर ✪ "छांदसी आणि सुमित्रा" ✪ पतझड़ है कुछ, है ना? ✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो? ✪ मै अहम हूँ यही वहम था सर्वांना नमस्कार. मनामध्ये आलेल्या अनेक भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. आत्या... आणि त्याबरोबरच मामा, काका अशा जागा अतिशय जिव्हाळ्याच्या असतात. सतत जवळ असल्यामुळे आणि उग्र अशा प्रखरतेमुळे आई- बाबा ही नाती काहीशी दुरावलेली असतात. किंवा निकटता आणि प्रखरता असल्यामुळे डोळ्यांवर काहीशी अंधारी आलेली असते. सतत समोर असलेली गोष्ट आपले डोळे हळु हळु बघणं कमी करतात.

शंभर अदाणी हवे आहेत…

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 06/02/2023 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 06/02/2023 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस. दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय.... ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही. तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ...... तो दुर कोपर्‍यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता. अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला, "ए तू पेठेतला रोहनच ना! ऐकोणसत्तर बॅच...नुमवी.... मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..." अय्या..!!!!

वेताळ टेकडी-ए आर ए आय टेकडीचा सत्यानाश

लेखक अनंतफंदी यांनी सोमवार, 06/02/2023 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणुन म्हटले जरा लांबवर फिरायला जावे. कौतुकाने कोथरुडच्या वेताळ टेकडी/परमहंस्/ए आर ए आय टेकडीवर फिरायला गेलो. बरीच मंडळी वरच्या दिशेने चढत होती. चढावर तुरळक झाडी होती. पण म्हटले सध्या हिवाळा आहे, पावसाळ्यात पुन्हा हिरवेगार होईलच की. वर जाऊन भिंतीपलीकडे गेलो मात्र सगळी कडे धूर पसरलेला दिसत होता. कोथरुड कचरा डेपो एका बाजुला असल्याने पहीले वाटले त्याचा- धूर असावा. पण नाही, पुढे गेल्यावर लक्षात आले की काही हौशी थेरडे मुद्दाम थिकठिकाणी गवत एकत्र करुन जाळत होते. विचारले का? तर म्हणे आम्ही ईथे खूप झाडे लावली आहेत, ती जागा मोकळी व्हावी म्हणुन.